
द परफेक्शननिस्ट
नेतृत्वा संबंधी एक सुवचन आहे.
Male leader is someone who takes you where you wants to be.
And female leader is someone who takes you where you ought to be.
अर्थात पुरुष नेतृत्व तुम्हाला तिथे पोहोचवत जिथे तुम्हाला पोहोचायची इच्छा असते, आणि स्त्री नेतृत्व हे तुम्हाला तिथे पोहोचवत जिथे तुम्ही पोहोचणं गरजेचं असतं. हे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही की ,आज पर्यंत ज्या ज्या देशांमध्ये स्त्री नेतृत्व जन्मास आले त्या त्या देशाच्या जगण्याची दिशाच या स्त्री नेतृत्वाने बदलवून टाकली. अर्थात चांगल्या अर्थाने.
इंदिराजींच्या नेतृत्वातही भारताला जागतिक पटलावर जे गरिमामय आणि दबदबा निर्माण करणारे स्थान मिळणे गरजेचे होते तिथे भारत पोचला होता. त्यावेळी जगातल्या दोन्ही महाशक्तींना हा देश आपल्या बाजूने यावा असे वाटत होते.
असे म्हटले जाते की इंदिरा गांधींना भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सुद्धा एक मानाचे स्थान होते-
“उनका लोहा सभी ने मान लिया था|”
स्वातंत्र्यापासून तर आज पर्यंत संपूर्ण भारताचा राजनैतिक इतिहास पाहिला तर इंदिरा गांधी या नावाशिवाय तो अपूर्ण आहे. इंदिरा गांधींचे विचार आणि समज दोन्ही मजबूत होते. बीबीसी ने त्यांना 1999 मध्ये WOMAN OF THE MILLENNIUM हा सन्मान बहाल केला.
सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जावी अशी कारकीर्द निर्माण करताना अनेक काळे कुट्ट आणि अवमानकारक क्षण त्यांच्याही आयुष्यात होते. त्या अनुषंगाने ते भारताच्याही आयुष्यात होते.
19 नोव्हेंबर 1917 रोजी जन्म झालेली. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्म घेतलेली ही व्यक्ती. सुरुवातीपासून तशी एकाकीच होती. वडिलांच्या राजनैतिक अति व्यस्ततेमुळे आणि आईच्या आजारपणामुळे त्यांना दोघांचाही अत्यल्प सहवास लाभला. एकल भावंड असल्याने तसेच सुरक्षिततेपोटी त्यांचे बरेचसे शिक्षण घरीच झाले. पुढे शांतिनिकेतन विश्वभारती युनिव्हर्सिटी मध्ये त्या दाखल झाल्या खऱ्या तर परंतु आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे, तरुण वयातच त्यांना आईची सेवा करण्यासाठी घरी परतावे लागले. पुढे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतरही त्यांच्या स्वतःच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या तिथे राहून शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत.
अर्थात त्यांची जी काही समज आणि शिक्षण होते ते त्या “स्वतः शिकलेल्या” होत्या. आईच्या मृत्यूनंतर त्या जगभर फिरल्या वेगवेगळ्या देशातली परिस्थिती, ठीक ठिकाणी चालत असलेली युद्ध ,त्यातून होत असलेली भेदभाव ,अन्याय ,अत्याचार ते त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले आणि त्यातूनच त्यांच अनुभव विश्व विकसित होत गेलं .
त्यांचा घर परिवार अति महान लोकांनी भरलेला असल्याने त्या सर्व छायेतून निघून एक परिपक्व अस्तित्व निर्माण करणं किंवा होणं इतकं सोपं नव्हतं. जे इंदिराजींनी केलं.
आजोबा मोतीलाल नेहरू प्रसिद्ध वकील, वडील जवाहरलाल नेहरू तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे धनी, राजनेता जे सर्वश्रुत आहे, आत्या विजयालक्ष्मी पंडित, त्याशिवाय स्वतःची आई कमला नेहरू ही स्वातंत्र्य लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणारी. ज्यांच्या माध्यमातून फिरोज गांधी ची ओळख झाली. अशा सगळ्या महान व्यक्तिमत्त्वातून स्वतःच्या तेजाने उजळून निघणे सोपी गोष्ट नव्हती.
त्यांच्या स्वतःच्या आत्मचरित्रात”MY TRUTH”मध्ये त्या लिहितात -आजूबाजूला हे सर्व लोक घरात ,सतत राजकारणी लोकांचा राबता, चळवळीच्या लोकांचा राबता , पोलिसांची ये जा, देश प्रेम ,चळवळीचे नियोजन या सर्वांमधून माझ्यामध्ये धैर्य आणि देशप्रेम येत गेले.
इंदिराजींनी स्वतःही त्यांच्या परीने त्या त्या वेळेला मग ती असहकार चळवळ असो की, भारत छोडो आंदोलन असो आपली भूमिका पार पाडली. स्वातंत्र्यानंतर ठिकठिकाणी झालेले दंगे धोपे शांततेच्या मार्गाने संपविण्याचे त्यांनी अनेक प्रयत्न केले.
पुढे पंडित नेहरूंच्या पंतप्रधान पदाच्या काळात CHIEF OF STAFF म्हणून काम पाहिलं. त्यांच्या राजनैतिक करिअरला खरी सुरुवात झाली ती 1959 मध्ये जेव्हा त्या सर्वात पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या.हाच त्यांच्या आयुष्यातला SHARP TURN म्हटल्या जातो.
लालबहादूर शास्त्री च्या मंत्रिमंडळात माहिती आणि नभोवाणी मंत्री म्हणून काम केलेल्या इंदिराजीना राम मनोहर लोहिया सारखे लोक “गुंगी गुडिया” म्हणायचे. पुढे लालबहादूर शास्त्री निवर्तल्यानंतर इंदिरा गांधींचे नाव पंतप्रधान म्हणून पुढे करणे, यामध्ये काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा अप्रत्यक्ष कटच होता की ,आपण यांना पंतप्रधान केलं तर आपला मोठेपणाही राहील शिवाय या पदाच्या उपकाराखाली त्या आपल्यापुढे जाणार नाहीत. ही गोष्ट किती फोल ठरली हे पुढील इतिहासावरून सिद्ध होतेच.
जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा खरोखरच पंतप्रधानांचा तो मुकुट म्हणजे काटेरी मुकुटच होता. कारण भारताची परिस्थितीच तशी होती. राजकीय, आर्थिक ,देशांतर्गत ,आंतरराष्ट्रीय सर्व स्तरावर अनेक आव्हानं घेऊन हा मुकुट त्यांच्या आयुष्यात आला .
अमेरिकेला व्हिएतनामच्या युद्धात अनुकूल न राहिल्याने भारताला अवमानकारक वागणूक मिळत होती. त्यातच भारतात 1967 यावर्षी दुष्काळ असल्याने अन्नधान्यासाठी अमेरिकेवर अवलंबून राहावे लागत होते. म्हणून सगळ्यात पहिले अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होणे. हा पहिला कार्यक्रम ठरवून हरितक्रांती ची सुरुवात इंदिराजींनी केली. 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण, त्यानंतर स्टील, तांबे ,कोळसा, कॉटन टेक्सटाईल, तेल शद्धीकरण आणि विमा या सर्व क्षेत्रांचे त्यांनी राष्ट्रीयकरण केले. हे सर्व निर्णय भांडवलशाहीच्या विरुद्ध जाऊन “कल्याणकारी राज्याच्या “दृष्टीने होते. इंदिरा गांधी हे करत असताना सामाजिक फायदा तर होताच परंतु इंदिराजींच्या बाजूने राजकीय फायदा जास्त होता. हे जे उद्योग निर्माण झालेत ते काही समाजाच्या समृद्धीसाठी नव्हते नफ्यासाठी होते. त्यांचे राष्ट्रीयकरण करताना विरोधाची बीजेही पेरल्या जात होती एवढं नक्की. कारण जे सर्व शक्तिमान होते .त्यांना शक्ती विहीन केल्या जात होतं.
कल्याणकारी राज्यांमध्ये लोकांना समाजाला या सर्व उद्योगांच्या राष्ट्रीय करणाचा फायदा झालाच ,ज्यामुळे कामगार वर्गाला काम आणि त्यांचे अधिकार मिळाले. परंतु भांडवल शहा नाराज झाले. इंदिरा गांधींनी EQUAL PAY FOR EQUAL WORK या माध्यमातून GENDER EQUALITY वर काम केले. मेघालय , त्रिपुरा, मणिपूर ,अरुणाचल प्रदेश ,हरियाणा ,पंजाब एकत्रित करून भारतासोबत सहप्रवासी केले.
भारतीय संघराज्य बनत असताना जवळपास 600 च्या वर संस्थानिकांची संस्थांना भारतामध्ये होती ती भारतीय संघराज्यात यावी या संदर्भात एक करार करण्यात आला होता. भारत सरकार तर्फे या संस्थानिकांना दर महिन्याला एक ठराविक रक्कम त्यांच्या त्यांच्या वकूबानुसार दिली जात असे. त्याला PRIVY PURSE म्हणत असत.जे इंदिरा गांधींना पटत नव्हते.
बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि संस्थानिकांचे तनखे या दोन्हीं खटल्यांमध्ये उच्च न्यायालयाने सरकार विरुद्ध निर्णय दिला. इंदिरा गांधींनी अध्यादेश काढून या मागण्या पूर्ण करून त्याचे कायदे बनवून घेतलेत. त्याकरता त्यांनी लोकसभा विलीन करून एक वर्ष आधीच निवडणुका घोषित केल्या.
त्या निवडणुकांना इंदिरा गांधींचा नारा “गरिबी हटाव” हा होता तर ,विरोधी पक्षांचा आणि अंतर्गत विरोधकांचा इंदिरा हटाव हा होता. तरीही त्या 1971 च्या निवडणुका जिंकल्या. पुढे बांगलादेश निर्मितीचा इतिहास सर्वश्रुत आहेच. त्यामुळे जागतिक इतिहासात त्यांचे नाव आयरन IRON LADY OF INDIA म्हणून घेतल्या जाऊ लागलं. त्या यशाचा फायदा 1974 ला भारताला FIRST PEACE NUCLEAR TEST परमाणु परीक्षणाच्या रूपाने झाला.
परंतु घरगुती पृष्ठभूमीवर मात्र इंदिराजींसाठी बेरोजगारी, महागाई ,आर्थिक मंदी या समस्या आकार घेत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी विरोध प्रदर्शने, तरुणांची आंदोलने,धरणे आंदोलन सुरू झाली. याच काळात जॉर्ज फर्नांडिस यांनी 17 लाख रेल्वे कामगारांचा संप घडवून आणला जो जगातला सर्वात मोठा कामगारांचा संप होता.
पुढे 1971 ची इंदिराजींची रायबरेली ची निवडणूक अलाहाबाद उच्च न्यायालयाने अवैध आणि रद्दबादल ठरवली. इंदिराजींनी सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यानंतर ,तिथेही त्यांचे लोकसभा सदस्यत्व खारीज करून त्यांना निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली. त्यांचे राजनैतिक अधिकार सीमित करण्यात आले. जोपर्यंत नवीन पंतप्रधान पदावर येत नाही तोपर्यंत मात्र पंतप्रधान पदावर राहण्याचा हक्क त्यांना देण्यात आला.
1971 ला जेव्हा त्या पुन्हा निवडून आल्या तेव्हा त्या एक अति प्रभावशील पंतप्रधानाच्या रूपाने समोर आल्या . काँग्रेस पक्ष आता अतिशय सशक्त झाला होता. गुजरात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला घोटाळा, इंदिराजींच्या कॅबिनेटमध्ये होत असलेले घोटाळे समोर येऊ लागले . LORD ACTON म्हणतात त्याप्रमाणे
POWER TENDS TO CORRUPT AND ABSOLUTE POWER CORRUPTS ABSOLUTELY . जे ठिकठिकाणी दिसू लागले
डॉ. कुवर बेचैन म्हणतात त्याप्रमाणे
“बहुत मुश्किल है इस दुनिया मे बडा होकर बडा रह पाना|”
आणि ही सत्ता सुटू नये म्हणूनच आणीबाणीच्या रूपाने जगात सर्वात मोठे लोकतंत्र असलेल्या देशात एक “अंधार युग” सुरू झालं. अनेक विरोधी पक्ष नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले, नागरिकांचे मूलभूत अधिकार रद्द करण्यात आले, सर्व राज्य सरकार यांचे अधिकार गोठवण्यात आले आणि निवडणुका रद्द करण्यात आल्या. आणीबाणीच्या दरम्यान जवळपास एक लाख निष्पाप लोकांना तुरुंगवास भोगावा लागला. संजय गांधींनी जबरदस्तीने नसबंदीचा कार्यक्रम राबवला.
1971 च्या बांगलादेश निर्मितीच्या युद्धात विजय मिळवल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी ज्या इंदिराजींना दुर्गा म्हटलं होतं त्यांचं सत्तेचा अधिपत्य एवढं वाढलं की त्या म्हणायच्या “EVEN THE DOG CANNOT BARK WITHOUT MY PERMISSION IN INDIA.”
अमीर इमाम लिहितात :-
“ताकत का नशा अक्कल पर हावी है तुम्हारी
तुम देख न पाओगे जो हम देख पाते है|”
इंदिरा जी1977 निवडणुका हरल्या. नवीन संकल्पना आणि नवीन बदल करून 1981 च्या निवडणुका इंदिराजीनी पुन्हा जिंकल्या. त्यानंतर मात्र पंजाबच्या समस्येने त्यांना इतर बाबींवर डोकं वर काढायला संधीच दिली नाही. खालीस्थान चळवळ हाणून पाडताना त्यांना “ऑपरेशन ब्ल्यू स्टार “करावे लागले. ज्यामुळे जगात दोन प्रतिक्रिया प्रकर्षाने उमटल्या.
पहिली प्रतिक्रिया म्हणजे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य पाऊल होतं. आणि दुसरी प्रतिक्रिया म्हणजे धार्मिक बाबींवर राज्याने केलेला हस्तक्षेप चुकीचा होता.
त्याचे प्रत्यंतर त्यांच्या हत्येत झाले.
एकूण काय प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतातच.
“मानव गलती करने का अधिकार लेकर तथा सही कर ने का अवसर एवं साधन लेकर जन्मता है|”
सर्व गोष्टींमधून त्यांची महानता मात्र कमी होत नाही. त्यांचा मानवीय पक्ष अतिशय जबरदस्त होता. त्यांच्यासोबत असलेल्या छोट्या मोठ्या लोकांची काळजी त्यांच्या खाण्याची राहण्याची काळजी हा त्यांचा स्थायीभाव होता.”उत्तराखंडच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या ड्रायव्हरने नाष्टा केलेला नव्हता आणि आजच्यासारख्या सोयी त्याकाळी उपलब्ध नव्हत्या तेव्हा स्वतःच्या बॅग मधील मारी बिस्कीट काढून त्याचे तुकडे करून ड्रायव्हरला एक एक तुकडा ड्रायव्हिंग करत असताना खात चल. हे करणाऱ्या ही त्याच होत्या.
आपल्या वडिलांसारखा सामान्य लोकांच्या समस्या मिटवण्यासाठी दर्शन दरबार आयोजित करणाऱ्याही त्याच होत्या.
पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सत्य आणि निष्ठेच्या नावावर शपथ घेणाऱ्या, दुसऱ्यांदा पंतप्रधान होताना ईश्वराला स्मरण करून शपथ घेणाऱ्याही त्याच होत्या.
दरम्यानच्या काळात अनेक चढ-उतारांना विरोधांना सामोरे गेल्या, अपयश बघितले ,स्वतःच्या मुलाचा मृत्यू बघितला. कर्म करणे आपल्या हातात आहे परंतु परिणाम मात्र आपल्या हातात नाही हे लक्षात येत गेल्याने. विचार आणि तर्काने जीवन जगताना कुठेतरी अंत आहे. परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात नाहीत त्यामुळे त्या धार्मिक ते कडे सुद्धा झुकत गेल्या.
विज्ञाननिष्ठ आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता असणाऱ्या, काशीविश्वेश्वराच्या अभिषेकापासून ,वैष्णव देवीच्या यात्रेपासून, कन्या पूजनापर्यंत येणाऱ्या त्याच होत्या.
बागण्या बोलण्यात अतिशय काटेकोर होत्या. “सहज चालत असताना तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहात.”अशी बोलण्याची हिंमत त्यांच्या हयातीत कोणाची झाली नाही. इंदिराजींच्या सोबत बसलेले असताना त्या हसल्याशिवाय कोणाची हसण्याची हिंमत नव्हती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी त्यांच्या सचिवाच्या मार्फत विचारणा केली की ,मी इंदिरा गांधींना कोणत्या संबोधनाने संबोधू ?यावर इंदिरा गांधी म्हणाल्या ते मला सरळ पंतप्रधान म्हणून संबोधू शकतात किंवा Mr. PRIME MINISTER असे संबोधले तरी चालेल आणि शेवटी हसत सांगितलं की माझे मंत्रिमंडळातले साथी मला SIR म्हणून संबोधतात तुम्ही SIR म्हंटले तरी चालेल.
याच राष्ट्रपती जॉन्सनने जेव्हा इंदिरा गांधींना बॉल रूममध्ये प्रथेप्रमाणे डान्स करण्यासाठी आमंत्रण दिलं तेव्हा त्यांनी “माझ्या भारतीय जनतेला त्यांच्या पंतप्रधानाने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत बॉल रूम मध्ये नृत्य केले, तर आवडणार नाही म्हणून मी आपल्या सोबत नृत्य करू शकत नाही”असे सांगून स्पष्ट शब्दात नकार दिला.
पुढे चार वर्षानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या 25 व्या संमेलनानिमित्त जेव्हा त्या न्यूयॉर्कला गेल्या तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी सर्व राष्ट्राध्यक्षांना व्हाईट हाऊस मध्ये संध्याकाळच्या भोजनाचे निमंत्रण वर्तमानपत्रातून दिले. त्यावर इंदिरा गांधी ना अमेरिकेतले उच्चायुक्तांनी विचारले तुम्ही भोजनासाठी वॉशिंग्टनला केव्हा जाणार आहात? त्यावर इंदिराजी म्हणाल्या फक्त वर्तमानपत्राच्या बोलावण्यावरून मी कदापिही वॉशिंग्टनला जाणार नाही. मला रीतसर आमंत्रण नाही.
याच संमेलनादरम्यान पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झिया उलहक यांच्याशी भेटल्या. चर्चा अतिशय चांगली झाली त्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष झिया उल हक इंदिराजींना म्हणाले माझ्या संबंधी प्रेस मध्ये छापल्या गेलेल्या बातम्यांवर आपण विश्वास ठेवू नका. यावर इंदिराजी अतिशय शिताफीने उत्तर देत्या झाल्या. “बरोबर आहे, प्रेस तुम्हाला डेमोक्रॅट (लोकशाहीवादी) समजते परंतु तुम्ही तर डिक्टेटर (हुकूम शहा) आहात.” त्याच मीटिंगमध्ये जिया उल हक यांनी इंदिरा गांधींना एक पुस्तक भेट दिले ज्यामध्ये काश्मीर हा पाकिस्तानचा भाग दाखवण्यात आला होता. ते पुस्तक बघताक्षणीच इंदिराजींनी पुस्तक पॅक करून पाकिस्तानी उच्चायुक्तालयात लगेच पाठवून दिले. नकाशात का होईना ? पण काश्मीर पाकिस्तानचा भाग दाखवल्याचा त्यांना भयंकर राग आला होता.
अतिशय मित हारी, मितभाषी आणि परफेक्शननिस्ट असणाऱ्या इंदिरा गांधी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत साथ देणारे काश्मीरचे नोकरशहा परमेश्वर नारायण हक्सर हे वैयक्तिक सचिव म्हणून सावलीसारखे संपूर्ण कारकीर्द त्यांच्यासोबत राहिले. कारण इंदिरा गांधींची तशी इच्छा होती की, माझा सचिव असा असावा की ज्याच्याशी माझे आपुलकीचे नाते असावे सोबतच त्याची स्वतःची स्वतंत्र अशी विचारधारा असावी.
उषा भगत ,पपुल जयकर ,मोहसीना किडवाई यांनीही त्यांना जीवनभरअतिशय उपयुक्त साथ दिली.
एकदा फिरोज गांधींविषयी बोलताना त्या म्हणाल्या होत्या “DEFINITELY SOMETIME I DON’T LIKE FIROZ BUT I LOVE HIM.”
भारताला एक अबाधित स्थान मिळू देण्याच्या कामात मैलाचा दगड असणारी ही स्वाभिमानी महिला पंतप्रधान थोडक्या शब्दांमध्ये पकडता येण्यासारखी नाही. शेवटी सौदामिनीच ती.
शेवटी खाच खडग्याविना कोणाचीच वाटचाल नसते म्हणतात ना :-
“प्रत्येक पाप करणाऱ्याला जसा भविष्यकाळ असतो
तसा पुण्य करणाऱ्याला भूतकाळ असतो.”
|| श्री माऊली चरणी अर्पण||
अश्विनी गावंडे