
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली
आज या आधुनिक जगात स्त्रीने प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केले आहे. ती राष्ट्रपती आहे पंतप्रधान आहे राष्ट्राध्यक्ष आहे अंतराळवीर आहे फायटर प्लेन ची पायलट आहे सांसद आहे वैज्ञानिक डॉक्टर इंजिनियर उद्योगपती नवउद्यमी ऑलम्पिक पदक विजेती, राज्य आणि देशाच्या प्रशासन सेवेमध्ये चमकणारी आणि प्रत्येक बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करणारी.
दुसरा पक्ष दारिद्र्य शी लढणारी ,कुटुंबाला पुढे आणण्यासाठी संघर्ष करणारी, कुटुंबामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करणारी. आरोग्याच्या अनेक समस्यांनी ग्रसित. इत्यादी इत्यादी
पहिले मला वाटायचं खरंच फक्त भारतातल्या स्त्रीचे जगणं असे आहे. परंतु जस जसा माझ्या निरीक्षणाचा परीघ वाढला तसतसं कळायला लागलं काही निवडक स्त्रिया सोडल्या तर स्त्रियांची अन्याय आणि अत्याचारग्रस्तता ही वैश्विक आणि सर्वकालिक आहे.
सद्य परिस्थिती तर अंगावर शहारे आणणारी आहे.एपिस्टिंन फाईल, लडाख मधली परिस्थिती ,इराण मधली महिलांची स्थिती हे केवळ हिमनगाचे टोक आहे. असे म्हटल्या जाते तर मग काय मध्यकालीन युगाला चांगले म्हणावे? विचार करून डोक्याला मुंग्या लागल्या.
एवढ्यात मैत्रीण म्हणाली सोड हे सर्व कुठे एवढे विचार करते ? आजआंतरराष्ट्रीय महिला दिन. आजचा दिवस आपला आहे. सर्वजण आपल्याला खूप शुभेच्छा देत आहेत चला खूप मजा करूया. म्हटल मग बरोबर आहे.
364 days you beat us
365th day you greet us.
काय जगण्याचा विरोधाभास आहे.
आजच्या काळात दोन वर्षापासून तर साठ वर्षापर्यंतची वृद्धा समाजात सुरक्षित नाही. एवढेच काय तर आजची बालिका जन्माच्या आधीही सुरक्षित नाही.
विचार केल्यावर लक्षात आलं की यामध्ये बदल केवळ दोन गोष्टींनी होऊ शकतो एक म्हणजे “समाज की सोच “आणि दुसरी म्हणजे व्यवस्था का खाफ.
समाजाची विचारक्षमता तर दिसते आहेच.
परंतु ज्याच्या हाती व्यवस्था दिली तेच कुंपण शेत खायला लागलय.
स्त्रीच वस्तू करण , बाजारीकरण करणाऱ्या समाजाला दोष दिला तर ,त्या स्त्रियांच काय ?ज्यांनी स्वतःचच वस्तूकरण आणि बाजारीकरण करणे सुरू केले आहे? (सर्व समाज माध्यमे बघितली की लक्षात येईल.)
थोडं मुळाशी जाऊन विचार करू म्हटलं तर लक्षात येतं. आपल्या समाजात स्त्री-पुरुषाला मोजण्याची परिमाण वेगवेगळी आहेत. पुरुष किती कमवतो ? स्त्री किती सुंदर आहे?
“जो जिस चीज को चाहता है उसे पाने मे अपना तन मन धन लगा देता है|”
परंतु जी गोष्ट मुळातच नाशवंत आहे ती शाश्वत राहू शकत नाही ती तशी टिकून राहण्याची धडपडच व्यक्तीला केविलवाणी करते.
स्त्री सुंदर असो की काहीही परंतु समाजामध्ये तीच स्थान दुय्यमच आहे. ते तिला मान्य नाही.जसजशी स्त्री सुशिक्षित व्हायला लागली तिचा बाहेरच्या जगाशी संपर्क आला. सतत मलाच समाजात कुटुंबात दुय्यम स्थान का? हा विचार तिने केला तेव्हा तिच्या लक्षात आलं की मी संपत्ती निर्माती नाही. समाजामध्ये जी कामे पुरुष करू शकतात ती स्त्री करू शकत नाही पण मला तर बरोबरच स्थान मिळालं पाहिजे. मग तिने स्वतःच्या समजेच्या अस्तराचा वापर न करता अंधानुकरण सुरू केले. आणि अदृश्य भिंती तोडायचा प्रयत्न करायला लागली.आता प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात आघाडी मिळवली खरी परंतु आता तिची दमछाक व्हायला लागली सुपर वुमन होता
“उषःकाल होता होता काळरात्र झाली”
अशी परिस्थिती निर्माण झाली.
जगाच्या संदर्भात स्त्री नेहमी second sex च राहिली. म्हणून तर Feminism अर्थात स्त्रीवादाचा जन्म झाला. परंतु खरा स्त्रीवाद म्हणजे स्त्रीला उच्च स्थानी ठेवणे आणि पुरुषांना कमी लेखणे हा प्रकार नाही. तर स्त्रीवाद म्हणजे समानता. स्वातंत्र्य आणि संधीची समानता. जगण्याच्या प्रत्येक आयामांमध्ये समानता.
या संदर्भात विचार करायचा झालाच तर आपल्याला दोन वेगळे संदर्भ वापरावे लागतील. एक पाश्चिमात्य (कारण ते आपल्याला जास्त सत्य वाटतात)किंवा जागतिक संदर्भ आणि दुसरा म्हणजे भारतीय संदर्भ. संदर्भ यासाठी स्त्रीच्या उगमाविषयी प्रत्येकाचे तत्त्वज्ञान काय सांगतं? आपण जागतिक किंवा पश्चिमात्य तत्वज्ञान किंवा संदर्भ बघितला तर असं लक्षात येतं स्त्रीचा निर्माण पुरुषाच्या शरीरातल्या वाकड्या हाडापासून झाले असं मानल्या जाते.
भारतीय दर्शन शास्त्र असं सांगतो. इथे दर्शन म्हटल्या गेल आहे. हे तत्त्वज्ञान नाही. दर्शन म्हणजे प्रत्यक्ष बघणं तर तत्वज्ञान म्हणजे विचार , चिंतनाचा परिपाक. विचार आणि चिंतन हे त्याच गोष्टींवर होऊ शकतं ज्या गोष्टी व्यक्तीला ज्ञात आहेत. आणि व्यक्तीला या सृष्टीतील सर्वच गोष्टी ज्ञात असू शकत नाही. तर दर्शन म्हणजे प्रत्यक्ष बघणे प्रत्यक्ष अनुभव. त्रयस्थ तेने बघणे. तर भारतीय दर्शन शास्त्र म्हणत जिथून पुरुषाचा उगम झाला तिथूनच स्त्रीचा ही उगम झाला आहे. फक्त लिंग वेगवेगळे आहेत. मानसिकता एकच. मानसिकतेला लिंगभेद नसतो. (आत्म्याला लिंग नसते.) किंबहुना भारतीय दर्शन शास्त्र स्त्री जीवनाला पुरुष जीवनापेक्षा उच्च स्थान देते . कारण स्त्री च्या समजेतील लवचिकता, तिची चिकाटी ,तिची कर्तव्यनिष्ठा , तिचे काळजीवाहू पण , तिचे भावनिक समायोजन करण्याची योग्यता, तिच्या विचारांची पोहोच , दूरदृष्टी ,एकाच वेळी अनेक गोष्टी निभावून नेण्याची कला किंवा गुणवत्ता , आजच्या काळात अतिशय महत्त्वाचे असलेले वेळेचे नियोजन या सर्व गोष्टींसोबतच निसर्गाने तिला दिलेल्या आनंद यात्री होण्याचं वरदान अर्थात दुसरा जीवन निर्माण करण्याची दिलेली शक्ती. या सर्व गोष्टींमुळे ति ला कायम पुरुषांपेक्षा उजवे स्थान देण्यात आले आहे. इथे देणे म्हणजे पुन्हा कुणीतरी देणे असे होते म्हणजे देणारा कोणीतरी आहे तसे नसून स्त्रीची उपजत प्रवृत्ती ही उच्च स्थानीच आहे.
जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेदामध्ये 27 ऋषिकांचे ऋचा बनवण्यामध्ये योगदान आहे. सूर्या सावित्री नावाची ऋषिका जिने आज ही अस्तित्वात असणारी विवाह संस्था निर्माण केली . अथर्व वेदामध्ये जवळपास 95 श्लोक ऋषिका चे आहेत.
पुढे चार हजार वर्षानंतर उपनिषदांमध्ये उल्लेखित गार्गी , मैत्रेयी यासारख्या गहन अध्ययन करणाऱ्या स्त्रियांचा समावेश आहे. रामायण काळामध्ये दशरथाला युद्धात वाचवणारी कैकयी आहे. रामायण काळात स्त्रिया युद्ध प्रवीण होत्या हे सिद्ध होते. तिथेच मिळालेल्या वरदानाने रामाला वनवास मिळाला . त्यामुळे आपण नेहमी कैकयी ला नकारात्मक भूमिकेतून बघतो . परंतु रामायणातील माता कौशल्या आणि भगवान राम यांच्यात झालेला संवाद कैकयीची दुसरी बाजू उघड करतो.
माता कौशल्या रामाला विचारते -” तुला वनवासात जाण्याचा आदेश की पिता दशरथ यांनी दिला की माता कैकयीने . जर हा आदेश पिताश्रींनी दिला असेल तर तो मी केव्हाही बदलू शकते परंतु जर का तो माता कैकयीने दिला असेल तर शंभर अयोध्या पेक्षा वनवासच तुझ्यासाठी योग्य आहे. म्हणून तू वनवासात गेले पाहिजे. ” वनवासानेच राजा राम पासून ते भगवान रामापर्यंत मर्यादा पुरुषोत्तम पर्यंतचा रामाचा प्रवास झाला.
महाभारत कालीन वस्त्रहरण प्रसंग तर सर्वज्ञात आहे. धर्म सभेमध्ये उच्चारलेले द्रौपदीचे वाक्य आजही आपल्या भारतीय संसदेमध्ये लावलेले आहे.
“वो सभा, सभा नही होती जहा कोई वृद्ध ना बैठे|
वो वृद्ध ,वृद्ध नही होता, जो धर्म की बात न कहे |
और वो धर्म ,धर्म नही होता जिस मे सत्य ना हो
और वो सत्य सत्य नही होता जिसमे छल हो|
द्रौपदीने कृष्णा करवी पांडवांना अधर्माच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार केले. तिने संपूर्ण जगाला दाखवून दिले की एका स्त्रीवर अन्याय अत्याचार होत असेल तर गुणवत्ता ,कुशलता आणि नीतिमत्तेने कसे लढावे.
पुढे बौद्ध काळामध्ये आणि बौद्ध धर्माच्या प्रसारामध्ये स्त्रियांचे अतिशय मौल्यवान योगदान आहे. गौतम बुद्धाचे पालन करणारी माता गौतमी पुढे पाच पाचशे स्त्रियांसमवेत बौद्ध धर्मावर प्रवचन आणि व्याख्याने करत बौद्ध धर्माचा प्रसार करत गेली . भगवान गौतम बुद्धांची पत्नी यशोधरेने सुद्धा हेच काम केले. दोघीही राण्या होत्या.पुढे जाऊ न सम्राट अशोकांची पुत्री संघमित्रा हिने वयाच्या 18 व्या वर्षी दीक्षा घेऊन श्रीलंकेमध्ये तेव्हाच्या काळात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला बौद्ध धर्माची शिकवण समजून सांगितली. इसवी सन पूर्व 250 वर्षांपूर्वीचा हा इतिहास आहे.
हे गुणसूत्र (जीन्स) आहेत आपले.
त्यानंतरचा मध्यकाल मात्र विविध आक्रमण, संघर्ष, मोठमोठ्या विश्वविद्यालयांचे नष्ट होणे या सर्वांमुळे भारतीय जगतात जगणारी स्त्री संकटात सापडली. हा संपूर्ण काळ सामाजिक क्षरणाचा , संघर्षाचा, स्त्रियांसाठी कष्टप्रद व अतिशय अपमान जनक होता. या काळात लाखो महिलांचे अपहरण झाले आणि जगाच्या बाजारात त्यांना विकण्यात आले. मोहम्मद अब्दाली, मोहम्मद घोरी, मोहम्मद गझनी यांचा हा काळ . म्हणून च सुरक्षेच्या कारणास्तव छोट्या मुलींपासून तर स्त्रियांपर्यंत प्रतिबंध लादल्या गेले. शिक्षण बंद पडली. बालविवाह सुरू झाले. दिवसा ढवळ्या होणार लग्न सुरक्षेच्या कारणामुळे रात्रीची व्हायला लागली. सुरक्षिततेच्या कारणानेच स्त्रियांच्या डोक्यावर घुंगट आला .त्याकाळी आपल्या देशात विधवा विवाह होत होते. परंतु सततच्या आक्रमणाने पुरुषांची संख्या कमी होत गेली आणि विधवा विवाहावर प्रतिबंध येत गेले. आणि आमच्या समाजात विधवा निषिद्ध झाली. हा कालखंड विपत्तीचा कालखंड होता.
प्रसिद्ध लेखिका महादेवी वर्मा या काळाबद्दल लिहिताना म्हणतात”धर्म और प्राण की रक्षा के लिए हमारा बहुत कुछ अच्छा निकल गया ,और जो गलत बच गया वही नियम बन गया|”
पुढे बाराव्या ते अठराव्या शतकापर्यंत अनेक स्त्रिया होऊन गेल्यात ज्यांनी भारतीय समाजामध्ये नवीन प्रकारे समजेचे बीजारोपण केले. त्यामध्ये पद्मावती तमिळनाडू मधील मंडाल काश्मीर मध्ये काम करणारी लल्लेश्वरी तर राजस्थानमध्ये पडदा व्यवस्था संपवणारी मीराबाई होऊन गेल्या. महाराष्ट्र मध्ये मुक्ताबाई जनाबाई सोयराबाई बहिणाबाई कान्होपात्रा यासारख्या स्त्रियांनी स्वतःला अत्युच्च शिखरापर्यंत नेले. जिजामाता ज्यांनी स्वराज्याला दोन छत्रपती दिले. महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीला राणी सारखे जगणे शिकवले.झाशीची राणी लक्ष्मीबाई नेतर अतिशय कोवळ्या वयात पराक्रमाची पराकाष्टा गाठली. हे सांगण्याचे तात्पर्य एवढेच की भारतीय स्त्री ही समाजामध्ये निर्माती आणि वेळप्रसंगी गुरुस्थानी होती.
राम भोला नावाचा एक व्यक्ती त्याचे रत्नावलीशी लग्न झाले. पत्नीच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेला राम भोला पत्नी माहेरी गेली तेव्हा तिच्या माहेरी गेला. माहेरी पोहोचताना रात्र झाली सर्व दारे बंद झाली तेव्हा रामभोला सापाला लटकून खिडकीतून पत्नीच्या खोलीत पोहोचला. हे सर्व पाहून रत्नावलीला खूप राग आला आणि म्हणाली जितके प्रेम या शरीराशी आहे ना तितकं प्रेम जर का रामाशी असते तर संसाराचा हा भवसागर कधीच पार केला असता. तिथेच रामभोलाचा संत गोस्वामी तुलसीदास झाले. स्वतःच्या बायकोला गुरुस्थानी मानणारी आमचे परंपरा आहे.
स्त्री समाजाचा आस आहे ज्या भवती हा समाज फिरतो. तिचं महत्त्व वादातीत आहे. परंतु जे राहिलं तो नियम बनल्याने , समाजाची व्यवस्था हे नियम आणखी काटेकोर पद्धतीने पालन करणाऱ्या धुरीनांकडे गेल्याने स्त्रीची परिस्थिती
“बद से बत्तर होती गई |”
कारण त्यांच्यातील पशु मानव आणि राक्षस मानव संपला नव्हता. त्यातूनच पारंपारिक पुरुष दृष्टिकोन तयार झाला. जो आजच्या स्त्रीला जगुही देत नाही आणि मरूही देत नाही. तिचं वस्तु कारण केलं बाजारीकरण केलं . आज ती स्वतःच्या घरातच असुरक्षित आहे तिचं बाई असंणच फक्त बघितल्या जाते .शिक्षणाचा अभाव ,सामाजिक अभिसरणाचा अभाव, तिने ते स्वीकारण्याचा किंवा अस्विकरण्याचा प्रश्नच नव्हता. आता ती समाजातील सर्वात कमजोर कडी बनली होती.
शिवाय एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगितली तर ती खरी वाटायला लागते हे तर सर्वकालिक सत्य आहे.
तिच्यातील मातृत्व गुण मात्र आजही कोणी नाकारू शकत नाही म्हणून मग त्या संदर्भात देवत्व प्रदान करण्यात आलं. आणि नैसर्गिक काळजीवाहूपणाच्या गुणधर्माचं भांडवल करून तिच जगणं एक व्यक्ती म्हणून न ठेवता वेगवेगळ्या भूमिका वठवणं हेच तिचं जीवन करून टाकलं.
परंतु जस जस स्त्रियांचे शिक्षण वाढायला लागलं. त्यांची स्वतःची विचारसरणी बदलायला लागली. आणि सर्व गोष्टी तिला असह्य व्हायला लागल्या. मग एक व्यक्ती म्हणून मलाही सन्मानाने जगता यावं यासाठी प्रयत्न करायला लागली. मग सन्मान कोणाचा होतो ? जो संपत्ती निर्माण करतो त्याचा सन्मान होतो. मग मी ही संपत्ती निर्माण करेल. ती जे काम करत आहे ते नगण्य ठरविण्यात आले. ती कामे ती ही नाकारायला लागली. स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरुष जे काम करतात ते करायला लागली. तिथूनच तिच्या फसगतीला सुरुवात झाली. आणि आपण इथे येऊन पोहोचलो.
ज्या गोष्टींनी तुमचं मापन केल्या जातं त्या ते मापन पहिल्यांदा बदलणं गरजेचे आहे. करिता
If you don’t like the rule, follow the rule go on the top and then change the rule.
हे करावे लागेल.
त्यासाठी स्त्रीला सर्वप्रथम स्वतःला समजून घ्यावे लागेल. तिचा स्वधर्म काय हे तिला कळलं पाहिजे यासाठी तिने चिंतन केलं पाहिजे. भगवत गीतेमध्ये भगवान कृष्ण अर्जुना ला म्हणतात -“पर धर्मात जगणे हारण्यासारखे आहे. स्वधर्मात हारणेही जगण्यासारखे आहे.”
स्वधर्म म्हणजे काय? तर स्वतःचा स्वभाव. माझा स्वभाव काय हे समजून घेण्यासाठी मला काय पाहिजे ? ह्या लाख मोलाच्या प्रश्नाचे उत्तर शोधणे महत्त्वाचे. दुसरा लाख मोलाचा प्रश्न म्हणजे त्यासाठी मी काय करू शकते???
चरित्र जब पवित्र है तो क्यू है ये दशा तेरी
ये किसी को हक नही कि ले परीक्षा तेरी
तू खुद की खोज मे निकल ,किसलिये हताश है
तू चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है |
समय को भी तलाश है|
||श्री माऊली चरणी अर्पण||
अश्विनी गावंडे
अकोला
प्रेरणादायी वास्तववादी लेख 👌👌
Khup Chan Mam 👌👌
Factual
I like your calculation about 364 and 365 days
These 364 days makes it महिला दीन
Your article inspires all the women to change this 364 days in महिला दिन
🌹🌹🌹🌹🌹
अभ्यासपूर्ण स्त्री जीवनावरील सुंदर लेख
महिला दिनानिमित्य अश्विनी तु खुप अभ्यासपूर्ण आणि समर्पक विचार मांडले .आणि बरेचसे माझ्या मनातलेही …….. जसे महिला दिन म्हणजे पुरुषांचा विरोधी दिन नाही . आणि आत्म्याला लिंग नसते . अश्विनी तुझा अभिमान आहे . तुझी प्रतिभा सदैव बहरत राहो महिला दिन हि मनस्वी शुभेच्छा !!!
यथार्थ लेख
अभ्यासपूर्ण लेखन
खूप सुंदर लेखन स्त्री जीवनाची संपूर्ण कहाणी सांगितलेली आहे
लाख मोलाच्या प्रश्नासाठी चिंतनाचं दालन खुलं केलंत. प्राचीन ते वर्तमान सर्व काळाचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेतला. संस्कृतीतील संस्कार आणि वैभव, परिस्थितीनुसार बदलत गेलेलं स्त्रीचं समाजातील स्थान, तिचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यासाठी दिलेली उदाहरणे यामुळे तिचा जीवनपटच या लेखात अवतरला. अतिशय समर्पक असे शीर्षक “अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…”मॅडम खूपच अप्रतिम लेखन! खरंच मी जशी आहे तशी मला स्वीकारता यायला हवी. स्त्रीत्वाचा स्वाभिमान आणि अभिमानही जपायला हवा. खरंच स्वधर्मात हारणेही जगण्यासारखे आहे.
लाख मोलाच्या प्रश्नासाठी चिंतनाचं दालन खुलं केलंत. प्राचीन ते वर्तमान सर्व काळाचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेतला. संस्कृतीतील संस्कार आणि वैभव, परिस्थितीनुसार बदलत गेलेलं स्त्रीचं समाजातील स्थान, तिचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यासाठी दिलेली उदाहरणे यामुळे तिचा जीवनपटच या लेखात अवतरला. अतिशय समर्पक असे शीर्षक! खूपच अप्रतिम लेखन! खरंच मी जशी आहे तशी मला स्वीकारता यायला हवी. स्त्रीत्वाचा स्वाभिमान आणि अभिमानही जपायला हवा. खरंच स्वधर्मात हारणेही जगण्यासारखे आहे.
अतिशय अभ्यासपूर्ण लेख.
Nice
Well known facts
https://shorturl.fm/gw4ui
https://shorturl.fm/NvCsZ
https://shorturl.fm/oYjxV
https://shorturl.fm/1znav
https://shorturl.fm/AvpLm
https://shorturl.fm/mMTXU
https://shorturl.fm/Q8Ooh
https://shorturl.fm/rjl69