तिमिरातूनी तेजाकडे…..
एक जगप्रसिद्ध कथा आहे . किंग आर्थुरला त्याच्या शेजारच्या राजाने कैद केले. त्या राजाला त्याला मारण्याची खूप इच्छा होती परंतु त्याची वागणूक आणि इतर गोष्टींकडे पाहून शेजारच्या राजाने किंग आर्थूरला एक प्रश्न विचारून त्याचे उत्तर शोधून आणण्यास सांगितले. त्याकरिता एक वर्षाचा कालावधी दिला उत्तर शोधून आणले नाही. तर मात्र मी तुला जीवे मारेल. असे सांगितले.
प्रश्न होता खरोखर एका स्त्रीला आयुष्यात नक्की काय पाहिजे?
आतापर्यंतचा सर्वात गहन प्रश्न किंग आर्थुर ला तर वाटलाच वाटला. परंतु इतर सर्वांनाही वाटत होता. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी किंग आर्थूर आपल्या राज्यात गेला. त्याने तिथले सर्व बुद्धिमान लोक, प्रिन्सेस आणि इतर सर्वांना त्या संदर्भात विचारणा केली. परंतु कोणीही काही ठोस उत्तर देऊ शकला नाही. असं करता करता वर्ष संपत आलं. काही जाणकारांच्या मते त्यांनी सांगितलं की अशा गहन आणि गुढ प्रश्नाचे उत्तर फक्त जंगलात राहणारी एक चेटकीण आहे तीच देऊ शकेल. परंतु ती जेव्हा कुठल्याही गोष्टी करण्यास तयार होते तेव्हा तिने मागितलेली गोष्ट तिला द्यावीच लागते.
इच्छा नसताना परंतु मरणाची भीती असल्याने किंग आर्थर चेटकिणीकडे जातो. जी अतिशय घाणेरडी आणि घृणास्पद असते. तिला हा प्रश्न विचारतो त्यावर चेटकिणीने उत्तर दिले, की मी तुला या प्रश्नाचे उत्तर जरूर देईल. परंतु मला तुझ्या सैन्यातील अधिकारी आणि तुझा जवळचा मित्र याच्याशी तुला माझे लग्न लावून द्यावे लागेल.
आता मात्र किंग आर्थर ला ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे आ ना विहीर झाले. जीवन पाहिजे असेल तर उत्तर पाहिजे आणि उत्तर पाहिजे तर या चेटकिणीशी लग्न करून स्वतःच्या मित्राचे मरण जवळ ओढ वावे लागेल अशा दुहेरी पेचात किंग आर्थर फसला.
जेव्हा ही सर्व गोष्ट त्याच्या मित्राला कळली तेव्हा त्यांनी तुझ्यासाठी काही पण म्हणत चेटकिणीशी लग्न करण्याचे कबूल केले. पण आधी लग्न नंतर उत्तर अशी चेटकीणीची अट असल्याने पहिले लग्न झाले. लग्न होऊन पहिल्या रात्री जेव्हा किंग आर्थर चा मित्र स्वतःच्या खोलीत आला, तेव्हा त्याने समोर उभी असलेली एक सुंदर स्त्री बघितली ती चेटकिनच होती. त्यावर तिने उत्तर दिले की माझा सन्मान राखून तुम्ही दोघांनी मला खूप चांगली वागणूक दिली. आणि तू तर माझ्याशी लग्न केले .म्हणून मी असे ठरवले आहे की, मी चोवीस तासांपैकी बारा तास एक सुंदर स्त्री म्हणून वावरणार आणि बारा तास एक चेटकीण म्हणून वावरणार आता कोणत्या बारा तासात मी सुंदर म्हणून वावरायचे आणि कोणत्या बारा तासात चेटकिन म्हणून हे तू ठरव.
हा तर अतिशय गहन प्रश्न किंग आर्थर च्या मित्राला पडला. परंतु दिवसाचे बारा तास सुंदर राहा म्हटले तरी समस्या .रात्रीचे बारा तास सुंदर म्हटले तरी समस्या. म्हणून त्यांनी एक मार्ग शोधला आणि चेटकिणीला म्हणाला कोणते बारा तास सुंदर राहायचे ?आणि कोणते बारा तास सुंदर राहायचे नाही .हे तुझे तूच ठरव त्यावर चेटकिणीने उत्तर दिले की मी आता चोवीस तासही सुंदर ललना म्हणूनच राहील. कारण तुम्ही लोकांनी मला जे सन्मानाने वागवले आणि मला माझेनिर्णय घेण्याचा अधिकार दिला त्याबद्दल या सर्व गोष्टी मी तुला बहाल करीत आहे.
एकुणात काय तर स्त्रीला तिच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार असणे हाच तिचा सन्मान आहे.त्यातून तिच्या प्रति व्यक्त केलेला आदर. हे फक्त स्त्रीलाच नाही तर प्रत्येकाला अपेक्षित असणारी गोष्ट आहे.
मात्र परखडपणे तपासुन पाहिल्यास जास्तीत जास्त वेळा कोणत्याही स्त्रीला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा किंवा जगण्याचा अधिकार आहे का? तर त्याचे उत्तर नाही असंच येतंय. प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका सिमोन त्यांच्या द सेकंड सेक्स नावाच्या पुस्तकात म्हणतात “नैसर्गिक रित्या स्त्री असणं आणि सामाजिक रित्या स्त्री असणं “.या दोन भिन्न गोष्टी आहेत. समस्या ग्रस्त स्त्री नैसर्गिक रित्या जन्म घेत नाही तर समाज अशा स्त्रीला जन्म देतो.
आज एकविसाव्या शतकात त्याच महिला पुरुषांची बरोबरी करू शकतात. ज्या पुरुषांसारख्या वागतात म्हणून मग प्रत्येकीची धाव पुरुषांच्या बरोबरीने कमाई करणे, तसे ड्रेस घालणं, एवढेच नाही तर व्यसन करण्यापर्यंत .
नाहीतर दुसरी बाजू म्हणजे वेगवेगळ्या नातेसंबंधांमध्ये , स्त्री म्हणजे सर्वच कुटुंबाची सेवा करणारी ,सर्वांची चिंता करणारी ,काळजी घेणारी अर्थात अशीच असली पाहिजे. तिचा व्यक्ती म्हणून जगण्याचा स्वीकारच नाही. वरील दोन्ही चौकटी समाजाने तयार केलेले आहेत आणि प्रत्येक स्त्रीने त्या स्वीकारल्या आहेत.
प्रत्येकाच्या जीवन जगण्याचा हक्क स्वीकारणे. त्याला जगू देणं .प्रसंगी मदत करणं .मानवतेच्या या काळाची ही गरज आहे.
स्त्रीला स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा. तिच्या व्यक्तीत्वाचा आदर करण्याचा. लिंगभिन्नते शिवाय व्यक्ती म्हणून स्वीकारण्याची जी गरज आहे .हे तथ्य मुळात स्त्रीने स्वतः तरी स्वीकारले आहे का? हा आजच्या आधुनिक काळातील आधुनिक स्त्री पुढील मुख्य प्रश्न आहे.
आजही स्त्रीला वस्तू म्हणून बघितल्या जाते. ती स्वतःही स्वतःकडे तशीच बघते .असे जर नसते तर “आमच्याकडे कोणतेही कपडे घालण्याचे स्वातंत्र्य आहे.” ” आमच्या समाजात स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.” “आमच्या ह्यांना ती वटसावित्रीची पूजा वगैरे आवडत नाही.” ही वरील सर्व वाक्य स्त्रीच्या बाबतीत समाजात वापरले जातात .ही भाषाच सांगते हे एकतर स्त्रीला वस्तू म्हणून वागवणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषाच्या किंवा समाजाच्या संदर्भासहित जगणं आहे. तिचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वीकार नाहीच.
आता दुसरी बाजू बघताना आपल्या समाजात ही भाषा वापरल्या जाते का? की “आमच्याकडे पुरुषांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.” “त्यांनी कोणतीही पूजा केली तरी चालते किंवा नाही चालत “अशी भाषा पुरुष संदर्भात वापरली जात नाही .कारण त्यांनी स्वतंत्र जगण्याच्या स्वीकार आहे. तसा स्त्रीच्या संदर्भात मात्र नाही इतरांनाही नाही आणि स्त्रीला स्वतःलाही नाही.
अशा मतांसहित महिला सशक्तिकरण एक देखावाच असू शकतो .नाहीतर आजही दिवसा उजेडी महिला सुरक्षित नाहीत .एवढेच नाही तर ती आईच्या गर्भातही सुरक्षित नाही ही आजची परिस्थिती
ना शिक्षा के ना नोकरी के संदर्भ मे
नारी को आरक्षण दो मा के गर्भ मे
अशी आहे. महात्मा गांधी म्हणत असत की” रात्री बारा वाजता रस्त्यावरून फिरताना माझ्या देशातल्या पुरुष जितका स्वातंत्र्याने फिरतो .तितकीच माझ्या देशातली महिला फिरेल तेव्हाच हा देश सुरक्षित देश आहे असं मी माने ल.”
स्वामी विवेकानंद तर म्हणतात की “स्त्री पुरुष एकाच रथाची दोन चाके आहेत याच्याशी मी सहमत नाही. कारण एक मोडलं तर ते बदलल जाऊ शकत.(वस्तू रूप) किंबहुना स्त्री आणि पुरुष म्हणजे एका पक्षाचे दोन पंख आहेत .जर त्यात समतोल नसेल तर हवेचा रोख पकडून समाजाला प्रगतीचा वेग धरता येणार नाही.
स्त्रीला स्वतःच्या जाणीवा विकसित करायला संधी दिल्या गेल्या पाहिजेत .अशा संधी स्त्रियांनी स्वतः ओळखल्या पाहिजेत प्रसंगी त्याकरिता धोके ही पत्करायला पाहिजेत.
आपण कितीही आधुनिक झालो .तरी अदृश्य काचेच्या भिंती मधले आपण सर्व गुलाम आहोत. या काचेच्या भिंती कधी दिसण्याच्या असतात. तर कधी असण्याच्या. म्हणून त्या पाहण्याची आणि त्यांना पार करण्याची क्षमता निर्माण करण्याची खरंतर आवश्यकता आहे.
स्त्रीसशक्तिकरणाची सबलीकरणाची गरज आहे. मुख्य म्हणजे सशक्तिकरण हा शब्द आलाच का? कारण अशक्तता आलेली आहे. आणि अशक्तता आली म्हणजे आधी सशक्त होते. हा त्याचा पुरावा आहे. अर्थात आज शक्ती नष्ट झाली आहे. जेव्हा शक्तीची गोष्ट येते तेव्हा आपण फक्त शारीरिक शक्तीचीच गोष्ट करतो .ज्याने बाह्य स्तरावरील युद्ध जिंकल्या जातात. परंतु शक्ती ही केवळ बाह्य /शारीरिकच नसते. तर आंतरिक शक्ती जीला आपण चारित्र्याची शक्ती ही म्हटलं जाऊ शकते. ही शक्ती आपल्याला युद्ध जरी जिंकून देऊ शकत नसली परंतु विश्व परिवर्तन मात्र करू शकते.
स्त्रीमध्ये मुळातच बदल स्वीकारण्याची आणि टिचून काम करण्याची अपारशक्ती आहे आणि असते. श्रद्धा सतीत्व हे तिचे नैसर्गिक वरदान आहेत. परंतु आजूबाजूच्या वातावरणाने संस्कृती टिकवण्यासाठी तिच्यामध्ये अनेक प्रकारच्या भीती घातल्या गेल्या. ज्यामुळे तिच्यात न्यू नगंड निर्माण झाले. त्यातून ती स्वतःचा अनादर करत गेली. स्वतःला कमी लेखत गेली. स्वतःला शक्तीहीन बनवत गेली. जेव्हा या सर्वांचे जाणीव झाली. तेव्हा न्यूनगंड घालवण्यासाठी पुरुषांची बरोबरी करत गेली. म्हणून मग पैसे कमावणे, तसा पेहराव करणे ,जे पुरुष करतात त्या नोकऱ्या करणे तसेच शिक्षण घेणे. असे करता करता पुरुषांशी तुलना आणि स्पर्धा होऊ लागली .आणि तिचे एक HYBRIDISED VERSION (बांडगुळ) तयार झाले. जे स्त्रीला स्वतःलाही अपेक्षित नव्हते. कदाचित संदर्भासहित जगण्याचे हे दुष्परिणाम असावेत.
मानवी मेंदूचे दोन भाग आहेत .डावा आणि उजवा डावा भाग हा व्यवहारिक तर उजवा भाग हा भावनिक असतो. सामान्यतः पुरुष हे व्यवहारी आणि स्त्रिया भावनिक गणल्या जातात .नैसर्गिक रित्या दोघांचा समन्वय.
परंतु आता स्पर्धा आणि तुलनेमध्ये ती पण व्यवहारी व्हायला लागली .त्यातून नैसर्गिक सामाजिक असंतुलन तयार झाले .जेव्हा की मानवी अस्तित्वच मुळी भाव आणि भावना आहेत जे सर्वोपरी आहे.
संत कबीरदास आपल्या दोह्यात म्हणतात
खुदी को कर बुलंद इतना की
हर तकदीर से पहले
खुदा बंदे से पूछे
बता तेरी रजा क्या है?
ये खुदी को बुलंद करना है . हीच मानवी शक्ती आहे. हीच मानवी शक्ती प्रत्येकाला तेजोमय बनवेल. मग तो स्त्री असो की पुरुष .हा भावच प्रत्येकाची ताकद आहे .हीच नारीशक्ती जी पुत्राला पुरुष बनवते.
हीच अंतरिक तेजस्विता वाढवली तर आपोआप स्वतः विषयीचे स्वत्व तयार होईल .तरच बाहेरचे प्रश्न समस्या वाटणार नाहीत. बाह्य परिस्थिती समस्या का वाटते? कारण आंतरिक शक्ती कमी पडते.
अशा प्रकारची मनस्थिती तयार कशी होते तर विचारांनी. सकारात्मक आणि नकारात्मक विचारांनी .सकारात्मक विचार सकारात्मक भाव तयार करतात. आणि नकारात्मक विचार नकारात्मक भाव तयार करतात.
स्त्रीचा नैसर्गिक स्वभाव परिवारोंमुख समाजभिमुख आहे. अर्थात पहिले परिवार आणि मग समाज .पुरुषाचे नेमके उलटे आहे समाजोंमुख परिवार भिमुख पहिले समाज मग परिवाराकडे लक्ष.
आणि समाजाचा आधारस्तंभ परिवार .परिवाराचा आधारस्तंभ स्त्री. स्त्रीचा आधारस्तंभ तीच व्यक्तित्व आणि तिचा व्यक्तित्व म्हणजे तिचे आंतरिक ताकद. तीच तिची तेजस्विता .ज्या प्रकाशात तिला मला काय पाहिजे? त्यासाठी मी काय करू शकते ?पासून परिवार कसा? त्याला काय पाहिजे ?कसे मिळवायचे ?चे पर्यंतच्या सर्व प्रश्नांची उकल होते .
असे जगणे सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे- संदर्भासहित जगण्याच्या अदृश्य भिंती फोडाव्या लागतील. त्यासाठी माझ्या जगण्याची जबाबदारी मला घ्यावी लागेल.
सशक्त होऊ पाहणाऱ्या प्रत्येक मानवाला स्त्री-पुरुष बिरुदाशिवाय स्वतःच्या जगण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. तेव्हाच बाहेरचे जग ,बाहेरचे कपडे, फॅशन वर्ल्ड आपल्यावर हावी होणार नाहीत.
याकरिता समजदार व्यक्तीच पुढाकार घेऊ शकेल आणि इतरांना पुढाकार घेण्याचं बळ देऊ शकेल. अशा प्रकारचं बळ देणं म्हणजेच देणे आहे .”कारण देणे म्हणजेच घेणं आहे.”
सीडिया पुणे मुबारक हो उन्हे जीन्हे छत तक जाना है हमारी मंजिल तो आसमा है रास्ता हमे खुद बनाना है.
आपला वारसा ,आपली संपत्ती, पैसा अडका असूच शकत नाही. प्रत्येकाचा वारसा -आपण आपल्या आयुष्यात किती लोकांना भेटलो? कसे भेटलो? किती आनंद देऊ शकलो ?आपण आपले आयुष्य किती मनापासून भरभरून जगलो? मी माझ्या आंतरिक तेजोमय तेच्या विकासासाठी माझ्या व्यक्तित्वाचा कसा उपयोग केला? हा आपला वारसा आहे. हा निर्णय ,हे जगणं महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच मग तीमिरतूनी तेजाकडे……
करिता…
आभाळाएवढी ज्याची उंची त्यांनी थोडं खाली यावं
मागे राहिलं ज्याचं जीवन त्यांना थोडं पुढे न्यावं
ज्याच्या जीवनात आहे अंधार त्यांना थोडा प्रकाश द्यावा.
!!श्री माऊली चरणी अर्पण!!
अश्विनी गावंडे
वैचारिक मंथन होणारा सुंदर लेख.मुळात स्त्री पुरुष वादच नको.काही प्रश्न सहज सुटत गेले लेखनशैली खुपच छान आहे.
खरंच तिमिराकडून तेजाकडे या शीर्षकाला अगदी साजेसा आणि समर्पक असा हा लेख आहे असं मला वाटलं आणि त्यानिमित्ताने बऱ्याचशा गोष्टी ज्या माहिती नव्हत्या त्या सुद्धा समज ल्या .तसंच जर आपल्या समाजाने स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून समजलं व तिचं अस्तित्व जपू दिल तर खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा केला असं हा लेख वाचून मला वाटते
खूपच अप्रतिम,,सुंदर शब्दलेखन
“तिमिरातुनी तेजाकडे”******अंतर्मन ढवळून टाकणारा अप्रतिम आरशासारखा स्वच्छ , स्पष्ट लेख, प्रतिक्रिया द्यायला माझ्याजवळ शब्दच नाहीत.
तुमचा लेख कविता लिहिण्यासाठी मला प्रेरणा देऊन गेला.WITH GRATITUDE.🙏🙏🙏💐 जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
“तुझ्यात तूच राहते, युगांतरी वाहते.
तूच नित्य हेच सत्य, तरी का शहारते?
सृजनसुक्त तुझेच फक्त, दिगंतरी निनादते.
आस तुझी ,श्वास तुझा ,गौण का मानते?
द्वैत तू अद्वैत तू ,शिव-शक्ती एक तू.
तुझ्याशिवाय तू अपूर्ण, हेही तूच जाणते.
सुखरूप स्वरूप तुझे, तेजोमय शांती तू.
तिमिरात हरवले स्वतःस,हेही तूच मानते.
तुझा तुझ्यात शोध घे, अंतरातल्या तळी.
चैतन्यचांदण्यातली, सापडेल उन्मेश कळी.
तुझ्याच विश्वअंगणी, बहराच्या पाऊलखुणा.
स्पंदनात स्मरून घे, तूच तुझा अमरपणा.
***वैशाली टेंभे.(उज्जैनकर.)
🙏🙏💐💐🙏
स्वतः चे अस्तित्व हरविलेल्यांसाठी आधुनिक संदर्भासह सकारात्मक दृष्टिकोन देणारा व अंतर्मुख करणारा लेख.
स्त्री , पुरषाकडे असलेल्या वेगवेगळया शक्तीमुळेच सृष्टी सुंदर बनते . तुलना, भेद झाल्यावर संघर्ष होणारच .
अप्रतिम लेखन
सुंदर आणि अप्रतिम लेख..
प्रेरणादायी लेख,आंतरिक शक्ती वाढवणारा.
नमस्कार
सर्व प्रतिसाद देणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🙏
“तिमिरातून तेजाकडे” या लेखाचे अवधानपूर्वक वाचन करत असताना लेखिकेच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडत होते. प्रस्तुत लेख हा इतरांसाठी प्रेरणादायी व उद्-बोधनात्मक नक्कीच आहे. तसेच प्रस्तुत लेखना मध्ये त्रिकालाबाधित सत्यावर आधारित अनेक वाक्य आलेली आहेत, जसे की स्त्रीला श्रद्धा व सतीत्व याचे नैसर्गिक वरदान मिळालेले आहे, स्त्री मध्ये मुळातच बदल स्वीकारण्याची अपार शक्ती असते, तसेच सर्वात जास्त भावलेलं वाक्य म्हणजे “स्त्री व पुरुष एका रथाची दोन चाके नसून ती एका पक्षाची दोन पंखे आहेत” पंखात समतोल असेल तरच जीवनाचं गाड यशस्वीपणे हाकल्या जाऊ शकते. गांधीजींच वाक्य स्री ची महती पटवून देणार आहे प्रत्येक स्री चा आदर करणे हेच तिचा सन्मान होय, तसेच स्री-पुरूष एकमेकांस पूरक आहेत, म्हणून प्रत्येक स्रीला आदरयुक्त वागणूक मिळायला हवी हा बोध घेण्यासारखा आहे, अतिउत्तम, अप्रतिम स्री ची महती पटवून देणारा लेख…
🙏🙏🙏
“तिमिरातून तेजाकडे” या लेखाचे अवधानपूर्वक वाचन करत असताना लेखिकेच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडत होते. प्रस्तुत लेख हा इतरांसाठी प्रेरणादायी व उद्-बोधनात्मक नक्कीच आहे. तसेच प्रस्तुत लेखना मध्ये त्रिकालाबाधित सत्यावर आधारित अनेक वाक्य आलेली आहेत, जसे की स्त्रीला श्रद्धा व सतीत्व याचे नैसर्गिक वरदान मिळालेले आहे, स्त्री मध्ये मुळातच बदल स्वीकारण्याची अपार शक्ती असते, तसेच सर्वात जास्त भावलेलं वाक्य म्हणजे “स्त्री व पुरुष एका रथाची दोन चाके नसून ती एका पक्षाची दोन पंखे आहेत” पंखात समतोल असेल तरच जीवनाचं गाड यशस्वीपणे हाकल्या जाऊ शकते. गांधीजींच वाक्य स्री ची महती पटवून देणार आहे प्रत्येक स्री चा आदर करणे हेच तिचा सन्मान होय, तसेच स्री-पुरूष एकमेकांस पूरक आहेत, म्हणून प्रत्येक स्रीला आदरयुक्त वागणूक मिळायला हवी हा बोध घेण्यासारखा आहे, अतिउत्तम, अप्रतिम स्री ची महती पटवून देणारा लेख…
🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय अश्विनी ताई,
सप्रेम जय हरि !!!
महाशिवरात्री चं औचित्य साधून प्रसिद्ध केलेलं मार्गदर्शन मनाला खूपच भावलं.त्या संदर्भात लेख हा शब्द मनाला थोडासा खटकलाच, प्रवचनातून किंवा किर्तनातून दृष्टांत रुपाने कथित केलेल्या कथांना जसं गोष्ट म्हणून संबोधलं तर मनाला खटकतंच कारण गोष्ट ऐकून सोडून दिली तरी चालते पण दृष्टांत हृदयात स्थान करुन बसतो व चिंतनाने साध्या पर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतो.आपल्या सादरीकरणातून हिंदू संस्कृती चं आणि परंपरांचं दर्शन तर घडतंच ,आणि आध्यात्मिकतेचं प्रगल्भ ज्ञान खगोलशास्त्राच्या माध्यमातून सिद्ध करण्याची सर्वांनाच सहज पटेल यांची उकल करण्याचा यशस्वी प्रयत्न बरंच काही सांगून जातो.यातूनच उत्सव साजरे करण्याचे महत्व सहजच पटते.धन्य भारत देश!धन्य यश्य परंपरा!
आपल्या देशातील अशाच उत्साहात साज-या होणा-या उत्साहाचं सादरीकरण लिखित स्वरूपात होउन लोकांचा अध्यात्माकडे वळण्याचा कल विकसित व्हावा हीच तुझ्या कडून अपेक्षा.
तिमिरातूनि तेजाकडे ! हा लेख मनाला खूपच भावला.तिमिर म्हणजे अंधार आणि तेज म्हणजे प्रकाश म्हणजे च अंधाराकडून प्रकाशाकडे हा शब्द:ना अर्थ असलातरी तिमिर म्हणजे अज्ञान व तेज म्हणजे ज्ञान हा गुह्य अर्थ सांगण्याचा उद्देश लक्षात ठेवूनच एकविसाव्या शतकाच्या दिशेने वाटचाल करणारे आपण स्त्रियांबद्दल विचार करण्याच्या बाबतीत किती उदासीन आहोत याचं फारच छान उकलन आपल्या बुध्दि कौशल्याने केले आहे.किंग आर्थुर (राजांचे) उदाहरण देऊन स्त्रियांना नक्की काय हवं असतं हे पटवून दिलं आहे.महात्माजींना स्त्रियांबद्दल असणारा आदरभाव व्यक्त होतोच,पण
विवेकानंदांनी केलेल्या श्त्री-पुरुष रथाची दोन चाकं असतात पण श्त्रीरुपी एक चाक खराब झालं तर बदललं जावू शकतं.जशी श्त्री एखादी वस्तू आहे असं बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन किती बेजबाबदारपणाचा आहे हे तुमचं धाडस कौतुकास्पद आहे .पुरुषी अहंकाराच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.त्यासठी पक्षाच्या पंखांची उपमा फारच योग्य आहे.आपल्या लेखाने प्रेरित होऊन कु.वैशाली दीदी ला सुचलेली कविता बरेच काही सांगून जाते.तरिहि शिवरायांना जन्म दिलेल्या जिजाउंचं
महत्व कधिच कमी होत नाही .केवळ आणि केवळ अशा अनेक जिजाऊच अनेक शिवाजींना जन्म देऊ शकतात आणि घडवू शकतात. धन्य जिजाऊ आणि धन्य शिवराय!!!
🙏🙏🙏
स्त्रीचा सन्मान म्हणजे तिच्या आयुष्यातील निर्णय तिला घेऊ देणे, तिच्या विचारांचा आदर करणे, हा संदेश चेटकिणीच्या कथेतून खूपच सुंदर पद्धतीने समजावून सांगितला आहे तसेच पक्षाच्या पंखांची उपमा देऊन स्त्री ला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान देण्यातच समाजाला प्रगतीचा वेग साधता येईल अशा आशयाचे विचार मांडणे खरंच खूपच ग्रेट आहेत, सखोल ज्ञान, भारदस्त लिखाण, स्त्रियांच्या सन्मानाविषयीची आंतरिक कळवळ हे सर्व खूपच हृदयाला भिडणारे आहे.खूप खूप धन्यवाद Mam 🙏🙏🌹🌹