wondervoices

नित्य उत्सव

भारतीय संस्कृती ही नित्य उत्सवाची संस्कृती आहे. वर्षातील 365 दिवस उत्सव साजरे होणारी संस्कृती. कारण भारतीय संस्कृतीचा पायाच मुळी मानवी जीवन नित्य उत्सव असण्याचा आहे .भारताचा प्रत्येक सण- उत्सव हा पंचांग अर्थात कॅलेंडरची निगडित आहे. आणि पंचांग हे खगोलशास्त्राशी.

त्या अर्थाने आपण सर्व मानव या विश्वाचे घटक आहोत. आणि प्रत्येक खगोलीय घटनेचा जसा अखिल ब्रम्हांडावर परिणाम होत असतो. तसाच तो मानवावर होत असतो. थोडं वैज्ञानिक दृष्ट्या समजून घेतलं तर.BIG BANG THEORY नुसार 14 अब्ज वर्षांपूर्वी बिग बँग झालं. पाचशे कोटी वर्षांपूर्वी सूर्यावर एक शक्तिशाली उपग्रह आदळला आणि त्याचे काही तुकडे निखळून बाहेर पडले. ते 250 कोटी वर्षापर्यंत जळत राहिले. त्यानंतर 250 कोटी वर्षांनी पृथ्वीवर एकपेशीय सजीव अवतरला. आणि जीवन सुरू झालं.

दहा लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर माणसाचं अवतरण झालं. 30000 वर्षापासून माणसाची भाषा विकसित झाली. आणि दहा हजार वर्षापासून संस्कृती विकसित व्हायला लागली. त्याच सांस्कृतिक विकासाने भारतीय मानवाला मानवी जीवन म्हणजे नित्य उत्सवापर्यंत पोहोचवलं. यात फक्त सण समारंभांचा समावेश नाही .तर व्रतवैकल्य सुद्धा उत्सव स्वरूपात साजरे केले जातात. आणि त्यातीलच एक महापर्व म्हणजे महाशिवरात्री.

तशा तर दर महिन्याला अमावस्येच्या आधी म्हणजे प्रत्येक चौदस ला शिवरात्री येते. परंतु माघ महिन्यातील किंवा EQINOS (EQINOS म्हणजे ज्या दिवशी पृथ्वीवर बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते असे दोन दिवस 21 मार्च आणि 22 डिसेंबर) च्या आधी येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्रि म्हटल्या जाते .पंचांगानुसार या दिवशी सूर्य कुंभ राशीत तर चंद्र मकर राशीत असतो .सूर्य आत्म्याचे तर चंद्र हा मनाचे प्रतीक मानला जातो . सूर्य आणि चंद्र शनिच्या राशीत बसून आपल्या स्वगृही राशीला बघतात त्यांच्या अशा भौगोलिक स्थितीने जी की खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ मानल्या जाते. ब्रम्हांडात एक प्रकारची ऊर्जा तयार होते. आणि मानव जर स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी सजग असेल तर त्याला अशा परिस्थितीचा उपयोग करून घेता येतो.

भारतीय संस्कृतीमध्ये कित्येक असे सण, समारंभ, वृत्तवैकल्य केल्या जातात ज्यामध्ये ग्रहगोलांच्या खगोलीय संरचनेचा उपयोग मानव विकासासाठी करून घेतल्या जातो. ज्यातून मानवामध्ये परिवर्तन घडवून येऊ शकते अर्थात उर्ध्वगामी दिशेने.

या सर्व खगोलीय घटनांचा परिणाम मानवावर होणे अगदी स्वाभाविक आहे कारण मानवी शरीर या ब्रह्मांडातील पंचमहाभूतांनीच बनलेली आहे. कारण मानवाच्या शरीराची रचना ही पृथ्वी सारखीच आहे. म्हणजेच मानवाच्या शरीरातही पृथ्वी सारखे दोन तृतीयांश पाणी आहे. मानवी शरीर या पृथ्वी मधूनच तयार झाले आहे. जसे अमावस्येला आणि पौर्णिमेला समुद्रात भरती येते. त्याचप्रमाणे मानवामध्येही जे गुण (कारण गुण हे तरल असतात .)असतील त्यांचे व्यवहारात प्रकटन होते.

परंतु असे नित्य उत्सव अर्थात आनंदी, प्रेममयी, शाश्वत जीवन जगता जगता, एकविसाव्या शतकाच्या आधुनिक युगात मानवाला दुःख, विरोध ,चिंता शाश्वत केव्हापासून वाटायला लागली ते कळलेच नाही. दुःख, विरोध, चिंता, घृणा द्वेष ,राग ,नकारात्मकता ,उदासीनता या सर्व भावनांनी मानवाला जखडलं. त्यामुळे मानवाला स्वतःला तो शक्तीहीन वाटायला लागला .आणि अमावस्या पौर्णिमा वेगळं काही करत नाही तर मानवी मनात ज्या भावनांचा प्राबल्य असतं जे त्याला शाश्वत वाटते ते प्रकटन करण्याचं काम अमावस्या आणि पौर्णिमा करतात बाकी काही नाही.

मानवामध्ये या सर्व नकारात्मक भावना असणे जर त्याला संसार वाटायला लागला तर, जे मानवाला संसार वाटतो तोच मानवाचा संस्कार होतो म्हणून “जसा संसार तसा संस्कार.”

परंतु मानवी मन मात्र हा संस्कार मुळापासून स्वीकारायला तयार नाही. “कारण ही सत्यता जरी असली तरी स्वीकार्यता नाही “आणि “जी स्वीकार्यता नाही ती सत्यता नाही.”

जसे मानवाला मर्त्य म्हटले तरीही तो मर्त्य आहे .हे तो स्वीकारायला तयार नाही कारण तो अमर आहे. असे लिहायला सहजी मन तयार होत नाही. कारण अशा लिहिण्याला गुढता आणि रहस्यमयतेची झालर चिकटू शकते.

परंतु ऊर्जा अक्षयतेचा नियम काय सांगतो “ऊर्जा निर्माण होत नाही किंवा ती नष्टही होत नाही. फक्त तिचे परिवर्तन होत असते.” तर जर मी ऊर्जा आहे तर निर्माण आणि नष्ट होणे हे माझे गुणधर्म नाहीतच. फक्त परिवर्तन हीच शाश्वतता आहे.

मानव हेही कधी मानायला तयार नाही की माझे संस्कार दुःख, विरोध ,चिंता आहेत . कारण मानवाचा मूळ स्वभाव तर आनंद आहे . हा आनंदच तर ऊर्जा आहे.

मग मी इथे गुंततो कसा? कारण अज्ञान. कारण अंधकार.

जसा अंधकार म्हणजे प्रकाशाचा अभाव तसाच अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव.

ज्ञान प्राकृतिक रित्या संपादन करण्याचा व स्वतःमध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचे पर्व म्हणजे शिवरात्रीचे पर्व .

ईशा फाउंडेशनचे सद्गुरु म्हणतात. महाशिवरात्रीच्या रात्री पाठीचा कणा ताठ असावा कारण पृथ्वी ज्या आसावर फिरते तो तिचा आस तिरपा आहे. हे वैज्ञानिक सत्य आहे. त्यामुळे पृथ्वीच्या परिवलनाने जे अपकेंद्रीय बल तयार होते त्याची ऊर्जा वरच्या दिशेने कार्यरत होते. त्याचा फायदा मानवाने शिवरात्रीला आडवे न होता पाठीचा कणा सरळ अर्थात ताठ ठेवून करून घेतला पाहिजे. कारण पृथ्वीच्या वर उठणाऱ्या ऊर्जेचा फायदा पृथ्वीवरील मानवाला सहज करा करून घेता येईल. याची अनुभूती या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या ऋषीमुनींनी आणि आताही त्या दृष्टीने काम करणाऱ्या लोकांनी घेतलेली आहे. ज्याला पूर्ण मानव अर्थात मानव असण्याच्या पूर्ण क्षमता चा विकास करायचा आहे. त्यानी सर्वांनी खगोलीय गोष्टींचा उपयोग करून घ्यावा.

यामागे वैज्ञानिक तथ्य हे आहे की जस जसा मानव दोन पायावर चालू लागला अर्थात ताठ होऊ लागला तसतसा मानवाचा मानसिक विकास होत गेला .म्हणजे पाठीचा कणा ताठ असण्याचा आणि मानवी क्षमता उजागर होण्याचा सहसंबंध इथे स्पष्ट होतो.

ओम शांती च्या विचारधारेनुसार शिवतत्व म्हणजे काय ?जे या महाशिवरात्रीला प्रकट होते. अखिल विश्वात पसरलेल्या अनियंत्रित ऊर्जेला नियंत्रित स्वरूपात व्यक्त करू शकणारे तत्त्व म्हणजे शिवतत्व होय. जसे पाण्यात राहणाऱ्या माशाला पाणी काय ?हे कळत नाही कारण तो पाण्यातच राहतो .माशाला पाणी काय हे कळण्यासाठी त्याला पाण्याबाहेर येऊन पाणी बघावे लागेल. जे की अशक्य आहे.मनुष्य सुद्धा असाच या ब्रह्मांडाच्या ऊर्जेत राहतो. त्यालाही त्या बाहेर निघून या ऊर्जेचे दर्शन होणे अशक्य आहे.

परंतु मानव म्हणजे शरीर नाही तर चैतन्य आहे .चैतन्य शक्तीची ही ऊर्जा समजण्याची पात्रता आहे. फक्त ती विकसित करावी लागते आणि ती विकसित करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री.

आधीच बघितल्याप्रमाणे शिवरात्री म्हणजे पृथ्वीवर रात्र सुरू आहे आणि पृथ्वी परिवलन आणि परिभ्रमण करत असते .रात्रीच्या वेळी सूर्याच्या विरुद्ध बाजूला उत्तर गोलार्ध आहे. (अर्थात सूर्य हा पृथ्वीच्या खाली असतो) त्याची ऊर्जा पृथ्वीला निरंतर मिळतच असते मग पृथ्वीवर राहणारा मानव कोणत्याही देशात बसला फक्त सरळ बसला. पाठीचा कणा ताठ ठेवून .तर सूर्याच्या उर्जेचा फायदा मानवाला त्याच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी होऊ शकतो अर्थात ही प्रत्येकाची आपापली सजगता आहे. आणि आपापली मान्यता आहे.

कारण चैतन्याचा विकासक्रम सुद्धा मानण्यापासून जाणण्यापर्यंत आहे.

ज्याप्रमाणे शिवलिंगाची पूजा करताना ,त्यावर कलश बांधल्या जातो त्यातून एक एक पाण्याचा थेंब शिवलिंगावर पडत जातो. त्याप्रमाणेच ज्ञानाच्या एकेक थेंबानेच माणसाचे सुद्धा अज्ञानरूपी झोपेतून जागरण सुरू होते.

यातील ज्ञानाचा पहिला थेंब म्हणजे- हे शरीर, ही संपत्ती ,हे नातेसंबंध ,हा मानसन्मान माझा आहे. परंतु हे मी नाही. काम ,क्रोध, दुःख ,दारिद्र्य ,मद,मत्सर ,चिंता, विरोध ह्या माझ्या मनीच्या भावना आहेत पण त्या भावना म्हणजे मी नाही.

हां परंतु पवित्रता ,शांती ,प्रेममयता ,परस्पर स्नेह ,विश्वास ह्या भावना जेव्हा येतात तेव्हा तिथे मात्र मानवाला मी स्वतः आहे. हे प्रतीत होते.

त्याला कळते शक्तीहीनता तर माझ्या मनात, विचारात आहे .परंतु मी न मन आहे ,न विचार. नक्कीच हे मन आणि हे विचार माझे आहेत परंतु मी हे नाही .मी तर शांती, आनंद ,प्रेममयता आहे. शक्तीहीनता जरी मला वाटत असली परंतु मी तर अक्षय बलं शक्ती संपन्न आहे. हे सर्व मानवाला स्वीकार्य आहे आणि “जे स्वीकार्य आहे ते सत्य आहे.”

ज्ञानाचा दुसरा थेंब म्हणजे काल. मी तर मला कालातीत वाटतो. अमर वाटतो.माझी भारतीय संस्कृती चार युगाचा प्रवास करत आली आहे. सत्य ,द्वापार , त्रेता युगातून कलियुगात आली आहे.आणि हे जर कालचक्र आहे. तर पुन्हा या पुढचा पडाव सत्ययुगच आहे .म्हणजे कालातीत अमर पवित्र असणारा मी कालौघात मलीन होत होत शुद्ध होण्याच्या मार्गावर येत आहे .कारण प्रत्येक सूर्यास्ताचे रूपांतर सूर्योदयातच होते. अर्थात माझा प्रवास पवित्रता ते अपवित्रता आणि पुन्हा……………. हा आहे.

कारण माझे मूळ स्वरूप शुद्ध पवित्र आहे. जे कधी बदललेच नाही मग बदललं काय ? तर माझे विचार आणि मी माझ्या अज्ञानी विचारांनाच सर्वस्व मानलं.

ज्या शक्ती प्रेम शांती ज्ञान आनंदाचा शोध मी बाहेर घेत होतो मी तर प्रत्यक्षात तोच आहे. हेच शाश्वत सत्य आहे. सतत हेच ध्यानात रहावे म्हणून काय करावे? उपवास. अर्थात सर्व दैनंदिन कार्य करताना ज्ञानाचा सहवास म्हणजेच उपवास. कोणत्या ज्ञानाचा सहवास मी चैतन्य असण्याचा ,मी ऊर्जा असल्याचा ,मी शांती ,पवित्रता आणि आनंद असण्याचा असे केल्याने आपण कर्म बंधनातून मुक्त होऊ आणि कर्म बंधनातून (कर्मातून इच्छेनुरूप फळ मिळण्याच्या विचारातून मुक्त) मुक्त होणे म्हणजेच कर्मयोगी होणे .कालांतराने कर्मयोगी स्वतःच ज्ञान होऊन जातो. मग असे परिवर्तन कुठे प्रतिबिंबित होईल तर माझ्या वाणी आणि कृतीतून.

महाशिवरात्रीच्या दिवशी मी शिवलिंगाला पृथ्वीवरची सर्वात विषारी फुले आणि फळे अर्पण केलीत. या विष तत्त्वाच्या रूपात माझ्यातील नकारात्मक भावना मी परमात्म्याला अर्पण केल्या. सर्व विश्वाचे हलाहल ज्याने पचवले .त्यांने माझेही हलाहल पचवले आणि मला काय दिलं ? अतींद्रिय आनंदाची झिंग. ज्याचे प्रतिकात्मक स्वरूप महाशिवरात्रीची भांग मानल्या जाते. अतिंद्रिय आनंदाची झिंग ही तात्कालीक नाही तर स्थायी आहे. हेच जीवन भराच जागरण आहे. जीवनभराच्या जागरणाचा आरंभ मंत्र जपच्या उपासनेने करावा .मंत्र जप इथे अर्थ महत्त्वाचा नाही तर उच्चार महत्त्वाचा आहे.

श्रीमद् भागवतातही असे म्हटलेले आहे जो फायदा सत्ययुगात ध्यानाने ,त्रेता युगात यज्ञाने ,द्वापार युगात सेवा व पूजेने, मिळत होता तो किंबहुना त्यापेक्षा 100 पटीने जास्त फायदा मंत्र जपाने होतो .हाच नित्य उत्सव आहे.

!!श्री माऊली चरणी अर्पण!!

अश्विनी गावंडे

14 Responses

  1. महाशिवरात्री उत्सव का व कसा साजरा करावा ?या प्रश्नाचे अध्यात्मिक व वैज्ञानिक दोन्ही कारणे इतक्या सहजतेने मांडले व ते पटवून दिले .या प्रकारचे लेख वाचण्यासाठी आम्ही नेहमी उत्सुक असतो.धन्यवाद🙏🙏

  2. अप्रतिम! गहन विचारमंथन. व्यवहारीक ते पारमार्थिक वैचारिक प्रवास! वाचकांना स्पष्टता देणारा. व्यवहारीक जगत, विज्ञान, अज्ञान ते परमोच्च ज्ञान. किती प्रगल्भता!शब्दा- शब्दातून प्रवाहित होते. कसं सुचतं तुम्हाला इतकं गहन?GOD GIFTED आहात. 🙏 तुमच्या या अंतरीच्या ज्ञानदीपच्या प्रवासासाठी अंतःकरणापासून शुभेच्छा!
    🙏कृतज्ञतेसह महाशिवरात्रीपर्वासाठी शुभेच्छांसह प्रार्थना! 💐🙏

  3. अध्यात्मिक उन्नतीसाठी खूप सुंदर लेख . अनेक माहिती नसलेल्या बाबी या लेखामुळे कळाल्या .
    खुप खुप धन्यवाद

  4. खूपच मस्त लिहलंय मॅडम….वैचारिक पातळी वाढवणारा लेख ……. Thanks

  5. खूप छान लेखन एवढे सखोल अभ्यास करून आमच्या पुढे मांडले आहे ते आम्ही पूर्ण समजुन घ्यायला कमी पडतो आहे.

    खुप खुप धन्यावाद

  6. सर्व प्रतिसाद देणाऱ्या विभूतीना मनःपूर्वक अभिवादन.
    आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ नसताना आपण सर्वांनी लेक वाचून आपल्या प्रतिसाद नोंदवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  7. विज्ञान आणि आध्यात्म यांची सांगड असणारा हा लेख वाचून समाधान वाटले

  8. आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या महाशिवरात्री चे महत्व विषद करून आपण अतिशय अभ्यासपूर्वक, आणि भारदस्त वैचारिक पातळी ची उंची गाठली आहे Mam, असे लेखन आमच्यापर्यंत वाचण्यासाठी अगदी सहज उपलब्ध होणे हे आमचे अहोभाग्यच आहे,खूप खूप धन्यवाद Mam 🙏🙏💐💐🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *