wondervoices

निर्माणकर्ता
शिवाजी महाराज म्हणजे व्यक्तित्व नाही. ते तेज आहे. तेजाला न वजन असते, न उंची, न खोली तेज फक्त दिपवणार असतं .संपूर्ण आयुष्यात मानव त्याच्या प्रत्येक पैलूची परिसीमा गाठून, किती उत्कर्ष साधू शकतो याच ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. मानवी जीवनाचा उद्देश तरी काय असावा ? “स्वतःचा विकास स्वतःच्या चारित्र्याचा विकास” हेच शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून प्रतीत होतं.
सृजन हे मानवी आयुष्याचे परमोच्य शिखर. एका व्यक्तीने दुसऱ्या मानवी जीवनाचे सृजन करावं. यापेक्षा मोठे काय ?अशा लाखो करोडो आयुष्यांचे सृजन या जाणत्या राजाने केलय.आज साडेतीनशे- चारशे वर्ष होऊन गेलीत. अजूनही मानवी मनांचे सृजन निरंतर सुरूच आहे. यापुढेही सुरूच राहील असे दिसते .यापेक्षा काय कर्तुत्व असू शकतं एका मरत्य मानवाचं. फक्त उत्कर्ष ऊर्जेचे अंतर्गमन करून. अमर्यादित.

आजही आधुनिक म्हटल्या जाणाऱ्या 21व्या शतकात आम्ही शिवाजी महाराजांकडून काय शिकावं? हे जर बाकी राहिलंच आहे. म्हणजे हा मराठ्यांचा राजा कालातीत आहे. हा अमृताचा समुद्र आहे ज्यात बुडणारा सामान्यतील सामान्य सुद्धा या अमृताच्या स्पर्शाने अमर होतो.
कारण शिवाजी महाराजांच्या जगण्याचं तत्वच होतं “आपल्याबरोबरचा प्रत्येक माणूस उंच झाला पाहिजे तो जर उंच झाला नाही तर आपण खुजे झालो म्हणून समजा.”
काळ कोणताही असो ,जग हे संपत्ती वर चालत, हे ज्ञात असलेल्या शिवबांनी एक तत्त्व नेहमी ध्यानी ठेवलं संपत्ती हे निर्माण आहे. संपत्ती निर्माण करणारा मानव आहे. म्हणून नेहमी माणूस जपला पाहिजे. ( एक मराठा लाख मराठा .मराठा जाती सूचक शब्द नसून “मरके भी नही हटा” या अर्थाने) असे पुरावे महाराजांच्या जीवनात ठाई ठाई दिसतात .मग तो मदारी मेहतर असो ,की शिवा काशिद ,की संकट समई सर्वात शेवटी राहणारा राजांचा मावळा. प्रत्येक वेळी राजांनी सर्वांची सोडवणूक करून मगच तिथून निघाले. ( Example of leading by example.)
हा छोटासा मदारी मेहतर जेव्हा महाराजांना सापडला आणि अनाथ आहे .असे कळले त्यांनी त्याला आपल्या सोबत घेतले. पुढे संभाजींना सोबत होईल म्हणून आग्र्यासही नेले. तिथून सुटल्यानंतर मदारी उत्तरेतून फिरत फिरत तब्बल आठ वर्षांनी रायगडी पोहोचला. तेव्हा रायगडावर राजांचा राज्याभिषेक होऊ घातला होता. शिवाजी महाराज आपल्याला अव्हेरणार नाहीत. या ओढीने तो तिथे पोहोचला. राजांनीही त्याला सांगितले “मदारी तू होतास म्हणून आज हा राजा आणि राज्य शाबूत आहे.” तेव्हा तुला मागायचे ते माग. मदारीने राज्य धनधान्य संपत्ती काहीही न मागता सेवा मागितली. म्हणाला राजे तुमच्या सिंहासनावर रोज जी शाल बदलली जाते ती बदलण्याचा अधिकार मला आणि माझ्या नंतर माझ्या वंश जाना मिळावा.ही पिढी जात सेवेचीसंधी मिळावी हीच प्रार्थना. जे आजतागायत चालू आहे.

स्वराज्यासाठी प्रत्यक्ष मरणाला तयार असणारे वीर महाराजांनी तयार केले. त्यांच्या मनामध्ये” राजे आपले कुटुंबकबिला आपण गेल्यावर कधीही उघडा पडू देणार नाहीत. हा विश्वास राजांनी त्यांच्या मनामध्ये निर्माण केला. मन जागवली आणि टिकवलीत. (Example of HRD & Retention) अशी काही उदाहरणे इतिहासात आणखीही सापडतील. तानाजी मालुसरे पासून बाजीप्रभू देशपांडे पर्यंत ते कान्होजी जेधेंपासून शिवा काशीद पर्यंत.

आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांकडे एकूण 18 किल्ले होते. आजच्या मॅनेजमेंटच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यानंतर त्यांनी स्वतःच SWOT ANALYSIS केलं .STRENTH,WEEKNESS, OPPORTUNITY,THREATS . पुढील सव्वातीन वर्षात महाराजांकडे 260 किल्ले होते .साल्हेर ते जिंजी. प्रत्येक किल्ला म्हणजे आजच्या भाषेत MIDC वसवण्यासारखा आहे. वयाच्या 38 व्या वर्षी महाराजांच्या कडे 466 किल्ले होते. प्रत्येक किल्ला म्हणजे आजच्या भाषेत एक कंपनी.
महाराजांनी घोडदळ वाढवलं. आता सैन्य फक्त संरक्षणासाठी नसून त्यांनी मोहिमेसाठी तयार केलं. शिवाजी महाराजांची स्वतःची चाळीस हजार घोड्यांची स्वतःची पागा होती. एक लाख शिलेदार होते म्हणजे जे स्वतःचे घोडे घेऊन फौजेत सामील होते. एकूण दीड लाखाचे घोडदळ दोन लाखाचे पायदळ.

आजही 136 देशात त्यांच्या गनिमी कावा या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो. तर जगातील 32 देशात त्यांचा इतिहास शिकवला जातो. फक्त बुद्धिमानच नाही तर प्रसंगी ताकतवर सुद्धा. (Example of flawless planning .) वरील प्रमाणेच अफजलखानाचा वध आग्र्याहून सुटका हेही अचूक नियोजनाचे प्रतीकच.

स्वराज्य म्हणजे एक संस्थाच होती महाराजांची .त्यांचं अष्टप्रधान मंडळ म्हणजे जबाबदारी आणि हक्क यांचा समतोल. प्रत्येक मंत्री प्रत्यक्ष निर्णय आणि जबाबदारी घेण्याच्या क्षमतेचा . म्हणून क्षमते इतकाच परतावा देखील. उदाहरणच द्यायचे झाले तर, त्यांचे मंत्री मोरोपंत पिंगळे त्याकाळी चाळीस लाख रुपये पगार घ्यायचे वार्षिक. (Example of organisation & empowerment.)
शिवाजी महाराजांमध्ये जे स्त्री-दक्षिण्य होतं. वयाच्या पंधराव्या वर्षी पासूनच त्याची झलक सर्वांना दिसली त्या संदर्भात रांझ्याच्या पाटलाच्या शिक्षेची गोष्ट इतिहासात सर्वश्रुत आहे. दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर असताना धारवाड कडे बेलवडी एक गाव होते. तिथे मल्लमा नावाची एक विधवा स्त्री होती. ती फार करामती होती. दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेदरम्यान तिने शिवाजी महाराजांच्या सैनिकांना सैन्याला बराच त्रास दिला कधी घोडे चोरून ने, कधी घोड्याचा चाराच ने,तर कधी धान्यच ने.एक ना अनेक तेव्हा महाराजांनी आपल्या एका सरदाराला तिच्या बंदोबस्तासाठी पाठवले त्या सरदाराने तेव्हा तिच्याशी गैरवर्तन केले. दरबार भरला. गुन्हा साबीत झाला म्हणून सरदाराचे राजांनी तिथेच डोळे काढून घेतले. आणि मल्लम माने शिवाजी महाराजांचे कर्नाटकात मंदिर बांधले. ताबडतोब शिक्षा. (Example of timely reward & punishment ) तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला सर करताना प्राणास मुकले. त्यामुळे कोणतीही व्यक्ती खास कामगिरीवर पाठवताना, राजे आधीच अशा व्यक्तीला सोन्याचे कडे आणि त्याचा सन्मान करायला लागले .स्वराज्याचे ब्रीदच त्यांनी ठरवले होते .”पराक्रमाला पुरस्कार आणि गुन्हेगाराला ताबडतोब शिक्षा”. (Example of incentive .)
शिवराय निर्माण करते आहेत . स्वतःचेही आणि स्वराज्याचेही. शिवाजी ते शिवराय हे निर्माणच होते.

आज पर्यंत शरण आलेल्या एकाही स्त्रीशी किंवा युद्धात धरलेल्या एकाही सैनिकाच्या स्त्रीशी कोणतेही गैरवर्तन केल्याची नोंद नाही कारण स्वराज्याचे तत्वच होते . स्वराज्यातील मावळ्यांनी. नैतिक मूल्यांशी तडजोड नाहीच.(Example of no compromise on core values.)
एकदा उदवेगाने औरंगजेब म्हणाला होता “सिवा की इतनी कम फौज है, फिर भी सिवा को फतेह क्यू हासिल होती है? मजबूत फौज के साथ ,मजबूत जमीर के लोग तयार किये है सिवा ने. जो खुद्दार खादीम है सिवा के .जो रुकते नही ,थकते नही, बिकते नही. मगर चाल चलन मे दूध की तरह साफ है .हम कितने खुश नसीब है .कि हमे दुश्मन मिला भी तो कैसा मिला ?सिवा के जैसा मिला.”
(Example of stainless character.)

मानवी आयुष्यातील सर्वात मोठे ध्येय म्हणजे स्वतःचे निष्कलंक चारित्र्य निर्माण करणे. ते महाराजांनी स्वतः तर केलंच परंतु या अमृताच्या समुद्राच्या जवळ जो गेला त्याचेही केले. त्यांनी सर्वांना आहे तिथून उचलून उच्च पदावर विराजमान केले.
ज्या काळात सत्ता भोगण्याच्या उर्मीपोटी मुगल शहजाद्यांना आपला बाप जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. असे वाटण्याच्या काळात शिवाजी महाराज म्हणजे कोहिनूरच.

शिवाजी महाराजांनी निसर्ग नियम आणि निसर्गक्रमाचा त्यांच्या निरीक्षण क्षमतेच्या बळावर खूप अभ्यास होता. त्यामुळे अनेक गड कोट किल्ले बांधताना आजही ४००० फुटावर एवढे दगड कसे नेले असतील. किंवा गडा खालच्या गावात प्यायला पाणी नाही आणि चार हजार फूट वर असणाऱ्या गडावर पाणी ओथबून वाहत असे .असे का घडावे? महाराजांना जमिनीतील पाणी शोधण्याची किमान 50 तंत्र तरी अवगत होती.(Example of supremacy of knowledge &keen observation)
जिथे किल्ला बांधायचा तिथे पहिले पाण्याचे तळे लागते का पाहणे .तेथील दगड काढून किल्ले तयार करणे(Example of zero budget costing ) सोबत रयतेला रोजगार मिळवून देणे.

राजांच हे सर्व चालविणारे सर्वात मोठे खातं म्हणजे आजच्या भाषेत मार्केटिंग आणि तेव्हाच्या भाषेतील हेर खाते. आपला शत्रू कोण ?मित्र कोण ?स्पर्धक कोण? त्याचं नेटवर्क किती ?त्याच प्रॉफिट किती ?त्याची क्षमता किती ? या सर्वांची ब्ल्यू प्रिंट जवळ असणार खातं.

शिवाय एक अधिकारी एक ठिकाणी एक वर्षाहून जास्त काळ एक ठिकाणी ठेवायचा नाही. गडाखालचा मनुष्य त्या गडावर कामाला ठेवायचं नाही. एवढेच नाही तर सतत मनुष्य कामात ठेवायचे. तीन पेक्षा जास्त अधिकारी फार काळ एकत्रित ठेवायचे नाही .तीन वेळा सक्तीची हजेरी. यामुळे स्वराज्याच्या कामकाजात शिथिलता येत नव्हती. आणि कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींची चर्चाही होत नव्हती हीच शिवनीती.
एवढीच शिवनीती किंवा शिव विचार नव्हता हे तर बर्फाचे टोक ( iceberg) आहे. फक्त दहा टक्के. 90% आणखी बाकीच आहे.

कर्मयोगातून लौकिक जगता पासून पारलौकिकतेपर्यंत पोहोचविणारा हा पहिलाच श्रीमंतयोगी असावा .म्हणून तर त्या युगाचा ,त्या स्वराज्याचा ,ते राहिलेल्या वस्तूंचा, त्यांनी वापरलेल्या गोष्टींना, एवढेच नाही तर त्यांनी स्पर्श केलेल्या गोष्टींनाही अनेकांनी भाग्यवंत म्हटलं आणि यापुढेही म्हणत राहतील.

रायगडावरील गंगासागर तळ्याचे पाणी महाराजांनी पिण्यासाठी वापरलं म्हणून गंगासागर किती पवित्र याचं वर्णन बाळ कोल्हटकर यांनी आपल्या या खालील ओळींमधून केले आहे.
जटा बांधून नटली धरणी, विशाल पलाश वृक्षांच्या
लता तरुना बिलगुन उठती, नाथ चालतो छायेचा
कुठे बांधल्या जलाशयावर ,जिना शोभतो दगडांचा
विहार चाले त्या पाण्यावर ,चक्रवाक कधी हंसांचा
कुठे चंदन, कुठे चमेली, गंध दरवळे चाफ्याचा
लवंग वेली कुठे वेलची लक्षण पुरतो संख्येचा
चंद्रमुखीच्या सवेच जेव्हा, चंद्र उगवतो पूर्वेचा
असे वाटते कमल फुलांनी जन्म घेतला आजच उदरी गंगेच्या
वरती गंगा खाली सागर वरती तारे येथे कमले
वरचे तारे खाली येती प्रतिबिंबाला रूपे पडती
म्हणून म्हणतो भूषण हे की आकाशाच्या गंगेहूनही गंगासागर भाग्याचा.

कारण यातून प्रत्येकजण ते व्यक्तित्व शोधतोय जो माझा भाग्योदय घडवेल. जो माझ्यातील अतिउच्च क्षमतेचे दर्शन मलाच घडवेल. माझ्यातील फुल्लिंग चेतवेल. माझं कर्तुत्व उजाळून टाकेल. माझ्या जीवनाला भव्यता देईल. दिव्यता देईल .जेव्हा की यात आपल्या प्रत्येकाला कुठेतरी माहित आहे .हे आपणच करू शकतो आणि आपल्यालाच करावे लागेल. याची वारंवार जाणीव करून देणाऱ्या त्या निर्माण कर्त्याला शतशः नमन.

अश्विनी गावंडे.

819 Responses

  1. आपल्या लेखात आपल्या लेखात प्रत्येक मुद्दा अगदी बारकाईने मांडला शिवाजी महाराजांची माणसा निवडताना जी सूक्ष्म ज्ञान होतं त्या प्रत्येक बाबीला आपण आवर्जून उल्लेख केला अगदी तलवारीच्याही पलीकडे राजांच्या विचारांची उंची आपल्या आपण आपल्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आपली खूप खूप अभिनंदन.

  2. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी लेख .

    1. ” निर्माणकर्ता” अप्रतिम लेख शिवचरित्राचा एक नविन पैलू खूपच सुंदर लेखन अश्विनी🎉

  3. Resp madam,thank you for such a new version of article

    wishing you the best!!!! Regards Yogeeta Sakharkar.

  4. 👌 उत्कृष्ट , अतिशय अभ्यासपूर्ण , महाराजांची सहकाऱ्यांविषयीची भावना व वागणूक , स्त्रीयाविषयीचा आदर , त्याकाळातही जमिनीखालील पाणी शोधण्याचे
    महाराजांना अवगत असलेल्या तंत्राविषयीची माहिती , तसेच औरंगजेबाने महाराजांविषयी केलेले वक्तव्य अशा भरपूर माहीतींनी परिपूर्ण लिखाण .

  5. शिवाजी महाराजांमधील अनेक उत्कृष्ट पैलू तुम्ही सहजरीत्या मांडले.

  6. अतिशय सुंदर लेख वाचून खूप आनंद झाला महाराज म्हणजे भुतोन भविष्यती असे व्यक्तिमत्व आणि तु तर अप्रतिम लेख संपादित केला

  7. ” निर्माणकर्ता” अप्रतिम लेख शिवचरित्राचा एक नविन पैलू खूपच सुंदर लेखन अश्विनी🎉

  8. निर्माणकर्ता… एक सर्वागसुंदर लेख…
    लेखाचे शिर्षक शिवाजी महाराजाच्या कार्यकर्तुत्वाला अगदी साजेसे असेच आहे. लेखामधे अगदी ओघवत्या भाषेत शिवबांनी केलेल्या कार्याचा उल्लेख आलेला आहे. लेख वाचतांना आदर्श व्यक्तीमत्वाचे शिवबा डोळ्यासमोर उभे राहतील असे सुंदर लेखन झाले आहे… अभिनंदन व शुभेच्छा

  9. छत्रपती श्री शिवराय माझ्या मनाचा अत्यंत जाज्वल्य आणि तितकाच हळवा, अलवार कोपरा आहे.राजांबद्दल वाचताना डोळे पाणावतातचं.अप्रतिम, अत्यंत अभ्यासपूर्ण लिखाण.क्षणभर असं वाटलं की आपण श्रीमान योगीच वाचतोय की काय इतकी तुझी लिखाणाची शैली ओघवती आणि प्रगल्भ आहे.असाच तुझा हात लिहीता राहू दे. 🕉️👍👌🌹🌹

  10. निर्माणकर्ता अप्रतिम लिखाण.अश्विनी तुझ्या शब्द शैली आणि माहिती चा साठा याला तोड नाही.
    जय भवानी जय शिवाजी

  11. खूप सुंदर लेख ज्यामध्ये स्पष्ट व प्रेरणादायी भाषा विशिष्ट पुरावे ,निष्कर्ष हे सर्व आले आहे. 👌👌

  12. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे, निर्मळ व शुद्ध चारित्र्याचे, तसेच त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचे इतक्या ओघवत्या शैलीमध्ये सहज सुंदर केलेले वर्णन हे मी आजपर्यंत महाराजांविषयी वाचलेल्या लेखनामधील सर्वोत्कृष्ट लिखाण आहे, खूप खूप धन्यवाद Mam 🙏🙏🌹🌹

  13. प्रेरणादायी अभ्यासपूर्ण माहिती लेख

  14. खूप सुंदर आणि वाचनीय लेख, छञपती शिवराय ही व्यक्ती नव्हे तेज आहे, खरंच अजूनही त्या तेजाची झळाळता लख्ख आहे.अशा ह्या तेजःपुंज शौर्य चे जे दर्जेदार मुद्देसूद लेखन करताना प्रत्येक छोटासा प्रसंग ही सुटला नाही हे विशेष.
    पाण्यातील बर्फाचे फक्त टोक च आपल्याला दिसते 10% तेवढेच शिवराय आपल्या बुद्धीला पेलतात.अन्यथा त्यांच्या तलवारी सारखे त्यांचे कर्तृत्व सुध्धा इतकं वजनदार आहे की आपण तुलना तर सोडा पण अभ्यासू ही शकत नाही.
    खूप सखोल अभ्यास करून लिहिले मॅडम तुम्ही.

  15. Excellent……The way you Captured Shivaji Maharaj’s bravery and leadership was truly inspiring. Keep up the great work!”👌👌👍

  16. खूप खूप अभ्यासपूर्ण लेखन आहे मॅडम….. लिखाणातील भाषा अप्रतिम आहे मॅडम….,🌹🌹🌹🌹🌹

  17. खुप छान लेखन निर्माण… शिवबा शब्दात मांडणे कठीण पण तुमचे लेखन म्हणजे आमच्यासाठी माहितीचा खजिना आहे. धन्यवाद मॅडम आणी अभिनंदन

  18. अप्रतिम लेखन स्वराज्यासाठी एका राजाने काय करावे खूपच छान जनते प्रती असलेल्या प्रेम आपल्या लेखातून दिसून येत

  19. Thank you so much to all .I m grateful to each &everyone for not only reading this article but also for placing u r comments.Which energies me for further writing.

  20. आदरणीय अश्विनी ताई,
    सप्रेम जय महाराष्ट्र!!!
    तुझं कोणतंही सादरीकरण माझ्या साठी ज्ञानेंद्रियांना तृप्त करण्यासाठी पेश केलेली अनमोल मेजवानी च असते,मग ते लिखित स्वरूपात असो,ध्एवनीफीत असो किंवा व्याख्यान स्वरूपात असो, मला एक विचीत्र खोड आहे पंचपक्वान्नातील मला आवडणारा पदार्थ मी आवडीने,सवडीने मनमुरादपणे सेवन करतो, आणि म्हणूनच खास राखून ठेवलेलं तुझं लिखाण तब्बल नउ दिवसांनी अंत:चक्षुने सेवन करीत आहे.
    तुझ्या अचाट बुद्धी कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,तुला ज्या विषयावर बोलायचे आहे, लिहायचे आहे तो विषयच तु होउन जातेस तुझ्या लिखाणातील प्रत्येक शब्द,वाक्य मराठीतच नाही तर इंग्रजी सारख्या परकीय भाषेवरील प्रभुत्व सिद्धत्वाला नेतं.आणि हो,
    मजस्तवची झाले परि म्या नाही केले! या जाणिवेतून च तुझ्याकडून कर्तुम कर्तुम अन्यथा अकर्तुम् शक्ति तुझ्या माध्यमातून हे सर्व घडवून घेत आहे याचीही जाणीव तुला आहे. शिवजयंतीचं औचित्य साधून छत्रपती शिवरायांबद्दल चं लिखाण मनाला खुपचं भावलं.उदाहरणासहित सादरीकरण करण्यात आलेला प्रत्येक ऐतिहासिक प्रसंग तुझ्या लिखाणकौशल्याचा एक एक पैलू मनाला चाटून जातो.युग पुरुषांबद्दल लेखन करीत असताना तुझ्या लिखाणाची शैली, बुद्धिमत्तेच्या
    कौशल्याच्या उंचीची जाणिव झाल्याशिवाय रहात नाही.
    नवतरूणांना या लेखातुन अभ्यास करण्यासाठी योग्य मार्गदर्शन,प्रेरणा मिळेलच आणि शिवप्रेमी भक्तांना ही खुप खुप आनंद अनुभवायला मिळेल.
    स्वये तरूनी जना तारी!हे ज्ञानाची अगोध थोरी! ते म्या दिधली तुझीया करी! जन उद्धरी उध्दवा!!!
    या संत वचनाप्रमाणे, बुद्धीचं दैवत असलेल्या विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पा ,सरस्वती मातेचा कृपाशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच, ज्ञानदानाचं पवित्र कार्य तुझ्या कडून वेळोवेळी घडो हीच प्रभूचरणी प्रार्थना!!!
    तुझा स्नेहांकित काका,
    बी.एन्.कदम, खालापूर रायगड.

  21. Modern Talking был немецким дуэтом, сформированным в 1984 году. Он стал одним из самых ярких представителей евродиско и популярен благодаря своему неповторимому звучанию. Лучшие песни включают “You’re My Heart, You’re My Soul”, “Brother Louie”, “Cheri, Cheri Lady” и “Geronimo’s Cadillac”. Их музыка оставила неизгладимый след в истории поп-музыки, захватывая слушателей своими заразительными мелодиями и запоминающимися текстами. Modern Talking продолжает быть популярным и в наши дни, оставаясь одним из символов эпохи диско. Музыка 2024 года слушать онлайн и скачать бесплатно mp3.

  22. Скачать песню Русские Хиты 80 – 90-Х Форум – Спасибо За День, Спасибо За Ночь.. Только У Нас Самая Лучшая Музыка, Заходи К Нам: Xmyzon бесплатно в mp3
    Русские Хиты 80 – 90-Х Форум – Спасибо За День, Спасибо За Ночь.. Только У Нас Самая Лучшая Музыка, Заходи К Нам: Xmyzon

  23. Скачать песню Русские Хиты 80 – 90-Х Форум – Спасибо За День, Спасибо За Ночь.. Только У Нас Самая Лучшая Музыка, Заходи К Нам: Xmyzon бесплатно в mp3
    Русские Хиты 80 – 90-Х Форум – Спасибо За День, Спасибо За Ночь.. Только У Нас Самая Лучшая Музыка, Заходи К Нам: Xmyzon

  24. Українські Народні Пісні Ой У Вишневому Саду.там Соловейко Щебетав – Ой У Вишневому Саду.там Соловейко Щебетав скачать песню бесплатно на телефон и слушать онлайн в mp3
    Українські Народні Пісні Ой У Вишневому Саду.там Соловейко Щебетав – Ой У Вишневому Саду.там Соловейко Щебетав

  25. Hi, i think that i saw you visited my blog thus i came to “return the favor”.I’m attempting to find things to improve my web site!I suppose its ok to use a few of your ideas!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *