wondervoices

‌चक्रमहिमा

मनुष्याचे संपूर्ण आयुष्य हे विविध चक्रांनी व्यापलेले आहे जसे. पृथ्वी परिवलन करते तर एक दिवस पूर्ण होतो, म्हणजे एक चक्र पूर्ण होते. जेव्हा पृथ्वी परिभ्रमण करते तेव्हा एक वर्ष पूर्ण होते. जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो तेव्हा एक महिना होतो.

तसेच आपल्या प्रत्येकाच्या आईचे शरीर जेव्हा चंद्राच्या चक्राच्या ताळमेळा सोबत राहिले, तर आपला जन्म होणे शक्य होते. आपली आकाशगंगा, आपले सूर्य ,चंद्र ,ग्रह नक्षत्र, तारे ,आपल्या शरीराचं येत – जात राहणं, आणि एका विविक्षित चक्रात फिरत राहणं. हा संपूर्ण चक्र महिमाच तर आहे.

आपले सर्वांचे भौतिक अस्तित्व चक्रीय आहे.

आपण आपल्या सर्वांना अशा मानसिक आणि शारीरिक प्रक्रियांमध्ये स्वतःला मिसळून घेतो ,म्हणून तर आपलं अस्तित्व ही चक्रीय होऊन जातं .ज्याला संसार असे नाव आहे.

चक्राकार फिरतांना ,आपल्याला फिरतोय असं वाटतंय आपण पुढे जातोय असही वाटतंय ,परंतु चक्राकार गतीमध्ये चक्रातच फिरतोय . आणि चक्राकार फिरल्याने कुणाचीही प्रगती होऊ शकत नाही.आणि कहर म्हणजे आपण कुठेच पोहोचत नाही.

आपले शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे .जे चंद्र, सूर्य, पृथ्वी या सर्वांसोबत चक्राकार पद्धतीने बद्ध आहे

मग प्रगती करायची असेल तर या चक्राकार गतीच्या वर उठणे गरजेचे आहे. त्यासाठी या निसर्गाने आपल्याला सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत. गरज आहे ते फक्त समजून घेण्याची.

आपल्या शरीराचे सुद्धा एक चक्र आहे .ज्याचा कालावधी साधारणता 40 ते 48 दिवसांचा आहे. अशा प्रत्येक 40 – 48 दिवसांमध्ये तीन दिवस असे येतात, की त्यामध्ये आपल्या शरीराला खाण्याची अजिबात गरज नसते. आता हे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या निरीक्षणावरून कळूही शकते. परंतु जर निरीक्षणावरून कळू शकत नसेल, तर मग भारतामध्ये असे दिवस ठरविले आहेत.

तो दिवस म्हणजे एकादशी आणि एकादशीचे पारणे. अर्थात 36 तास पुरेसे आहेत.म्हणजेच पौर्णिमा किंवा अमावस्ये च्या चार दिवस आधी.

बरं पण हा नसता खटाटोप कशासाठी ? तर, शरीरस्वाथ्या साठी . संसार चक्र समजून घेऊन त्यातून वर उठण्यासाठी. आणि शरीराला दुखण्या खुपण्यापासून तसेच इतर काही समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी.

शरीराला जिवंत आणि सतर्क ठेवण्यासाठी. शरीराला सहज शुद्ध आणि स्वस्थ ठेवण्यासाठी. तरच याच्या पुढची क्षितीज आपल्याला दिसतील .आणि ती गाठण्याकडे मनुष्याचा (आपला)कल होईल .

अर्थात इतर सर्व प्राण्यांपेक्षा जर का मनुष्य वेगळाआहे , विचारी आहे. तर तो स्वतःचा विकास साधण्यासाठी ,विचार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून वेगळा आहे.

जर का शरीर स्वास्थ ठीक नसेल, तर शरीर आपल्याला त्याच्यावर उठू देत नाही .आणि प्रत्यक्ष भगवंत जरी प्रसन्न झाले आणि मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू मला काहीही मागू शकतोस . अशी मोकळीक निर्मात्याने दिली. तरीही शेवटी भगवंताला हेच म्हणणार आहोत आपण ,हा जो पाय दुखतो आहे ना ? तो दुरुस्त करून द्या.

शरीर समस्यांच्या पुढे मला न माझी प्रगती कर हे दिसतं ,न मला आत्मज्ञान दे हे समजतं , न मला चक्र समजतं ,न चक्रमहिमा .

मनुष्य शरीराला ऊर्जा फक्त खाण्यापासून मिळतेच असं नाही . अर्थात तो या प्रक्रियेविषयी जागरूक असेल तर . मनुष्याचे शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे. आणि शरीराची स्थिती उचित आहे. तर सूर्य ,हवा आणि पाणी यापासून 60% आणि राहिलेली 40% ऊर्जा आपल्याला खाण्यापासून मिळू शकते. ही आपल्या शरीराची उत्तम स्थिती आहे. मनुष्य जीवन जगण्याची सहज आणि सतर्क स्थिती आहे.

आज एकविसाव्या शतकात जगत असतांना, आजच्या आधुनिकतेपर्यंत आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत ,की तिथे खाण्यापिण्याची अतिशय रेलचेल आहे. शेकडो प्रकारचे डायट प्लान्स उपलब्ध आहेत . हजारो चवींचे पदार्थ उपलब्ध आहेत.

वैज्ञानिक, संशोधक असे म्हणतात 21व्या शतकाची त्रासदी ही आहे की ,मनुष्य जास्त खाण्याने मरतो आहे. त्याला कुठे ब्रेक लावावा . समजून उमजून .केवळ ध्यानाकर्षण म्हणून हा लेखन प्रपंच.

भारतीय प्रथा परंपरेमध्ये चंद्र गणनेचा अकरावा दिवस म्हणजेच एकादशी हा उपवासाचा दिवस म्हणून ठरविला गेला आहे.(मनुष्य शरीराचा चक्र समजून घेऊन.)

एकादशीचा उपवास केला जावा याला अध्यात्मिक कारणं तर आहेतच .त्यासोबत आपण सर्वजणांनी काही गोष्टी जाणून घेऊन मानल्या पाहिजेत . यासाठी त्याला वैज्ञानिक सत्यतेची जोड असणे आवश्यक आहे . तरच त्या आपल्या पंचेंद्रियांच्या आवाक्यात येतील.

आणि मुळात भारतीय जीवन पद्धतीमध्ये वैज्ञानिकतेची जोड असल्याशिवाय एकही गोष्ट नाही. खडतर संशोधनाअंती कुठल्यातरी गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. त्याचे त्याकाळी नियम बनवले गेले. ज्यांना आता आपण रुढी, प्रथा, परंपरा म्हणतो. तरीही जे नियम (अर्थात रूढी प्रथा परंपरा) कालबाह्य आहेत .त्या सोडून देण्यालाही कोणाचा आक्षेप नाही. कारण मुळात भारतीयतेचा पैस तेवढा विकसित आणि सर्वसमावेशक आहे.

पौराणिक कथेनुसार एकादशीचे वेगळेच महात्म्य सांगितले जाते .महाराष्ट्राचे कुलदैवत श्री विठ्ठलाला भगवान श्री विष्णूचा अवतार मानले जाते. आणि श्री विठ्ठलाच्या उपासनेचे एक साधन म्हणून एकादशीचा उपवास मानला जातो.

मनुष्याने केलेल्या पापकर्माचे(दुसऱ्याला त्रास देऊन त्यात आनंद मांनण्याचे) फळ त्याला यम देत असतो. अशी आख्यायिका आपल्याला सर्वांना माहित आहे. जेव्हा नर्कामधून श्रीविष्णुना अशा प्रकारचे यातनामयी आवाज ऐकायला आले. तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. आणि भगवंत हे कारुण्यमयी असल्याने ,भगवंतांनी आवाजा संदर्भात विचारणा केली. तेव्हा मनुष्यांना त्यांच्या त्यांच्या कर्माचे फळ यम सदनी दिले जाते आहे. असे सांगितले .तेंव्हा भगवंतांची कारुण्यता इतकी वाढली की त्यांच्यातील कारुण्याने स्त्री रूप धारण करून त्या प्रत्यक्ष अवतरल्या.

भगवंतांनी विचारले की देवी आपण कोण आहात? यावर देवींनी मी एक दासी (एकादशी)असे उत्तर दिले. भगवंतच ते, लोकांना कमीत कमी त्रास होऊन आपल्या कर्मफलातून मुक्त होण्यासाठी एकादशीची रचना केली. आणि घोषित केले की जो कोणी एकादशीच्या दिवशी व्रताचरण करेल त्याचे पापक्षालन केल्या जाईल.

आपण विज्ञान युगातले लोक आहोत आणि या पौराणिक कथा जरी आपल्याला मान्य नसल्या तरीही आपल्या सर्वांना वैज्ञानिक दृष्ट्या काही गोष्टी कळतात.

मानवी शरीरामध्ये जवळपास 70 ते 75 टक्के पाणी आहे .आणि पंचमहाभूतांनी बनलेले शरीर असल्यामुळे सूर्य, चंद्र ,पृथ्वी या सर्वांच्या भौगोलिक स्थितीचा मानवी शरीरावर परिणाम होत असतो.

आपल्या सर्वांना माहिती आहे की पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी समुद्रामध्ये खूप मोठ मोठ्या लाटा उचंबळतात .तसेच मानवी शरीरामध्ये ही ह्या लाटा निर्माण होतात . मानवी शरीरातील लाटा म्हणजे आपल्या भावना.

विज्ञान सांगतं की आपण जे काही अन्नग्रहण करतो ते आपल्या शरीरात सामावल्या जाऊन त्याची ऊर्जा बनण्याच्या प्रक्रियेला तीन ते चार दिवस लागतात. म्हणून पौर्णिमा किंवा अमावस्येच्या तीन ते चार दिवस आधी म्हणजे एकादशीच्या दिवशी सात्विक आहार अर्थात फक्त पाणी , शक्य नसल्यास लिंबू पाणी, तेही शक्य नसल्यास फलाहार ज्यामध्ये पाण्याचा अंश जास्तीत जास्त असतो, हेही शक्य नसल्यास हलका आहार ग्रहण केल्यास.

आपल्या आत मध्ये उचंबळणार्या लाटाही सात्विक आणि सकारात्मकच असतील अर्थात शांत, सुखी ,आनंदी आणि प्रेमपूर्ण.

आहार जर तामसिक असेल तर निर्माण होणाऱ्या लाटा ह्या नकारात्मकता काळजी, डिप्रेशन, चिंता इत्यादींच्या असतील.

प्रत्येक मानवाला तिमिराकडून तेजाकडे नेण्याची ही प्रक्रिया प्रत्येकासाठी या निसर्गात उपलब्ध आहे. गरज आहे ती जागरूकतेने बघण्याची. आणि जागरुकतेने बघण्यासाठी शरीराने आपल्याला मोकळं सोडायला हवं म्हणून शरीराला खुश ठेवणे सोबतच जे अकरावं इंद्रिय मानलं जातं. मन, त्याला प्रसन्न ठेवणे आवश्यक आहे. तरच पुढची सरळ रेषेने जाणारी प्रगती आपणांस शक्य होईल.

नाही तर चक्र महिम्याचे वर्णन आपल्यासमोर आहेच.

दुसरे महत्त्वाचे वैज्ञानिक कारण असेही देता येऊ शकेल की मानवीय शरीरामध्ये जंक डीएनए नावाचे डीएनए असतात. (आपण गुगल वर जाऊन त्याची माहिती घेऊ शकतो.) जंक डीएनए म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचे कोडींग (माहिती/मेसेज)नसतं.

परंतु ते मानवी शरीरामध्ये अतिशय महत्त्वाचे असतात. जो व्यक्ती शाकाहारी असतो. त्याच्या शरीरातील जंक डीएनए हे कमी तुटतात तसेच पेशींचे विभाजनाची प्रक्रिया सुद्धा कमी प्रमाणात होते. ज्यामुळे शाकाहारी व्यक्तीचे आयुर्मान हे मांसाहारी व्यक्तीच्या तुलनेत जास्त असते.

कारण मासाहारांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामध्ये जंक डीएनए जास्त तुटतात आणि पेशींचे विभाजनाची गती शाकाहारापेक्षा जास्त असते. म्हणून ज्या धर्मांमध्ये मांसाहार आहेच त्यांना महिन्यां -महिन्यांचे उपवास त्यांच्या धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेखलेले असतात.(for body detoxification) तुलनात्मकरीत्या शाकाहारी लोकांना या वरील कारणांमुळे उपवास कमी करावे लागतात. त्याशिवाय शरीरातील अनावश्यक पदार्थ (toxins) बाहेर पडू शकत नाही.

कारण अन्नपचन, त्याचे समावेशन फक्त लहान किंवा मोठ्या आतड्यामध्येच होते असे नाही. तर प्रत्यक्ष पेशींच्या स्तरावर होते. म्हणून सफाई सुद्धा पेशींच्या स्तरावर होणे खूप गरजेचे आहे. असे जर झाले नाही तर आपले शरीर आणि डोके दोन्ही जड होते . आणि बघ जर शरीर आणि डोक्यांनी मी असा विचार करतो की मी असाचं आहे .माझा स्वभाव असाच आहे. माझ्या सवयी अशाच आहेत . ज्या बदलू शकत नाही.हे मी निश्चित करायला लागतो .आणि स्वतःला एका चक्रात अडकवून टाकतो.ज्याला हवं तर रोलर कोस्टर म्हणूया.(परंतु नाव आकर्षक ठेवले म्हणून त्याचे परिणाम चुकत नाहीत.)

शरीर अति महत्त्वाचे आहेच, त्याला आपल्या स्वतःवर कितपत अधिराज्य गाजवू द्यायचे, किती भारी पडू द्यायचे. हे आपण निश्चित करायचे असते.

म्हणून या शरीररुपी मंदिरात आत्मरुपी ज्ञान सूर्य जागा करूया. त्यासाठी आपण पहिले सर्वजण जागे होऊ या. स्वतःच्या जगण्याचे विश्लेषण करूया. जगण्याची दिशा निश्चित करूया.

 

अश्विनी गावंडे.

994 Responses

  1. मॅम,खूप उपयोगी आणि महत्वाची माहिती दिलीत.आपण केलेले लेखन अतिशय अभ्यासपूर्ण आहे. अप्रतिम!

  2. चक्रमहिमा मध्ये उपवासाचे महत्त्व छान पटवून दिलेत. या लेखामुळे अनेकांचे अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. Health conscious असण्यामध्ये आपल्या शरीर प्रकृतीनुसार जगण्यासाठी आवश्यक आहार जागरूकतेने निवडणं खूपच महत्त्वाचं, तसंच उपवास करणही. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.
    छान लेख! 👍🙏

  3. खूप छान माहीती दिलीअश्विनी एकादशी का करायची आता कळलं

  4. खूप छान माहिती आणि स्वतःच्या शरीराविषयी जागरूक राहून एकादशीचे महत्व समजावून दिले…
    उत्कृष्ट लेखन.🙏

  5. उपवासाचे महत्त्व जागतिक शास्त्रज्ञांना कळले व त्यांनी नोबेल मिळविले. चक्रमहिमा हे एक वैज्ञानिक सत्य आहे. शाकाहार हा दैवी आहार आहे. आपण यावर सुंदर प्रकाश टाकला. असे लेखन वृत्तपत्रात व पुस्तकरूपाने प्रसिद्ध व्हावे. शुभेच्छा!!
    रत्नाकर रेळे आकोट 🙏

  6. तुझा लेख वाचून मला असं वाटतं एकादशीला खरचं काहीच खायला नको.आपल्या प्रथा परंपरा खरचं खूप उपयुक्त आहेत.विज्ञानाच्या जोडीने उपवासचे विशद केलेले महत्व मनाला खुप भावले. काही साध्या सोप्या गोष्टी असतात पण आपण त्यावर विचार करीत नाही.तुझा लेख मात्र आत्मपरीक्षण करायला लावतो.
    Thanks Dear, Keep it up

  7. अश्विनी ,गहन लेखन…वैचारिक पातळीच्या पलिकडे..शरीर आणि निसर्ग यांचा परस्पर संबंध माहीत..होता..पण चंद्र सूर्य तारे ग्रह यांचा शरीराशी असणारा सबंध ..
    सुपर लेखन
    चक्रमहीमा: सार्थ शिर्षक

  8. आदरणीय अश्विनी ताई,
    सप्रेम वंदे!!!
    तुझ्या कडून विज्ञानाची जोड देऊन, आध्यात्मिक विषय सहज सोपा करून योग्य ते दृष्टांत देवून,शाश्त्र -पुराणाचे दाखले देवून आणि अंधश्रद्धेचा कुठे गंधही येणार नाही याची पुरेपूर काळजी घेवून शाश्वत विज्ञानाची कास धरून विषयाची उकल सकारात्मक करण्याची हातोटी तसेच प्राप्त विषयाची आवड निर्माण करण्याची तळमळ,वाचकांच्या हृदयाचा ठाव घेवून पटवून देण्याच्या क्षमतेची जाणीव चक्रमहिमा या पोटतिडकीने निवडलेल्या विषयावरून ,आपण या समाजाचं देणं लागतो नव्हे नव्हे या पवित्र कार्यासाठी भगवंताने आपल्या संस्कृतीसंपन्न भारत मातेच्या भूमीवर जन्माला घातले आहे.तेहि पूर्ण स्वातंत्र्य असलेले सर्व मोहमाया विरहित असे आत्मज्ञानानं परिपूर्ण, ओतप्रोत भरलेले पूर्णतृप्त जीवन मार्गक्रमण करीत आहेस.चक्र स्वतः भोवती फिरत असताना आपल्याशी संलग्न असलेल्या इतर चक्रांनाहि गती देवून एका विशिष्ट वेळेपर्यंत म्हणजेच निकाला पर्यंत पोहोचविते.जसं सेकंदकाटा मिनिटकाटा आणि तासकाटा परस्परांशी घनिष्ठ जोडून
    काळगणणेचा रिझल्ट देतात.चक्रमहिमा या विषयाचे औचित्य साधून मानवी जीवनातील चक्र ज्ञानाचे उत्तम विश्लेषण करून दिल्याबद्दल तुझ्या बुद्धी कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.अशाच प्रकारच्या उत्तमोत्तम लिखाणाची अपेक्षा.
    आपला स्नेहांकित,
    कदम काका, खालापूर रायगड.

  9. Yes, I ought to think about it, I don’t pay much attention to it, I will need to reconsider the actions and take there so that my blog would come to life, otherwise only the tones of shit (spam) are really good post, respect to the author.

  10. Ace of Base — шведская поп-группа, образованная в 1990 году. Их музыкальный стиль сочетает в себе элементы поп-музыки, дэнса и электроники. Группа стала популярной благодаря хитам “All That She Wants”, “The Sign”, “Don’t Turn Around” и “Beautiful Life”. Эти композиции не только покорили чарты во многих странах мира, но и остаются классикой жанра до сих пор. Ace of Base оставили неизгладимый след в истории поп-музыки, их мелодии до сих пор радуют слушателей по всему миру. Скачать музыку 2024 года и слушать онлайн бесплатно mp3.

  11. I noticed a tendency that a lot of inadequate comments appeared on blogs, I can’t understand if someone is spamming it like that? And why, to someone to make a bastard))) IMHO stupid …

  12. Grading indicates the rate of growth aggressiveness of the tumour and staging indicates the spread and distribution of the cancer in the body.
    If prices for ampicillin infective endocarditis is so much less that people prefer to shop online.
    The patient is usually treated with at least two broad spectrum antibiotics that can kill both N.

  13. To reduce the mosquito population, get rid of places where mosquitoes can breed.
    Be wise, buy a glucophage commercial offered by a specialist low-cost pharmacy site
    A form of arthritis, gout can affect any joint in the body, and gout attacks m…ost commonly affect men.

  14. More should be done.
    If you need to economize, order your how long does prednisone stay in your system when you are buying it online.
    The first thing that you should be aware of is that breast reconstruction results vary widely, and although the procedure does attempt to restore the breast to the normal shape, size and appearance, this may not happen exactly how you want it to.

  15. Some options include: fenugreek Trigonella foenum-graecum has been shown in some studies to reduce blood insulin and glucose levels while also lowering cholesterol bilberry Vaccinium myrtillus may lower blood glucose levels, as well as helping to maintain healthy blood vessels garlic Allium sativum may lower blood sugar and cholesterol levels onions Allium cepa may help lower blood glucose levels by freeing insulin to metabolize them cayenne pepper Capsicum frutescens can help relieve pain in the peripheral nerves a type of diabetic neuropathy gingko Gingko biloba may maintain blood flow to the retina, helping to prevent diabetic retinopathy Any therapy that lowers stress levels also can be useful in treating diabetes by helping to reduce insulin requirements.
    Pay better prices to how fast does lisinopril work on this site while sitting in your home
    Posted 17 July 2015 at 08:20 GMT in Medicines – GeneralI’m 19 and around 7 months ago I went cold turkey on zyprexa zoloft intuniv and some other atypical add medecine.

  16. A person with high blood sugar may experience increased thirst in response.
    Many online pharmacies you can doxycycline acne at the lowest prices
    Although it is rare, a person can die of appendicitis if a ruptured appendix spreads infection throughout the abdomen and into the blood.

  17. Sarah Jarvis Related articles Cervical Screening Cervical Smear Test Myeloma Hodgkin’s Lymphoma See more articles Related Wellbeing ‘I’m rowing 3,000 miles because of cervical cancer’ Confusion and fear over cervical cancer and cervical screening is putting lives at unnecessary risk Vegan diet helps lower cancer risk for women When should you have a health screen?
    Your doctor should know your history before you keflex medication only after you have looked at competitive online specials
    About the uterus The u…

  18. Treatment options for cervical cancer depend on the stage of the disease at diagnosis – in other words, how large the cancer is, how far it has grown into the cervix and whether or not it has spread beyond the cervix.
    Big discounts on offer for when to take nolvadex during cycle . Order now!
    No antibiotics just over the counter meds.

  19. I have a 5 year old choc lab mix, I just moved to AZ from MI about 2 months ago, I have the AC on in the house to about 70 and still she pants non stop acting like it is 100 inside.
    Searching for cephalexin for staph at cheap prices if you purchase this great treatment online
    If so, the Terms do not affect your legal relationship with these other companies or individuals.

  20. SubscribeTo The Bariatric Surgery Blog Subscribe Subscribe Subscribe Subscribe Subscribe The Bariatric Examiner:Your FREE Quarterly Newsletter Sign up now to receive important bariatric surgery news and research updates…
    Using the internet, you can find a zithromax dosage pediatric offered by a top online pharmacy at low prices
    Ask petMD has answers.

  21. The simplest method of avoiding mold in a home so affected is to move the furniture in question.
    Get the facts on all medicines when you stromectol 3 mg tablet price for privacy.
    I would not call it severe though Nick Reply Zaigham says: January 15, 2014 at 2:35 amYes, I have suffered severe hair loss after dengue fever and there is no sign of recovery.

  22. Mangina – for woosies in the ED.
    No matter where you live, sites deliver a good price of lasix trade name pharmacy that offers a discount on its products?
    Horrible headaches by 10AM every day, muscle pain with twitches, severe joint pain, lightening bolt pains down my legs, dirt like taste in my mouth, blurred vision, slurred speech and memory loss.

  23. Patients who take nitrate medications for heart disease cannot use PDE-5 drugs.
    To buy what is prozac for to help eliminate symptoms by securing excellent online
    If you feel uncomfortably warm, you may want to take a break and find a cool spot for a rest.

  24. The heart chambers also enlarge and stretch so they can hold a larger volume of blood.
    Excellent health benefits are attainable when you bactrim uti dosage at any site, check out its composition too.
    It is sometimes difficult to differentiate between pancreatitis and acute cholecystitis, but a correct diagnosis is critical, because treatment is very different.

  25. For example, if a person who uses tobacco heavily develops lung cancer, then it was probably caused by the tobacco use, but since everyone has a small chance of developing lung cancer as a result of air pollution or radiation, then there is a small chance that the cancer developed because of air pollution or radiation.
    Exceptional prices allow you to ivermectin australia help?
    He was initially breast fed until he was 4month old then my milk dried up so I started him on similac advance.

  26. The patient may need to take vitamin or mineral supplements that provide the missing nutrient.
    Protect your health and online pharmacy buy xanax online. The easy way to buy
    Because anemia is often a symptom associated with another disease, it is important for your doctor to be aware of symptoms you may be experiencing.

  27. In 2009, some “Avatar” fans reported feeling depressed and even suicidal because the movie’s fictional world wasn’t real.
    the best dealDon’t let your age control your sex life. Visit stromectol australia cause health risk?
    Bagnoli, Jr, MD Just Diagnosed Paige and Mark Anderson Direct Mail Form Cherie Estrada Mary L.

  28. One form can be taken by mouth.
    Free shipping for Asian countries at ivermectin coronavirus to improve your health
    B Promptly refer patients with any level of macular edema, severe NPDR, or any PDR to an ophthalmologist who is knowledgeable and experienced in the management and treatment of diabetic retinopathy.

  29. A physician must possess the appropriate knowledge and experience required to safely and effectively perform the abortion pill procedure.
    Figure out the best treatment pricing for prescriptions of us online pharmacy soma . Also offer free shipping!
    This modality would be recommended for tumors within or close to critical structures in the brain that cannot tolerate a large single dose of radiation or for larger tumors.

  30. Thankfully, thanks to rigorous scientific research, our Editor-in-chief Joshua Topolsky can give you a definitive answer to who would win right now.
    Choose the lowest price of buy levitra from reliable pharmacies
    I have constipation severely and have to use 2 capfulls of Miralax a night just to be able to keep myself partially regular.

  31. I mean I ate fried fish dipped in ketchup while eating a pbj sandwhich.
    Discreet shipping, fantastic prices. Order tadalafil t5 recommended if you’re over 80 years old?
    The classic symptoms of dengue include a high fever, severe pain in the muscles, bones, and joints, pain behind the eyes, severe headaches, nausea and vomiting, and a rash.

  32. With knowing blood clot in leg symptoms, there are some simple home remedies can help relieve and prevent such blood clot while medical treatments should be applied for severe condition.
    Apart from the price of comprar levitra . Get one now! You can’t find more affordable prices.
    Allergies can be a frustrating menopause symptom, as they can impair daily life.

  33. There is no question, panic attacks can be strong physiological, psychological, and emotional experiences, which is why many people fear them.
    can be a great benefit.There are many advantages when you sildenafil 50 mg tablet on the Internet.
    Women who are at least 21 years old should get regular Pap tests.

  34. Frank Website and helpline service offering advice, information and support to anyone concerned about drugs.
    The internet is one place to get low price of tadalafil 100mg ! Order reliable products from us.
    A couple days ago after going to the bathroom when I went to wipe, I noticed some brown discharge.

  35. Sexuality is an essential aspect of a man’s physical and emotional well-being. A healthy sexual life contributes positively to mental and physical health. Open communication with partners, understanding desires, and mutual respect are key for a fulfilling experience. Sexuality should be approached with care, respect, and consent, ensuring both partners’ needs are met and emotional connections are strengthened. Healthy relationships foster trust and intimacy, enhancing the overall quality of life. It is important to address concerns and seek guidance if needed, as sexual well-being is a crucial component of holistic health

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *