
स्वयंभू
या पृथ्वीतलावर राहणाऱ्या मर्त्य मानवाला कदाचित स्वतःचे रोजचे जीवन जगताना या भौगोलिक सत्याची कल्पनाही नसावी. की आपल्या आकाशगंगेतील गुरु ग्रहाच्या अस्तित्वाने आपल्या पृथ्वीचे अस्तित्व टिकून आहे. किंबहुना त्यामुळेच आपणही टिकून आहोत. कारण या ब्रह्मांडीय संरचनेत अनेक उल्कापात आणि अनेक भौगोलिक घटना घडत असतात. ज्यामुळे पृथ्वी कधीही नष्ट होऊ परंतु हे सर्व पृथ्वीवर पोहोचण्या आधीच गुरु ग्रह स्वतःवर झेलून घेतो. आणि पृथ्वी आप सुखच वाचते.
अशाच प्रकारे प्रत्येक मानवाच्या जीवनात गुरु हे एक दिशादर्शक कवच म्हणता येईल.
आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो. तशी भारतीय संस्कृती ही नित्य उत्सव साजरी करणारी संस्कृती आहे.
भारतीय सनातन धर्मामध्ये , अवकाशात (space) ज्या काही ग्रह गोलीय संरचना होतात .त्यावर आधारित सण, समारंभ ,उत्सव साजरे केले जातात.
सनातन धर्म याचा अर्थ निसर्ग नियमांना अनुसरून असा होतो .तो काही वेगळा धर्म नाही. निसर्ग नियमातील सर्वकालिक सत्यता ,त्यातून ब्रह्मांडा मध्ये तयार झालेली ऊर्जा आणि ब्रह्मांडीय उत्पत्ती असलेले आपण ह्या ऊर्जेचा उपयोग करून स्वतःचे उत्थान करू शकू या दृष्टीने साजरे केले जाणारे भारतीय उत्सव.
सूर्याचे दक्षिणायन सुरू झाल्यानंतर पहिल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी चंद्र गुरुच्या धनराशीत असतो सोबतच पूर्व शडा व उत्तर शडा या गुरुच्याच नक्षत्रात असतो. त्याच्याबरोबर समोर 180° मध्ये सूर्य मिथुन राशी आणि आर्द्रा नक्षत्रात असतो.
ही संरचना ब्रम्हांडामध्ये एक प्रकारची मार्गदर्शक ऊर्जा निर्माण करतो. ह्या मार्गदर्शक ऊर्जेची आमची मानसिकता एकात्म व्हावी म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आणि आपल्याला ज्ञात असल्याप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक आहे. म्हणून हा दिवस सगळ्यांच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण ठरतो.
गुरु हा शब्द गु आणि रु या दोन शब्दांपासून तयार झालेला असून गु या अक्षराचा अर्थ अंधकार किंवा अज्ञान असा होतो . तर रू या अक्षराचा अर्थ अंधकाराला दूर करणारा तसेच ज्या काही माझ्या विचारांनी माझ्यामध्ये मर्यादित मान्यता तयार केल्या आहेत . मी असीम (सीमा नसलेला) असून सुद्धा. त्या दूर करणारी मार्गदर्शक शक्ती म्हणजेच गुरु.
गुरु हे काही व्यक्ती विशेष असं नाव नाही .ती एक ब्रम्हांडीय ऊर्जा आहे. असे अद्वैतारक उपनिषद सांगते.
गुरु पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे सुद्धा म्हणतात ब्रह्मपुराण भगवद्गीता यामध्ये जी व्यास वंदना आली आहे. त्यातील श्लोकात असे म्हंटले आहे, की जो आम्हाला प्रकाश देतो ,जो ज्ञानरूपी दिव्यात तेल टाकण्याचं काम करतो , मानवी जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या ऊर्जेला वाढवण्याचे काम करतो त्याला व्यास असे म्हटले जाते.
अर्थात गुरु किंवा व्यास याचा अर्थ upliftment किंवा upgradation होय.
आपण मानवी जीवनात कोणत्याही प्रकारे मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीला गुरु मानतो.
परंतु शास्त्रार्थ हे सांगतो की जो आपल्या जीवनाचा उद्देश समजण्यासाठी ,आपल्या आत्मबोधासाठी ,आपल्या कर्मशुद्धीसाठी आपल्याला दिशा देतो तो खरा त्यासाठी गुरु पौर्णिमेचा दिवस श्रेष्ठ मानला जातो.
कारण मानवाचा पहिला जन्म आईच्या गर्भातून होतो आणि दुसरा जन्म मी या पृथ्वीतलावर का जन्म घेतला आहे? हे जाणल्यानंतर होतो.
आणि अशा मानवी जीवनाच्या उद्देश पूर्तीसाठी दिशादर्शन करणाऱ्या व्यक्तीला गुरु किंवा आचार्य मानले जाते.
मग प्रश्न पडतो की मग गुरु नेमकं मानायचे कुणाला? यानुसार गुरूंची काही लक्षणे सांगितली आहेत. यामध्ये पहिले लक्षण म्हणजे ज्या व्यक्तीला शास्त्राचा अर्थ माहित असेल समजत असेल त्यातील मर्म किंवा रहस्य जाणत असेल तो.
गुरुचे दुसरे लक्षण जो व्यक्ती ही सगळी लक्षणे शिकवतो ती लक्षणे त्याच्या आचरणात असली पाहिजेत असा जो तो.
आणि गुरुचे तिसरे लक्षणे म्हणजे वरील दोन लक्षणासहित त्या व्यक्तीमध्ये असे सामर्थ्य असावे की त्याच्या उपदेशाने, वर्तनाने अन्य लोकांच्या सद्गुणांचा विकास व्हावा.
म्हणून आजच्या समकालीन व्यवस्थेमध्ये गुरु कोणाला बनवावे ,कोणाला मानावे यावर सखोल चिंतन होणे खूप गरजेचे आहे.
मुळात झेन आणि बुद्धिस्ट परंपरेमध्ये असे स्पष्ट केले आहे की , व्यक्तीने स्वतःचे अंत:करण शिकण्यासाठी तयार करणे. ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. आणि जेव्हा शिष्यत्वासाठी व्यक्ती तयार होतो .तेव्हा गुरु स्वयम प्रकट होतो.
“When disciple is ready master appears. “
परंतु अनेक ग्रंथांमध्ये किंवा पुराणांमध्ये किंवा मानव उत्थान करणाऱ्या ग्रंथांमध्ये गुरुची आवश्यकता ही अनन्यसाधारण मानली गेलेली आहे. आपण जे प्रत्यक्ष अवतार पुरुष मानतो. मग ते भगवान राम असो ,भगवान कृष्ण असो की ,महाभारतातील कौरव-पांडव असो या सर्वांना त्यांचे त्यांचे गुरु होते. गुरु वशिष्ठ, गुरु सांदिपनी, गुरु द्रोणाचार्य यांची नावे घेतली जातात. परंतु महाभारतातच आपल्याला असेही उदाहरण सापडते, एकलव्याचे जिथे शिष्याने प्रत्यक्ष गुरुच्या मूर्ती कडून ज्ञानप्राप्ती केली.
श्रीमद्भागवत पुराणामध्ये स्वयं कृष्ण भगवान जे विष्णूचे अवतार आहेत त्यांनीच दुसरे विष्णूचे अवतार दत्तात्रय यांचा उद्धव गीतेमध्ये उल्लेख केलेला आढळतो.
त्यामध्ये दत्त महाराज जेव्हा यदु राजाशी संवाद करताना गुरु विषयी म्हणतात- “माझा आत्माच माझा गुरु आहे”.
तरीही दृश्य रुपात दत्त महाराजांनी 24 गुरू मानले होते. ज्यामध्ये पंचमहाभूतांपासून ,सूर्य ,चंद्र ते पिंगला नावाची वेश्या सुद्धा होती.
मग इथे प्रश्न असा पडतो की एक परंपरा म्हणते गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आवश्यक आहे .आणि दुसरी परंपरा असं सांगते की गुरूंची गरज नाही .आपणच त्याबाबत स्वावलंबी असले पाहिजे. आपला आत्माच आपला मार्गदर्शक आहे.
दोन्ही गोष्टी जरी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी आहेत मात्र एकच.
व्यक्तीच्या आत शिकण्याची इच्छा निर्माण झाली. शिकण्यासाठी मन खुलं झालं .तर मग या सृष्टीत “लाखो माझे गुरु ” कोणीही माझा गुरु होऊ शकतो. आणि मी कोणाकडूनही शिकू शकतो. झेन परंपरेचा गाभा हाच आहे.
मग मुद्दा केवळ एकच आहे “माझ्यात शिष्यत्व तयार झालय का?”
जोपर्यंत अर्जुनामध्ये शिष्यत्व तयार झालं नाही. तोपर्यंत भगवद्गीता अवतरली नाही. म्हणून सार एकच “गुरुला जर प्रकट करायचे असेल ,तर माझ्यात शिष्यत्वाचं प्राकट्य होणं महत्त्वाचे आहे. “
लौकिक विषयापासून अलौकिक विषयापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवणारा प्रत्येक व्यक्ती ला शास्त्र गुरु संबोधते.
व्यक्तीला शिष्यत्व आणि गुरुचे गुरुत्व व्यक्तीत कुशलता, निपुणता आणि पंडित्य प्रदान करू शकते.
गुरुतत्त्व म्हणजे काय ?हे समजण्यासाठी गुरुगीता स्कंदपुराणांमध्ये माता पार्वतीने भगवान शंकराला प्रश्न विचारले, ज्याच्या उत्तरात भगवान शंकरांनी खालील गुरूंचे प्रकार मातेला सांगितले आहे त.
त्यातील पहिला प्रकार म्हणजे सूचका गुरु-हे विषय शिकवतात, कौशल्य निर्माण करतात ,कौशल्याचे ज्ञान देतात.
दुसरा प्रकार म्हणजे वाचका गुरु-हे गुरु कौशल्य तर वाढवतातच ,त्यासोबतच काय करावे ?आणि काय करू नये ?याचेही ज्ञान प्रदान करतात.
तिसरे आहेत बोधका गुरु-हे गुरु कौशल्य तर वाढवतातच शिवाय संपूर्ण व्यक्तिमत्व विकास करतात.
चौथे निषिद्ध गुरु-आपले पतन व्हावे ,आपल्यामुळे दुसऱ्यांना हानी होईल हे शिकवणारे अर्थात असे करू नये वागू नये हे ज्यांच्यापासून शिकतो ते म्हणजे निषिद्ध गुरु .
आणि पाचवा प्रकार गुरूंचा प्रकार म्हणजे विहिता गुरु – चे संसाराचे स्वरूप समजावतात त्यातून आपल्याला वैराग्यापर्यंत पोहोचवतात.
सहावा प्रकार म्हणजे करणाख्या गुरु-जे शिष्याला जीव जगताचे स्वरूप ,ईश्वराचे स्वरूप दाखवतात.
शेवटचे परमगुरु-असे गुरु जे शिष्याला कर्म धर्म समजावून सांगून शिष्याच्या आत मध्ये वैराग्य तयार करून मोक्षा प्रत नेतात ते गुरु.
सार हाच की आपल्याला गुरु मिळो न मिळो. आपली लिटमस टेस्ट हीच आहे. आपल्यात शिष्यत्व निर्माण झाले का?
एक वैराग्यवती नावाची भगवान विष्णूंची परमभक्त असलेली एक श्रीमंत युवती. सतत विष्णूंच्या मंदिरात सेवा करणं ,जपजाप्य करणे ,नैवेद्य दाखवणं. ही तिची दिनचर्या
स्वभाव अतिशय भोळा. तिचे एक चोर दैनंदिन निरीक्षण करत असतो .त्याला तिच्या भक्ती विषयी ओढ नसते, तर तिच्या दागिन्यां विषयी असते. एक दिवस साधूचे रूप घेऊन तो चोर मंदिरात येतो आणि पाण्याची मागणी करतो. त्यावर वैराग्यवती पाणी घेऊन येते. लगेचच साधू तिला विचारतात तू गुरु केले आहेस का? तिचे उत्तर जेव्हा नकारात्मक येते तेव्हा साधू तिला म्हणतात .ज्याने गुरु केलेले नाहीत .त्याच्या हातून मी पाणी घेणार नाही. स्वभावाप्रमाणे वैराग्यवती त्यावर उपाय विचारते. त्यावर साधू तिला म्हणतात. मी तुझे गुरुपद स्वीकारण्यासाठी तयार आहे. परंतु त्यासाठी तुला माझ्यासोबत एकांतात, जंगलात यावे लागेल. जंगलात गेल्यानंतर चोर रुपी साधू तिच्या अंगावरचे सर्व दाग दागिने घेऊन ,तिला एका झाडाला बांधून ठेवतात .आणि सांगतात की जोपर्यंत मी तुला येऊन सोडवत नाही तोपर्यंत इथून जायचे नाही?
मंदिरातून मुलगी घरी आली नाही. म्हणून वडील शोधत शोधत जंगलापर्यंत पोहोचतात .झाडाला बांधलेली मुलगी पाहून ते तिला सोडवण्याचा प्रयत्न करतात .परंतु तिची गुरुवर एवढी भिस्त असते कि ती सांगते. ज्या गुरूंनी मला या झाडाला बांधून ठेवलेय तेच गुरु येऊन मला सोडवतील. आपण मला सोडवण्याचा प्रयत्न करू नये. नाईलाजाने वडील परत जातात.
इकडे भगवान विष्णू ही त्रस्त एक दिवस झाले ,दोन दिवस झाले मंदिरात काहीच हालचाल नाही. पूजा नाही की, नैवेद्य नाही. म्हणून चिंताक्रांत होतात आणि नारद मुनिना वैराग्यवतीला सोडवण्यासाठी पाठवतात. वैराग्यवती नारद मुनीना ओळखते .नमस्कार करते. दर्शन झाले म्हणून कृतकृत्य होते. परंतु त्यांनाही स्वतःला सोडवण्यास नकार देते.
हे इतिवृत्त नारद मुनी विष्णूंना सांगतात तेव्हा विष्णू स्वतः येतात .त्यावर स्वतःच्या पुण्यावर आनंदित होऊन भगवान विष्णूंचे दर्शन घेते. परंतु आपणही मला सोडवू नका अशी विनवणी करते. माझे गुरु येतील आणि तेच मला सोडवतील. असे सांगते.
त्यावर भगवान विष्णू नारदाला सांगतात जा कुठेतरी चोऱ्या करत असेल. आण त्याला शोधून आणि सोडव या पोरीला. नारद मुनी लगेचच त्याला हजर करतात आणि वैराग्यवती त्यांच्याकडून स्वतःला सोडून घेते. आणि म्हणते माझे गुरु किती महान आहेत की, ज्यांच्यामुळे मला प्रत्यक्ष भगवान विष्णूचे आणि प्रत्यक्ष नारद मुनींचे दर्शन झाले. अशा गुरूंना मी कसे सोडू?
पंचंद्रियांच्या कक्षेत न येणाऱ्या अनेक गोष्टी या ब्रह्मांडात अस्तित्वात आहेत. प्रत्येकाने आपापल्या मध्ये कसे शिष्यत्व निर्माण करावे. हे ज्याचे त्याचे ज्ञान आहे.
शेवटी “भाव ही भगवान हैl”
Real stage is
when disciple is understood master disappears……. Mistrey of wisdom…..
llश्री माऊली चरणी अर्पणll
अश्विनी गावंडे
गुरु बद्दल गुरु ग्रहाबद्दल माहिती खूप छान सांगितली.अप्रतिम,
खूप सुंदर
आवडलेल्या ओळी
गुरु जी लक्षणे शिकवतो, ती त्याच्या आचरणात असली पाहीजेत .
‘स्वयंभू ‘लेखाचे शिर्षक 👌 Mystery of WISDOM
अप्रतिम! सत्यम् ,ज्ञानम् ,अनंतम् ब्रम्ह! 🕉️श्री गुरवे नमः!!♾️
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!🪷🙏
Very informative 👌👌As you always guide me in our official work 🙏🙏Happy Gurupornima Tai🌹🌹
गुरूंची लक्षणे गुरूंचे वेगवेगळे प्रकार व शिष्यत्वासाठी स्वतःला तयार करणे सर्वच माहिती खूपच महत्त्वाची सांगितली.धन्यवाद🙏🙏
माहितीपूर्ण लेख आहे.आपल्या जीवनात गुरू चे अनन्यसाधारण महत्त्व आहे.प्रत्येक व्यक्तीचा आपल्या वर वेगळा काहीतरी प्रभाव असतो.त्यातुनच आपली जडणघडण होत जाते.
गुरू वरचा अढळ विश्वास फळ देतोच.ही गोष्ट छान आहे.
स्वयंयभू या नावातच आजच्या लेखाचा गर्भीथार्थ आहे लेख अतिशय सुंदर असा आहे या लेखामध्ये भौगोलिक धार्मिक ऐतिहासिक बौद्धिक या सर्व कंगोऱ्यांना चांगल्या पद्धतीने स्पर्श केला गेला आहे गुरु मध्ये तीन लक्षणे असावेत तोच गुरु खूप चांगल्या प्रकारे सांगितले आहेत इतका सखोल अभ्यास इतकी माहिती खरंच लेख लिहिणार याचा अभ्यास त्याच्या विचाराचा आवाज का या सर्व गोष्टी फार प्रभावी ठरतात लेख अतिशय उत्तम आहे खूप छान
गुरु महात्म्य… परीपूर्ण लेखन
गुरु ग्रहाचे पृथ्वीसाठी व तसेच गुरुचे व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्व खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले आहे, जेव्हा व्यक्ती मध्ये शिष्यत्व तयार होते तेव्हा गुरु स्वयम प्रगट होतो अशा ओळींमुळे आपली लिखानाची व विचारांची उंची समजते आपल्या प्रतिभेला माझा साष्टांग दंडवत, 🙏🙏