सिद्ध मुहूर्त
हमे कायनात देती तो खूब है
पर हम ही हैl
जो कंबखत गिनते वही है
जो हासिल हुआ नही l
“और जो हासिल हुआ नही ” त्याच्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो. म्हणजे प्रयत्न. योग्य दिशेने प्रयत्न. ही गोष्ट दोन गोष्टींवर अवलंबून आहे एक म्हणजे मला कळले पाहिजे मला काय पाहिजे? आणि दुसरी म्हणजे हे ब्रह्मांड मला कशी मदत करू शकते? याची स्पष्टता.
भारतीय परंपरेत मुहूर्त या एका शब्दाला खूप महत्त्व आहे. कारण तो फक्त एक शब्द दिसत असला, तरी त्याचा भावार्थ पूर्ण प्रक्रियेची सफलता सूचित करतो.
परंपरेने भारतात साडेतीन मुहूर्त मानले जातात.
विजयादशमी, गुढीपाडवा, आणि अक्षय तृतीया हे तीन मुहूर्त व अर्धा मुहूर्त म्हणजे दिवाळी ची बलिप्रतिपदा.
मुहूर्त म्हणजे असा दिवस की ज्या दिवशी ब्रम्हांडाची रचना कशी झालेली असते की त्या दिवशी तुम्ही जे कराल त्यात इच्छित फल परिणाम मिळतील.
त्यातल्या त्यात अक्षय तृतीया ही तिथी अतिशय महत्त्वाची ,एकमेवा द्वितीय व शक्तिशाली मानल्या जाते. कारण” सिर्फ नाम ही काफी है l” सुचक आहे. अक्षय” न क्षय इति अक्षय.” ज्याचा कधीही नाश होत नाही. किंवा क्षय होणार नाही. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया या नावाने संबोधले जाते.
या पृथ्वीवर जन्मास आलेला कोणताही मनुष्य प्राणी ,एक तर कर्मांनी बद्ध असतो. आणि दुसरे म्हणजे कर्मफळ आपल्या हातात नाही. हे शब्दांनी कितीही कळत असले तरी, मन मात्र कर्मात सफलता मिळावी. याच उद्देशाने बद्ध असते. एकूण काय तर कुठल्याही कर्माचे हाती येणारे परिणाम हे परिणामकारक आणि माझ्या इच्छेप्रमाणे व्हावे अशी इच्छा बाळगून असतो.
महाभारतामध्ये एक प्रसंग नमूद केलेला आहे. जेव्हा पांडवांना वनवासात जाण्याची शिक्षा सुनावली जाते. तेव्हा सर्व पांडव द्रौपदीसह वनात राहायला जातात. त्यावेळी इंद्रप्रस्थ नगरीतील अनेक ऋषीगण आणि विद्वजन पांडवासोबत राहण्यासाठी वनात येतात ह्या घटनेने युधिष्ठिरासमोर धर्मसंकट उभे राहते. युधिष्ठिर म्हणतात मी तुम्हा सर्वांना येऊ नका असेही म्हणू शकत नाही. परंतु तुमचा स्वीकार पण करू शकत नाही. मी तुमचा तिरस्कार करत नाही, परंतु तुमचे पोषणही करू शकत नाही. अशा द्विधा मनस्थितीत अडकलेल्या राजा युधिष्ठिरा ला धोम्य ऋषी मार्गदर्शन करतात. सूर्यनारायणाला या संकट समयी आपली मदत करण्यासाठी याचना करा. असे सांगतात. सूर्यनारायण युधिष्ठराच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन युधिष्ठिराला अक्षय पात्र देतात. म्हणजे असे पात्र की ज्यातील अन्न कधीही संपणार नाही.
याच दिवशी माता अन्नपूर्णेचे प्राकट्य पृथ्वीवर झाले होते. असेही मानले जाते.
मदनरत्न ग्रंथांमध्ये तसेच इतर अनेक पुराणांमध्ये अक्षय तृतीये संबंधी अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्या अनेकांना माहितही आहेत .परंतु त्या माझ्या काय उपयोगाच्या ?हे आपण तेव्हाच समजू शकतो जेव्हा त्यातील शब्दार्थां च्या सोबतच लक्षार्थ,वाचार्थ, गर्भितार्थ जाणून घेऊन त्याचा अन्वयार्थ आपल्या जगण्याशी लावू शकू.
याच दिवशी भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात अवतार घेतला होता असे म्हणतात. परशुरामांचं एकाच वेळी ब्राह्मण आणि क्षत्रिय असणे किंवा त्यांच्या इतर गुणवैशिष्ट्यांमध्ये विरोधाभास दिसत असला, तरी ही .स्कंद पुराण आणि भविष्यपुराण या ग्रंथानुसार त्यांचं चिरंजीवी असणं हे कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठी उपलब्धी आहे. चिरंजीवित्व म्हणजे अक्षयत्व.
सर्व युगांची सुरुवात म्हणजे सत्ययुग ,द्वापार युग, त्रेतायुग आणि कलियुग याच दिवशी सुरू झाल्याचं मानलं जातं. महर्षी व्यासांनी याच दिवशी महाभारत ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली होती. महर्षी व्यासांच्या डोक्यात महाभारत या ग्रंथाची रचना(mental graph ) तयार होती.परंतु त्यांना ग्रंथ लिहिण्याकरता लेखनिक मिळेना. शेवटी मंगलमूर्ती गणेशाने लेखनिक होण्याची तयारी दर्शवली. सोबतच एक अट घातली की “मी लिहायला घेतलं की ,अजिबात थांबणार नाही”. महर्षींनी ही अट मान्य केली. आणि “स्वतःची पण एक अट सांगितली की, जोपर्यंत मी सांगितलेली रचना किंवा श्लोक तुम्हाला समजणार नाही. तोपर्यंत तो आपण लिहायचा नाही.”असे करत करत अशक्यप्राय वाटणार महाकाव्य वेद व्यासांनी लिहून पूर्ण केलं.
याच दिवशी गंगा नदीचे भगीरथ प्रयत्नांनी पृथ्वीवर अवतरण झाले. ज्याला भगवान शिवजीच्या रूपाने ब्रम्हांडाची अमूल्य मदत मिळाली.
याच दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा मित्र सुदामाची भेट झाली.
या सर्व कथांचा जेव्हा आपण अन्वयार्थ लावायला जातो. तेव्हा त्या मानवी जीवनाच्या दृष्टीने किती सूचक आहेत. याची प्रचिती येते. सर्व युगांची सुरुवात याच दिवशी झाली. याचा अर्थ सृष्टीचे निर्माण झाले जे की अजूनही कायम आहे .शिवाय दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे .अर्थात अक्षय आहे.
अखिल ब्रम्हांडात असलेल्या ऊर्जेचं फक्त रूपांतरण होत असते. कारण ऊर्जा अविनाशी आहे आणि आपणही.
वेद व्यासांना अशक्यप्राय वाटणारं महाभारत लिहून पूर्ण झालं. त्यातील सूत्र त्रिकाला बाधित सत्यता दर्शवतात किंबहुना अखिल विश्वाला मार्ग दाखविणारा ग्रंथ म्हणून आज पाच हजार वर्षानंतर ही अक्षय आहे.
भगीरथ प्रयत्नांनी आणि भगवान शिव यांनी आपल्या शिरावर उतरवलेली गंगामाता आजही येथील प्रत्येक सजिंवाच्या नसानसात जीवनदायीनी म्हणून वास करते आहे. जे की आजही निरंतर रूपाने सुरू आहे. निरंतरता म्हणजेच अक्षय्यता.
याच दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि सुदामाची भेट झाली होती. जी आजच्या दिवसाचे महत्व अधोरेखित करताना अनेक अर्थांनी सूचक आहे. नात्याचं पुनरुज्जीवन , आत्मभाव त्यातून वाहणाऱ्या मूल्यांची प्रतिपूर्ती. त्यातून परावर्तित होणारी लौकिक आणि पारलौकिक कृपा.
मानवी चैतन्याला जीवन जगत असताना लौकिक आणि पारलौकिक दोन्ही प्रकारच्या गरजा असतात. त्या भगवंतांनी मित्रत्वाच्या रूपाने पूर्ण केल्या. जीवा शिवाची भेट घडणे त्यातून प्रकट होणार एकात्म.ही घटना कालातीत आणि सूचक आहे.
या सर्व घटनांचा अन्वयार्थ एकच सुचित करतो .अक्षय फल प्राप्त करायची इच्छा असेल तर अशा कर्मांचा मुहूर्त अशा दिवशी व्हावा की ज्या दिवशी अखिल ब्रम्हांड(सारी कायनात) कुठल्याही कार्यास मनुष्याला मदत करण्याला केवळ तत्परच नसेल ,तर त्याच्या अविनाशीत्वाची जबाबदारी ही घेईल.
मग ते कार्य शरीरसंपदेसाठी असो की रोग निवारणासाठी. स्वतःसाठी असो की समाजासाठी .धनप्राप्ती साठी असो की यशप्राप्ती साठी. अक्षय तृतीया हा सर्व सिद्ध मुहूर्त आहे. याच दिवशी यज्ञ, दान ही कर्म करावी कारण फल परिणामाचे अविनाशीत्व.
आजच्या आधुनिक भाषेत सांगायचे झाले तर ,अक्षय तृतीया हा एक दिवस असा switch आहे. की जिथून login होऊन परमात्म्याशी आपले नाते revive करता येते. निर्माणाचे निर्मात्याशी नाते.
मग हा दिवस अति महत्त्वाचा का मानला जातो ? हे बघण्यासाठी आपले लक्ष ब्रम्हांडातील घटनांकडे जाणे महत्त्वाचे आहे. जो की सर्व भारतीय सण उत्सवांचा पाया आहे .खगोलीय घटनांच्या ऊर्जेचा मानवी जीवनाची गुणात्मकता सुधारण्यासाठी कसा उपयोग करून घ्यावा ? याचे विवेचन पियुष धारा ग्रंथात आलेले आहे.
आपले ज्योतिष शास्त्र हे सूर्य आणि चंद्राच्या साक्षीने रचले गेले आहे .अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्य आणि चंद्राची स्थिती अतिशय उच्च असते. सूर्य आपल्या मेष राशीत उच्चीचा असतो तर चंद्र आपल्या ऋषभ राशीत उच्चीचा असतो. आणि असा योग हा संपूर्ण वर्षभरात एकाच दिवशी घटीत होतो ती म्हणजे अक्षय तृतीया.
फलदीपिका या ग्रंथात असे सूत्र दिले आहे की, सूर्य हा आत्मबलाचे प्रतीक असून, चंद्र मनाचा कारक आहे. या तिथीला आत्मबल आणि मनाची प्रसन्नता दोन्ही गोष्टी उपलब्ध असतात. म्हणतात ना
मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण
भगवान कृष्णांचे गुरु महर्षी गंगाचार्य म्हणतात” मन की प्रसन्नता होना सबसे बडा मुहूर्त है l”म्हणून हा दिवस सर्व सिद्ध मुहूर्त.
एकदा नंद महाराज आपला पुत्र कृष्णाला म्हणाले ,हे नंदलाल “माझी एक वेळ प्रयाग तिर्थी जाऊन स्नान करण्याची खूप इच्छा आहे .”आणि त्यासाठी मी त्वरित प्रस्थान करणार आहे.”त्यावर भगवान कृष्ण आपल्या पित्याला म्हणाले “थांबा ना ! इतकी काय घाई आहे. एक-दोन दिवसांनी जा. प्रयागतीर्थी निघण्याच्या दिवशी बघतात तर काय? प्रत्यक्ष प्रयागतिर्थ प्रयागराज स्वतःच वृंदावनात. नंदराजांनी विचारले “अरे ! तुम्ही इथे ?”यावर प्रयागराज म्हणाले “सगळे लोक माझ्याकडे येऊन स्नान करतात व आपली सर्व पाप धुवून मला मलीन करतात. मग मी माझी मलिनता कुठे स्वच्छ करू?” म्हणून मी स्वतः पापमुक्त होण्यासाठी एक दिवस वृंदावनात येऊन नंदसरोवरात स्नान करून पापमुक्त होतो.
तो पावन सरोवर म्हणजे नंदसरोवर आणि पावन दिवस म्हणजे अक्षय तृतीया.
llश्री माऊली चरणी अर्पण ll
अश्विनी गावंडे
मुहूर्त म्हणजे आजचे स्विच ,,एकदम परफेक्ट लॉगिन .
छान अन्वयार्थ…!!
काय अभ्यासपूर्वक विषय मांडला… व्वा… अगदी स्पष्ट अक्षय तृतिया समजावून सांगितली…. खुप छान….
हमे कायनात देती तो खूब है पर हम ही है जो जो कम्बख्त गीनते वही है जो हासील हुआ नहीं. खरच बरोबर आहे खूपच छान
अक्षय फल प्राप्त करायची इच्छा असेल तर भारतीय परंपरेत ज्या वेगवेगळ्या घटना सुचीत केल्या आहेत त्या सर्व घटनांचा अन्वयार्थ एकच सुचित करतो .
अक्षय फल प्राप्त करायची इच्छा असेल तर अशा कर्मांचा मुहूर्त अशा दिवशी व्हावा की ज्या दिवशी अखिल ब्रम्हांड कुठल्याही कार्यास मनुष्याला मदत करण्याला केवळ तत्परच नसेल ,तर त्याच्या अविनाशीत्वाची जबाबदारी ही घेईल..
वरील ओळीतच “अक्षय तृतीया” या पावन दिवसाचे महत्व अधोरेखांकीत होते.
खुप छान विषय मांडलाय…
ताई तुमचे आर्टिकल अक्षय आहे………………………. अ… अतिशय माहितीपूर्ण………. क्ष…. क्षणात भावनारे…………… य…. यश दर्शक…………………. तुम्हाला सुद्धा अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
अक्षय तृतीयेचे महत्त्व खुपच छान विषद केले आहेस. ब्रम्हांडातील संपूर्ण positive energy आज एकवटल्या सारखं वाटतं. आजच्या तिथीला या सर्व पुराणातील घटना घडल्या ही नवीन माहिती मिळाली.
Nice information about Akshyatrutiya
अक्षय तृतीयेचे महत्व खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेत Mam, आणि ह्या तिथीला पुराणातील इतक्या सगळ्या चांगल्या घटना घडल्यात हे खरंच मला माहिती नव्हते, ह्या दिवशी विधात्याशी जवळीक साधता येऊ शकते, ही खूपच महत्वपूर्ण आध्यात्मिक माहिती मिळाली,अर्थात तशी साधना करणे पण तितकेच गरजेचे आहेच,हा लेख वाचून अंतःकरण खूपच सात्विक विचारांनी प्रफुल्लित झाले.खूप खूप धन्यवाद Mam 🙏🙏
खूप अभ्यासपूर्ण लेख.
पहिल्यांदा तुला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा आणि अनेकोत्तम शुभाशीर्वाद.तुझा हात असाच लिहीता राहू दे ही श्री माऊली चरणी प्रार्थना.लेख अभ्यासपूर्णच आहे,पण या लेखातून जुन्यानव्याची जी सांगड तू घातली आहेस ना,तिला तोड नाही.मुहूर्त म्हणजे स्विच तर ऑसमच! अशाच उत्तमोत्तम आणि वाचनीय लेखांच्या प्रतीक्षेत —–
धन्यवाद ,मॅम खरंच खूप छान व नवीन माहिती वाचायला मिळाली.
खुप सुंदर लेख लिहिला मॅडम एवढे सगळे ग्रंथाचे वचन कधी
केले आहे मला तर काही ग्रंथाचे नाव सुद्धा माहित नाही great madam .congratulations madam
खूपच अप्रतिम व ज्ञानवर्धक आहे बऱ्याच गोष्टी नव्याने माहित पडल्या
खूपच मार्गदर्शक
अप्रतीम लेख
Excellent article 👍👌👌
Thank you so much for to all of you for giving time to read the article and also for placing your comments. Which energize me to write again and again in order to serve good souls.
Thank you so much once again.
अश्विनी मॅडम खुपच छान माहिती दिली आहे. अभिनंदन तुमचं. असेच लेखन करत रहा. धन्यवाद.
It’s very nice article written by you and too much knowledge gained from this article.
It’s very nice article written by you and too much knowledge gained from this article. Some points are not known to me.
अतिशय अप्रतिम आणि मार्मिक लेखन! अक्षय घटनांची उजळणी उत्तम. सत्, चित्, आनंदाचा अक्षय प्रवाह आणि युगानुयुगाच्या अक्षय प्रवासाच्या पाऊलखुणा-अनंततेत विखुरलेल्या..…🪔🕉️♾️⚛️☯️🕉️
🙏
प्रत्येक लेख वाचल्यानंतर ज्ञानात नवीन भर पडते. धन्यवाद मॅडम.🙏🙏
अतिशय माहितीपूर्ण असा लेख . अक्षय तृतीय संबंधी सखोल अभ्यास करून मिळवलेली माहिती छान छान वाटली. आणि मुहूर्ताचं योग्य महत्त्व सुद्धा कळालं. प्रत्येक गोष्टीचा योग्य वेळ असते तेव्हाच ती फलद्रोप व्हायला मदत होतेव.. नेहमीप्रमाणे खूपच छान लेख.
आदरणीय अश्विनी ताई,
सप्रेम जय हरि!!!
अक्षय तृतीया,एक सिध्द मुहूर्त.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त एवढंच ज्ञात असलेले आम्ही सर्वार्थाने पावन झालो.धन्य भारत देश धन्य यश्य संस्कृती धन्य यश्य परंपरा.उत्तम संकलन,संचलन आणि पुराणातले उत्तम दृष्टांत देवून एकदम वाचकांच्या हृदयाचा ठाव घेवून आपले मौल्यवान विचार त्यांना आचरणात आणण्याच्या दृढ शक्तीचा जागर निर्माण करण्याची कला दैवाने आणि देवाने तुला उपजतच बहाल केली हे मी ब-याच वेळा नमूद केले आहे.तुझ्यावर भरभरून प्रेम करणा-या चाहत्यांनी मला व्यक्त करण्यासाठी काहीच बाकी ठेवले नाही.या सर्वांच्या
स्नेहगंधीत सदिच्छा आणि आशिर्वादाने तु यशाचे फार मोठे शिखर पार करून कुळाचा ऊध्दार करशील यांत शंका नाहीं.कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयांचा हारिक वाटे देवा!!!
पुढिल आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्या. शुभाशिर्वाद !!!शुभं भवतु!!!
स्नेहांकित,
कदम काका
!!!!!जय हरि!!!!!
नेहमीप्रमाणेच खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली.फलदीपिका ,पियुषधारा ग्रंथाचे तर नावही माहीत नव्हते.खरच तुझे लिखाण सर्वांच्या ज्ञानात भर टाकणारे असते.असेच तुझ्याकडून उत्तमोत्तम लिखाण होऊन आम्हा पर्यंत पोहोचू देत.खूप खूप छान.
नेहमीप्रमाणेच खूप अभ्यासपूर्ण लेख आहे.खूप छान माहिती दिली.
9q13dt
nb2y3i
खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेखन आहे ताई तुमचे…….
छान माहिती वाचण्यास मिळाली