wondervoices

पुण्यश्लोक लोकमाता

पुण्यश्लोक म्हणजे ज्याचे चरित्र पवित्र आहे. ज्याच्या जीवनात यश कीर्ती व सुंदरता आहे. अशीच यशवंत कीर्तीवंत राणी भारतात होऊन गेली. जिची तुलना जगप्रसिद्ध इतिहासकारांनी भारतातीलच नव्हे तर जगातील इतर कर्तबगार, कर्तुत्ववान राण्यांशी केली गेली आहे. यामध्ये रशियाची राणी कॅथरीन दि ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ व डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी

जगप्रसिद्ध कवियित्री Joana Baillie पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांविषयी आपल्या कवितेत म्हणतात
In latter days from Brahma came
To rule our land ,a noble dame
Kind was her heart and bright her fame
And Ahilya was her honoured name.

31 मे 1775 रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या गावी जन्मलेल्या अहिल्याचा मावळ प्रांताच्या सर्वेसर्वा होण्यापर्यंतचा प्रवास अद्भुत आहे. त्यामध्ये त्यांची गुणग्राहकता ,कर्तव्यपरायणता ,सहनशीलता, नियमबद्धता ,प्रसंगी साहसी धैर्यशील असणे, फिनिक्स पक्षासारखे राखेतून उठून पुन्हा आपले विश्व निर्माण करण्याची क्षमता, प्रखर निर्णय क्षमता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दयाळू असणे जो की मानवाचा सर्वात मोठा गुण आहे या सर्वांचे दर्शन घडते.

18 व्या शतकात जेव्हा स्त्रियांनी उंबरठ्याबाहेर पडणेही एक कसोटी मानली जायची. त्याकाळी अहिल्या यांच्या पित्याने माणकोजी शिंदे यांनी आपल्या मुलीला शिक्षणाची कवाडे उघडी केलीत . “काळाच्या पुढे चालणारी माणसेच काळ ओळखू शकतात.”पुढे याच कवाडं चा मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेसाठी महादरवाजा केला. काय काय शिकवले ?यापेक्षा काय नाही शिकवले? अहिल्याबाईंना असेच म्हणावे लागेल.

वयाच्या नवव्या वर्षी पहिल्यांदा अहमदनगरहून मावळ प्रांताच्या उत्तराधिकाऱ्याची पत्नी म्हणून इंदोरला आल्या. तिथे मल्हारराव होळकरांनी (जे पेशव्यांचे महत्त्वाचे सुभेदार होते. ज्यांना प्रथमतः मावळ प्रांताची जहागिरी देण्यात आली होती. नंतर त्यांनी मावळ प्रांताची स्वतंत्रता घोषित करून स्वतंत्र राज्य निर्माण केले.) आपला मुलगा खंडेराव व दुसरा मुलगा अर्थात स्नुषा अहिल्याबाई यांना घोडा कसा चालवावा, तोफा कशा बनवाव्यात, दारूगोळा कसा मिळवावा, धनुष्यबाण कसा चालवावा यापासून ते मुलकी प्रशासन व राज्यकारभार कसा करावा पर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण दिले.

हे सर्व शिक्षण स्वतःमध्ये सामावून घेऊन उपयोगात आणण्याची क्षमता, योग्यता आणि पात्रता अहिल्यादेवींनी आपल्या राज्यकारभारात ठायी ठायी दाखवली. बाजीराव पेशव्यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात मल्हारराव होळकर म्हणतात “आम्ही आणि आमचा मुलगा युद्धामध्ये जी काही तलवार गाजवतो.” ” ती केवळ आणि केवळ आमच्या सुनेच्या भरवशा वर” .याची नोंद आजही डेक्कन कॉलेजच्या दरबारातील तपशिलात घेतलेली आहे .हे वाक्य अहिल्याबाईंच्या कार्यकर्तुत्वासाठी ऐतिहासिक आहे.” ते पुढे म्हणतात 84 महालालचाच राज्य काय? तर माझी सून असं हजार-महालांचं राज्य सुद्धा लिलया सांभाळेल .इतकी तिची योग्यता आहे .खरोखर मासाहेब जिजाऊ येसूबाई आणि ताराबाईंचा वारसा सांगणार हे कर्तुत्व.

राज्यकारभार चालवताना नातीगोती नाही. तर नीतिमत्ता जपायचे असते .हे वारंवार आपल्या कारभारातून अहिल्याबाईंनी दाखवून दिले. युद्धावरून आल्यानंतर राजपुत्र खंडेरावांनी खजिना सरकारात जमा केला नाही. तसेच बारा महिन्यांकरता वापरायचा पैसा दोन महिन्यातच संपवला. नंतर ते आपली पत्नी अहिल्या यांना सरकारातून पैसा मागू लागले आणि म्हणाले “मी खजिन्यात पैसा जमा केला नाही म्हणून काय झाले? हे राज्य आमचच आहे. आणि आम्हीच याचे वारस आहोत. यावर अहिल्यादेवी म्हणाल्या आम्ही सुभेदारांना शब्द दिलाय .निष्पक्ष कारभार करण्याचा .त्यामुळे नाते व्यवहारात आणता येणार नाहीत.यामुळे संतापून खंडेरावांनी खतावणी फेकली. अहिल्यादेवी ने तेव्हाचे राज्याचे कारभारी गंगोबा चंद्रचूड यांना खंडेरावांना समज देण्यास सांगून .खतावणी फेकणे म्हणजे राज्याचा अपमान आहे हा गुन्हा समजून 25 सुवर्ण होनांचा दंड प्रत्यक्ष राजपुत्राकडून वसूल करून मला तात्काळ कळवावे असे आदेश दिले.
अहिल्याबाई अवघ्या 29 वर्षाच्या असताना ,खंडेराव एका युद्धात मारले गेले .तत्कालीन प्रथेप्रमाणे अहिल्याबाई सती जाण्यास निघाल्या. तेव्हा मल्हारराव होळकर, की ज्यांच्या नावाचा अख्या हिंदुस्थानात दबदबा होता .हा पहाड सर्वांगानी विदीर्ण झाला .वयाच्या तिसऱ्या वर्षी पित्याचे तर वयाच्या 12 व्या वर्षी आईचे छत्र हरवलेला हा योद्धा. वडिलोपार्जित संपत्ती शून्य असलेला आणि आता माळवा प्रांताचा छत्रपती. सुनेला सती न जाता तुम्ही सती प्रथा मोडून काढा आणि राज्य सांभाळाअशी आर्जव करू लागला. अहिल्यादेवींनी माघार घेऊन राज्य सांभाळण्याचं वचन आपल्या पितृतुल्य सासऱ्यांना दिलं.

पहिले पतीचे निधन ,नंतर सासरे आणि नंतर स्वतःचा पुत्र त्यानंतर स्वतःचा जावई व व मुलगी कारण अहिल्यादेवी स्वतःच्या मुलीला सती न जाण्यापासून रोखू शकल्या नाहीत. या सर्वांचे अकाली निघुन जाण्याचे अपार अपार दुःख झेलत स्वतः च्या व्यक्तिगत आयुष्यात जळत्या निखाऱ्यांवर चालत. मावळ राज्य समृद्धीला पोहोचवलं.

त्याकाळी हाताला काम नसणारे जंगलात राहणारे आदिवासी ,वाटसरूंना अडूवून लूट मारी करत असत. चोऱ्या आणि डाके टाकत असत. राणी मातेने ही सर्व बाबा पूर्णपणे जाणून घेतली, कारणे जाणून घेतली आणि “भिल्लारी योजना” नावाची योजना अमलात आणली.

त्यांनी आदिवासींना सांगितले तुम्ही आपल्या राज्याचे रक्षक व्हा .तुम्हाला फक्त वाटसरूंचे रक्षण करायचे आहे. जो कोणी डाके टाकत असेल. त्यांच्यापासून जनतेचे रक्षण करा . त्याकरिता तुम्हाला सरकारातून तनखा देण्यात येईल. अशाप्रकारे आपल्या राज्यातील डाकू पिंडाऱ्यांचे त्यांनी संकट मिटवले आणि भिल्ल गोंड यासारख्या लोकांनाच संरक्षक बनवले.

कालांतराने तुकोजी होळकर यांच्या हाती इंदोरची सत्ता देऊन, अहिल्यादेवी नीं नर्मदा किनारी महेश्वर येथे आपली राजधानी वसवली .
त्या महादेवाच्या निस्सीम भक्त होत्या. स्वतःला राज्याचा मालक न मानता संरक्षक मानत असत. त्यांच्या राज्यातील नाण्यांवर पिंड व नंदी यांच्या छापे होते. तर पत्र व्यवहारात स्वाक्षरी म्हणून त्यांनी कधीही स्वतःची स्वाक्षरी केली नाही. त्या ऐवजी “जय शंकर “असे लिहिल्या जात असे. हा नियम पुढे भारत स्वतंत्र होईपर्यंत त्यांच्या सर्व पिढ्यांनी पाळला.

पानिपतच्या युद्धात मराठी सैन्य अन्न, पाणी, निवाऱ्या शिवाय मृत्युमुखी पडले. पूर्ण सैन्यांची अनान्न दशा झाली.
या अनुभवातून या लोकमातेने कनवाळूपणा , वात्सल्यता धारण करून आणि ममत्वाच्या मायेने. हिमालयापासून ते दक्षिण भारतापर्यंत नद्यांवर घाट बांधलेत जागोजागी विहिरी, तलाव, खोदली पाणपोया सुरू केल्या. कुठे कुठे अन्नछत्र सुरू केले. विविध सण आणि उत्सव सुरू केले. त्यांना प्रायोजकत्व दिले. बद्रीनाथ, द्वारका, ओंकारेश्वर पासून ते पुरी ,गया, रामेश्वर पर्यंत नवीन मंदिरे बांधली. परकीय आक्रमकानी नेस्तनाबूत केलेल्या मंदिरांचा जिर्णोद्धार केला व या मातीतील माणसांची अस्मिता जपली.

औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्निर्माण केले .ज्याला आज 111 वर्ष पूर्ण झालीत . त्यांच्या संपूर्ण हयातीत अहिल्यादेवींनी शंभर च्या जवळपास मंदिरे ,तीस धर्मशाळा आणि अगणित असे घाट आणि विहिरी बांधल्या. शेतकऱ्यांसाठी शेततळे, पाणतळे, पतपेढ्या सुरू केल्या. शेतकऱ्यांना बी बियाण्यांसाठी कर्ज द्यायला सुरुवात केली.

त्याकाळी भारतात निजामी राजवट अतिशय क्रूर समजल्या जायची तेथील काही मुस्लिम बांधव लोकमातेच्या आश्रयाने महेश्वर येथे राहायला आले. हेही अद्भुतच. केवढा विश्वास.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी संपूर्ण हिंदुस्थानात धुमश्चकरीचक्री माजली तेव्हा महादजी शिंदेंना सोबत घेऊन अहिल्यादेवींनी दिल्ली सांभाळली. जे कैक लोकांना माहीत नाही. या काळात संपूर्ण हिंदुस्तान भर अनेक युद्ध, लढाया सुरू होत्या. परंतु कोणीही माळवा प्रांतावर युद्ध लादण्याचे धाडस केले नाही. या काळात संपूर्ण पेटत्या हिंदुस्तानात माळवा प्रांत अतिशय शांत आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत होता . म्हणतात ना

Male leader is someone ,who takes you where you wants to be.
And female leader is someone, who takes you where you ought to be.

त्याकाळी अठराव्या शतकात माळवा प्रांत औद्योगिक कला व संगीत आणि साहित्याचे महत्त्वाचे ठिकाण होते. या प्रांतात बुद्धिमान ,व्यापारी आणि कलाकारांना संरक्षण दिले जात असे. आजही प्रसिद्ध असलेली महेश्वरी साडी च्या वस्त्रोद्योगाची मुहूर्तमेढ अहिल्यादेवींनीच घातली.

महाराष्ट्रातील जेजुरीचे मंदिर, तलाव असो किंवा अजिंठा वेरूळ येथील मंदिरांचा जिर्णोद्धार किंवा मुर्त्यांची डागडूजी अहिल्यादेवींनीच केलेली आहे. आजही माळवा प्रांत असो की महाराष्ट्र रस्त्याच्या दुतर्फा जिथे वडांची जुनी मोठमोठी झाडे दिसत असतील त्याची लागवड अहिल्यादेवींच्या मार्गदर्शनातच झाली आहे.

पती, नंतर सासरे आणि नंतर मुलगा गेला. राज्याचा कारभारी गंगोबा चंद्रचूड हा पेशव्यांना फितूर झाला. पेशव्यांचे काका राघोबा दादा हे तसेही कर्जबाजारी झाले होते. आता मावळ प्रांताला वारस उरला नाही. तेव्हा गंगोबा चंद्रचुडा नी राघोबा दादांना पत्र धाडले. युद्ध करून जिंकून घ्या हा प्रांत. सर्व तजवीजही केली राघोबा दादांनी फौजे सहित उज्जैन गाठले.

परंतु राणीला याची बातमी लागलीच त्यांनी आपली 5000 महिलांची फौज तयार केली. स्वतः हत्तीवर दोन धनुष्यबाण घेऊन लष्करी वेशात सज्ज झाल्या आणि त्यानंतर तुकोबा होळकरांच्या तैनातीत सर्व फौज सज्ज झाली.

त्यानंतर अहिल्यादेवी नी पेशव्यांना पत्र लिहिले .”अबला समजून माळव्याचा घास घ्यायला निघालात. ठीक आहे. माझ्या फौजेत सर्वात समोर मी आणि माझ्या महिलांची तुकडी आहे. आपणास आमच्याशी पहिल्यांदा सामना करावा लागेल. आम्ही हरलो तर आमचं काहीच बिघडणार नाही .उलट लोक तुम्हालाच दुषणे देतील,की एका दुःखी कष्टी अबलेवर हल्ला केला म्हणून ,परंतु जर का आमच्याकडून तुम्ही हरलात तर मात्र तुमची जी नामुष्की होईल. याचा विचार आपण आधी करून ठेवावा.”
खरोखरच राघोबा दादा अबला समजून हल्ला करायला निघाले. पण त्यांच्या लक्षात आले. ही अबला नसून वाघीण आहे. आणि त्यांनी स्वतःचा पवित्रा बदलला. “आणि उलट टपाली पत्र पाठवले ,राणी माता आम्ही युद्धासाठी नाही ,तर तुमच्या पुत्राच्या निधनाचे सांत्वन करायला आलो आहोत .”यावर अहिल्यादेवी म्हणाल्या, तसे असेल तर या साम्राज्याची दारे तुमच्यासाठी उघडी आहेत पण मग एवढी फौज कशाला.?”

या संपूर्ण प्रसंगावर अहिल्यादेवींचा इंग्रज विरोधक जॉन माल्कम लिहितो . What a political stunt .आणि राणीला राजकारण धुरंदर अशी उपाधीही दिली. प्रत्यक्ष विरोधकही स्तुती करत असतील .तर काय “सच मे इतिहास वही बनाते है l जिनके पास इतिहास लिखने का समय नही होताl”

आणखी एक खास प्रसंग या लोकमातेविषयी बहुश्रुत आहे. एकदा राणी अहिल्यादेवींचे पुत्र मालोजीराजे रथ घेऊन जात असताना, एका गाईचे वासरू त्यांच्या रथाने अपघाती मरण पावले. त्यानंतर काही वेळाने अहिल्यादेवींचा रथ त्याच रस्त्याने जात असताना एक गाय आपल्या मेलेल्या वासराजवळ शोक करताना दिसली. अहिल्यादेवींनी थोडी चौकशी केल्यानंतर हे कसे घडले ? ते त्यांना समजले. अहिल्यादेवींचा खूप संताप त्या तडक राजमहालात गेल्या आणि आपल्या सुनेला बोलावून घेतले. त्यांनी सुनेला प्रश्न केला एखाद्या आईचे बाळ एखाद्या माणसाकरवी मारले गेले असेल तर त्या व्यक्तीला काय शिक्षा करावी ?त्यांच्या सुनबाई म्हणाल्या बाळाचे प्राण गेले तर मारणाऱ्यालाही तसेच मारल्या जावे. झालं.

राणी मातेने मालोजीरावांचे हात पाय बांधून रस्त्यावर टाकण्याचे आदेश दिले व रथ त्यांच्या अंगावरून न्यायला सांगितला. परंतु नेमका आता रथाला सारथी मिळेना. शेवटी राणी माता स्वतःच सारथी झाल्या आणि त्या ठिकाणी पोहोचल्या परंतु आता गाय त्यांना रथ पुढे नेऊ देईना. शेवटी जुन्या जाणत्या लोकांनी राणींना मालोजीराजेंना माफ करण्याची विनंती केली. ही न्यायनिष्ठा , कर्तव्य कर्मठता, कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता एक न्यायाधीश म्हणून.

अगदी अलीकडील उदाहरण द्यायचं झालं तर 1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडल्या गेली. त्याचे पडसाद म्हणून भारतात प्रत्येक शहरात हिंदू मुस्लिम दंगली उसळल्या. फक्त इंदोर शांत राहिलं तिथे कुठल्याच प्रकारची दंगल झाली नाही. म्हणून एका वर्तमानपत्राच्या वार्ताहराने संपूर्ण इंदोर पिंजून काढले. तेव्हा एक 75 वर्षाचा मुस्लिम व्यक्ती बोलता झाला.” तो म्हणाला ज्या मातीत आम्ही राहतो तिथे आम्हाला मज्जिद आणि हिंदूंना मंदिर बांधून दिलीत त्या मातेने. आम्हाला एक दुसऱ्याची सोबत करण्याचा पायंडा पाडून दिलाय आमच्या राणीने. म्हणून आम्हीही कधीही एकमेकांविरुद्ध उभे राहणार नाही. “काय प्रेरणा निर्माण केली आहे ? या लोकमातेने जी विसाव्या शतकातही कायम राहिली.

एक जर्मन कायद्याचा पदवीधर गुंथुर सोमथायमस याला भारतीय लोकजीवन, लोकसाहित्य, लोककला, संस्कृतीचा अभ्यास करून डॉक्टरेट मिळवायची होती. मी हे कसं करू ? याचं मार्गदर्शन घेण्यासाठी तो रशियात गेला. तिथे त्याने डी.डी .कोसंबी यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले तुला जर वरील विषयांचा अभ्यास करायचा असेल. तर तू, महाराष्ट्राच्या धनगर समाजात जाऊन रहा. तो तेथून थेट जेजुरीत आला तिथून पंढरीत नंतर पार रत्नागिरी पर्यंत तब्बल वीस वर्ष धनगर समाजाच्या सोबत वेगवेगळ्या ठिकाणी राहिला. धनगरांच्याच पालात राहिला, तिथेच जेवला, प्रसंगी बकऱ्याही चारल्या, अंगावर घोंगडीही घेतली. नंतर परत जाऊन त्याने तीन जगप्रसिद्ध पुस्तके लिहिली. ज्याची तेरा भाषांमध्ये अनुवाद झाले. आणि तिथूनच या forgotten twinsa विस्तृत इतिहास जगाला कळला.

राज्याला स्थिरत्व समृद्धी प्रदान करण्यासोबतच पितृसत्ताक समाजात आयुष्य जगताना आपल्यापूजनीय आणि वंदनीय कामाने पुण्यश्लोक लोकमाता झाली. शिवाची कट्टर भक्त होती. आपण आपलं काम करीत राहावं बाकी तो वरचा शिव सांभाळून घेईल .ही भावना प्रत्येक कार्याच्या मुळाशी होती. आजच्या आधुनिक मानसशास्त्रानुसार भक्ती ,समर्पण आणि निष्काम करण्याची ही वृत्ती . जिला highest state of consciousness असे म्हटले जाते.

मालवा की राणी ,हुयी करून कहानी
एक एक कर शब, कितने उठाती हैl
देख के प्रजा की पीर, पोछ चक्षुओ का नीर
लोकधर्म हेतू स्वयं उठ आती है l
युग का विश्वास बनी ,जनता की आस बनी
जनता को भूल निज शोक सहलाती हैl
देवी राजमाता से, अहिल्या बनी लोकमाता
शासिका, साहसी पुण्यश्लोक कहलाती हैl

पुण्यश्लोक लोकमातेच्या चरणी शतशः नमन.

llश्री माऊली चरणी अर्पणll
अश्विनी गावंडे

18 Responses

  1. इतिहास वही रचाते है , जिन्हे इतिहास लिखने की फुरसत नहीं होती.
    खरंच काय इतिहास आहे ,असे वाटते देवादिकांच्या गोष्टी आहेत, इतकी कर्तबगार एक महिला असू शकते ,यावर विश्वास बसणे कठीण तुलनेत आज स्त्री असुरक्षित आहे ,किती विरोधाभास आहे.
    आणि या अभ्यासपूर्ण लेखातून हे ही कळले ,
    Difference Between Male leader and Female leader.
    वाह छान मेजवानी मिळाली मेंदूला ,जे पाहिजे ते सकस ,
    संपूर्ण वाचनालय छानत बसल्यापेक्षा तुमचा मलयी सारखा लेख वाचायला नेहमीच आवडतो.

  2. अविनाश यशवंतराव मोहिते. सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक says:

    खरंच अश्विनी गावंडे मॅडम नी हा लेख खुप उत्तुंग अश्या चिंतनातून लिहिला आहे. खुप महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला आहे. खुप सारं वाचत बसण्यापेक्षा तुम्ही लिहिलेल्या लेखातून सर्व प्राप्त झाल्यासारखं वाटते. तुमच्या हातून अश्याच प्रकारचे लिखाण साकार होत राहो हया शुभेच्छा!!!

  3. राजमाता अहील्याबाई होळकर यांची ओळख विविध देवस्थाना ना सहल म्हणुन भेट दिली असतांना त्यांनी संपूर्ण देशभत बांधलेली मंदीरे, पाणवठे पाहील्यानंतर अगदी सहज त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाची ओळख पटते. पण हा परीचय अल्पसा आहे हे तुझा लेख वाचल्यावर लक्षात येते.
    पुण्यश्लोक अहील्याबाई चे कार्य व त्यानी जीवनात प्रत्तेकक्षणी गाजविलेला पराक्रम या लेखातुन अत्यंत प्रभावी पध्दतीने मांडण्यात आला आहे.लेख पुन्हा पुन्हा वाचावा व संग्रह करुन ठेवावा असा झाला आहे…सुंदर अभ्यासपूर्ण लेख…

  4. खूप अभ्यासपूर्ण लेख ताई.
    आपले खूप खूप अभिनंदन.

  5. प्रेरणादायी लेख. मनःपूर्वक अभिनंदन…

  6. अतिशय प्रेरणादायी व प्रभावी लेख. मन: पूर्वक अभिनंदन…

  7. दिव्याची ज्योत मंदपणे तेवत असते🪔, तिच्याही नकळत.कर्तव्यपरायण, श्रद्धामय, भक्तिमय होऊन.”
    ” किती जीवने तेजाळली, प्रकाशली युगे.
    काळाच्या कीर्तीवंत,पाऊल-खुणा मागे.”
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना शतशः नमन!
    मॅडम, चिंतनीय लेखन. सुंदरच! 👌🙏👍

  8. अत्यंत अभ्यासपूर्ण लेख. मालोजीराजे यांचा प्रसंग वाचताना या लोकमातेबद्दलचा आदर अधिकच वाढला…
    गतवर्षी अंबड येथे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जाण्याचा योग आला होता. तेथील मत्स्योदरी मंदिराचा जीर्णोद्धार यांनीच केला असून ते योगदान कृतज्ञतेने जपले आहे.
    लेख वाचून अनेक संदर्भ जमा झाले.
    अभिनंदन आणि धन्यवाद…

  9. खूपच सुंदर लेखन वारंवार वाचावेसे वाटते असा लेख खूप छान तुझे खूप खूप अभिनंदन!

  10. Very inspiring and informative congratulations and thanks for sharing 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👍

  11. All you great people thank you so much for reading the article and also placing the comments. Which energizes me for further writing. I am very much grateful to all of you thank you so much once again.

  12. खूप छान माहिती मॅडम प्रथमच वाचण्यास मिळाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *