मौलिक
यशोधरेला जशी झोपेतून जाग आली. तसे तिच्या लक्षात आले. सिद्धार्थ घर सोडून निघून गेल्याच्या खानाखुणा तिला दिसल्या. याआधीही तिला सिद्धार्थच्या आतील आवाजा विषयी थोडीफार माहिती होतीच. आणि लक्षातही आले होते. सिद्धार्थाचे परा कोटीचे जीवन ध्येय.(Extreme Goal)
यशोधरेला सिद्धार्थ सोडून गेल्याचे शल्य तिच्या मनी होतेच.परंतु अभिमानही होता आपले यजमान महान कार्य करायला गेले याचा. परंतु तिच्या वरच्या अविश्वासाचे शल्य तिची पाठ सोडत नव्हते.जे तिच्या सखिशी बोलण्यातून प्रतीत होते.
सिद्धी हेतू स्वामी गये ये है गौरव की बात
पर चोरी चोरी गये यही बडा व्याघात
सखी वो मुझसे कहकर जाते
क्या हुआ मुझे अपनी पथबाधा पाते
सिद्धार्थ सांगून गेले नाहीत. ही गोष्ट यशोधरा सहनच करू शकत नव्हती.
आजच्या अडीच हजार वर्षा ंपूर्वी मानव इतिहासात मानव उत्क्रांतीचे(Evolution)पडलेलं अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल. जे अंतर सिद्धार्थाने गौतम बुद्ध होण्यापर्यंत पार केलं. हे अंतर म्हणजे पूर्ण मानव इतिहासातला मैलाचा दगड(Mile stone). मैंलाचा दगड यासाठी की असे क्रांतिकारक आणि महान कार्य घडले की मानव जात ही ,ती राहली नाही जी आधी होती.
गौतम बुद्धाने धर्माला वैज्ञानिक(Scientific)केलं. जी निरपेक्षता(Absolute)वस्तूसाठी मानव ठेवू शकतो किंवा निरपेक्षतेने ती वस्तू बघू शकतो. त्याच निरपेक्षतेने ,त्रयस्थ भावाने(Neutral), साक्षी भावाने मानवाने स्वतःकडे बघावे. तो दुःख निवारणाचा मार्ग होऊ शकतो. हा पथ(Path) निर्माण करून देणारे गौतम बुद्ध.
गौतम बुद्ध म्हणतात मानवाच्या आत एक प्रकाश
(Inner Light)आहे. या माझ्या म्हणण्यावर विश्वास(Belief )ठेवू नका. तर मी तुम्हाला तुमच्यातील प्रकाश(Inner Light) पाहण्याचा रस्ता देतो. त्या रस्त्याने चला. तुमच्यातला प्रकाश दिसत असेल तर सत्य माना. अन्यथा फक्त माझे ऐकून विश्वास(Belief)ठेवण्याची गरज नाही. आणि हे कुठे अवकाशात(Outside) शोधण्याची गरज नाही. तर स्वतःच्या(Inner World)आत मध्ये प्रवेश केला तर ही दिसण्याची गोष्ट आहे.
हा प्रकाशाच्या अर्थात चैतन्याच्या(Awareness)दिशेने प्रवास करू शकणारा मार्ग भगवान बुद्धांनी सर्वांच्या दृष्टोत्पत्तीस आणून दिला. हा स्वतः चिकित्सक बनण्याचा,स्वतःची अंतर्दृष्टी विकसित करण्याचा आणि मानवाच्या अंतिम ध्येयापर्यंत
(Last Destination) पोहोचण्याचा मार्ग आहे. आणि त्याची पहिली पायरी म्हणून साधन ते काय? तर कुठलाही बाह्यमंत्र नाही. कुठलेही तंत्र नाही. तर जो मी निरंतर घेत राहतो तो श्वास. वैज्ञानिक भाषेतच बोलायचे झाले तर धर्माविषयी बौद्धांनी विज्ञाना सारखी परिकल्पना
(Scientific Hypotheses)मांडण्याची पद्धत विकसित केली.
कारण मानवाची जीवन यात्रा ही मानण्यापासून(Belive) जाणण्यापर्यंत
(Understanding) आहे. जाणून घेण्याने आत्मविश्वास वाढतो. म्हणजे तिथे अंधविश्वासाची शक्यता नाहीशी होते. म्हणून प्रत्येक व्यक्तीची दृष्टी विकसित होणे त्यातून स्वतःची रचना(Self-Structer), स्वतःचे तंत्र समजणे. आणि मानवी जीवन ज्या कारणाने दुःखमय आहे. ती कारणे तटस्थ भावाने बघता येणे. हा त्या पाठीमागे प्रत्येक मानव चिकित्सक करण्याचा बुद्धांचा मार्ग होता. हा मार्गच मौलिक आहे.
गौतम बुद्ध दर्शन मांडणारे नसून द्रष्टा(Seer)आहेत. दर्शन हे असे दिसले याचा विचार करून मांडले जाते. तर द्रष्टा असणे म्हणजे प्रत्यक्ष बघणे. कारण विचार करून मांडल्याने दृष्टी मिळत नाही. शिवाय विचार फक्त(Thoughts)ज्ञात
(Known) गोष्टींचाच होऊ शकतो. अज्ञात(Unknown)
ज्ञात करायचे असेल तर दृष्टी विकसित करण्यानेच होऊ शकते .विचार हे सूक्ष्मतम(Subtlest)असतात. जडतत्वा ने जगणाऱ्या आपल्या सारख्यांना स्वतःचे विचार पकडणे अतिशय कठीण(Complex) असतात.
मुळात ढोबळमानाने जीवन जगत असताना. प्रत्यक्ष माझा विचार कोणता आहे? की माझे सगळे विचार दुसऱ्यांकडून घेतलेलेच आहेत. याकडे आपले कोणाचे लक्ष नाही. विचार हे सतत बदलत जाणारे, अवसरवादी ,प्रसंगी अनभिज्ञतेतून पाखंडी पणा कडे आणणारे ही असतात.
मुल्ला नसरुद्दीन घोडा एका ठिकाणी बांधून सामान आणण्यासाठी दुकानात जातो. बाहेर येऊन बघतो तर काय? घोड्याला कोणीतरी लाल रंगाने रंगवलेले असते. मुल्ला नसरुद्दीन ला खूप राग येतो. चौकशी केल्यावर त्याला कळतं. समोरच्या दारूच्या दुकानात बसलेल्या कोणीतरी एकाने हे कृत्य केलेले आहे. तसा मुल्ला तडक दुकानात जातो. आणि मोठ्या आवाजात बोलतो. ज्याने कोणी माझ्या घोड्याला लाल रंग लावला आहे. त्याची हड्डी पसली एक केल्याशिवाय मी राहणार नाही. कोणी लावला आहे खरे बोला. त्यावर एक धट्टाकट्टा साडेसहा फूट उंचीचा पैलवान उभा राहतो. मुल्ला नसरुद्दीन च्या लक्षात येतं अरे,इथे मारणं तर दूरच आपली हड्डी पसली वाचणं खूप महत्त्वाचे आहे. म्हणून मुल्ला पैलवानाला म्हणतो तस नाही ,मी तर हे सांगायला आलो होतो की, माझ्या घोड्याला तुम्ही दिलेला लाल रंग आता सुकला आहे. तुम्ही त्याच्यावर दुसरा हात कधी मारणार?
असे असतात विचार. अवसरवादी(Opportunist).
म्हणून भगवान बुद्ध म्हणतात. पारंपारिकता(Traditional) सोडून दृष्टा होण्याची मौलिकता(Originality) आपलीशी करून घ्या. कारण पारंपारिकता भूतकाळात राहायला बाध्य करते. तर स्वयम् दृष्टी ही वर्तमान(Present) काळात ठेवून. सकारात्मक भविष्याकडे बघण्याचा आत्मविश्वास देते.
विचारच मानत गेले तर दृष्टी विकसित होऊ शकत नाही. कारण विचारांच्या ओझ्याने स्वतःच्या अंतरंगात
(Inner Landscape)बघण्याची ताकद निर्माण होऊ शकत नाही.
म्हणून दृष्टा बनून
अत्त दीप भव! तू स्वयं दीप होl(Be The Light)
आपल्या मानल्याने आपल्या आतील दिवा(Lamp) जळणार नाही. तो पहिलेच तुमच्यात अस्तित्वात आहे. चला माझ्यासोबत आणि बघा तो दिवा जळतोय की नाही. परंतु दृष्टी प्राप्त करणे हे विचार पालन(Application)करण्या एवढे सोपे नाही. दृष्टी प्राप्त करायची असेल तर चिकित्सक व्हावं लागेल. त्यामुळे दृष्टीला त्रास द्यावा लागेल. स्वतःलाही त्रास भोगावा लागेल. म्हणूनच आपण आतापर्यंत सर्वजण हे टाळत आलोय.
मात्र आपल्या वाट्याचा प्रकाश(Inner Light) आपल्याला शोधावाच लागेल तेच मानवाचे अंतिम गंतव्य आहे.
बौद्धांनी मांडलेली मानवी जीवन सुखी करण्यासाठी काही धर्मतत्वे(Universal Elements)मांडली . सर्वप्रथम स्वतःच्या विवेकाला प्रमाण माना. संपूर्ण जीवसृष्टी ही कर्म फळावर अवलंबून आहे. तर मग जन्माच्या आधारावर उच्चनीचता होऊ शकत नाही . गौतम बुद्ध पुढे सांगतात मानवी जीवनात येणारी तीन प्रकारची दुःखे म्हणजे जरा(Birth), मरण(Death) आणि व्याधी(Disease).
जरा म्हणजे जन्म, मरण म्हणजे शरीराचा मृत्यू आणि व्याधी म्हणजे आजार. यावर त्यांनी कारण(Cause) आणि परिणामाचा(Effect)सिद्धांत मांडला.
“अर्थात कर्म केले तर फळ असणारच. आणि फळ मिळतेय म्हणजे कर्म झाले असेलच.”
यालाच Cause & effect theory म्हणतात . म्हणजेच कारण आणि परिणामाची शृंखला.जर परिणाम नको असतील तर त्याचे कारण दूर करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी द्वादश निदान दिलेले आहेत.
मानवी जीवनातील क्लेश(Misery)कमी करण्यासाठी चार कामे करण्याची शिकवण त्यांनी दिली आहे. एक तर आनंदी राहा(Be Joyful). आपल्या पुढे जाणाऱ्या व्यक्तीवर ,आपल्यापेक्षा उच्च स्थान गाठणाऱ्या व्यक्तीवर जळू नका. न पेक्षा तुम्हीही उच्च स्थानी पोहोचा. आणि यश कीर्ती मिळवणाऱ्या व्यक्तीला. तू हे कसे मिळवलेस? मलाही मिळवायचे आहे याविषयी त्याचे मार्गदर्शन घ्या.
आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तींची घृणा करू नका(Don’t Disgust). जे पतीत आहेत. त्यांना त्यांची स्थिती सुधारण्यासाठी मदत करा.
जे दुष्ट आहेत त्यांच्याशी न भांडू नका न मैत्री करू नका. योग्य निश्चित अंतर(Certain Distance )राखून रहा. निराशा घेऊन जीवन जगू नका. दुःखाचं सर्वात मोठं कारण निराशा(Hopeless)आहे. म्हणून सकारात्मक रहा.दुःखाची अत्यंत निवृत्ती च निर्वाण आहे.
त्यासाठी गौतम बुद्धांनी अष्टांग(8 path for Balanced Life) मार्ग सांगितले आहे जे सर्वश्रुत आहेत. सम्यक दृष्टी ,सम्यक वाचा ,सम्यक स्मृति, सम्यक व्यायाम, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक संकल्प, सम्यक समाधी.
आणि हो ! गौतम बुद्ध त्याच लोकांना त्यांच्याकडे बोलवत आहेत .जे आंधळे (in the darkness or ignorant of knowledge)आहेत आणि तरीही त्यांना प्रकाश
(inner light) पाहण्याची आस आहे.
मला मान्य आहे आज आपण प्रत्येकाला जगत असताना. आत्मज्ञानाच
(Enlightened गौतम बुद्धांनी इतकी ओढ नाही. परंतु जीवन जगत असताना सुद्धा. मी इथे जन्म का घेतलाय?
(Meaning) मला जन्माला येऊन काय करायचे आहे? अर्थात माझ्या जन्माचा उद्देश काय आहे(Purpose)? माझा स्वभाव काय आहे ? सर्वाचा सार म्हणजे मला काय हवे आहे ? हे समजण्यासाठी स्वतःच्या अंतरंगात प्रवेश करावाच लागेल. तरच जगणं जगता येईल. नाहीतर फक्त जिवंत(Survive)
तर आहोतच.
खरंतर बौद्ध परंपरा अतिशय मोठी(Giant)आणि प्रगल्भ(Evolved)आहे. गौतम बुद्धांच्या अर्थात सम्यक संबोधींच्या आधी एकूण 27 बौद्ध(Awaked one)
होऊन गेलेत. तत्पूर्वी ही आपणा सर्वांना युवान सॉंग आणि फाहियान या चिनी यात्रींचे आभार मानणे गरजेचे आहे. कारण त्यांच्यामुळेच आतापर्यंतच्या बौद्ध परंपरा आणि बौद्ध साहित्य , तसेच बौद्धांनी केलेले कार्य याविषयीचे दर्शन आपणा सर्वांना घडले.
गौतम बौद्ध 28 वे बौद्ध मग 27 मग 26 असा प्रवास करत गेल्यास बाविसावे बौद्ध म्हणजे विपश्यी बौद्ध त्यांनी विपश्यना योग मार्ग जगाला दिला. तसेच पहिले बौद्ध तन्हकर , दुसरे मेधांकरआणि तिसरे सरन्हकर यांचा कालावधी म्हणजे मोहेंजोदारो किंवा हडप्पा संस्कृतीचा कालावधी आहे. आजही अजिंठा एलोरा गुफांमध्ये 21 ते 28 बुद्धांच्या मुर्त्या स्थापित केलेल्या आहेत. प्रत्येकाने आपापल्या काळात केलेले कार्य अतिशय मोलाचे असल्यानेच आज इतकी प्रगल्भता यातून दिसून येते.
सहा वर्षांनी ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर. राजा शूद्धोधन गौतम बुद्धांचे वडील भगवानांकडे जाणाऱ्या अनेकांना निरोप देत असत. की तथागताला आपल्या राज्यात यायला सांगा, मला भेटायला सांगा. पण जो कोणीही निरोप घेऊन जात असे ,तो तथागतमय होत असे.
शेवटी राजा शुद्धोधन गौतम बुद्धांचे पिता, गौतम बुद्धांचा मित्र चेना याला पाठवले आणि सांगितले तू तिथे गेल्यानंतर बुद्धमय होणारच आहेसच ,परंतु तत्पूर्वी सिद्धार्थला मी बोलवले आहे, म्हणून सांग.
काही दिवसानंतर तथागत कपिल वस्तू नगरीत येतात. वडिलांची त्यांची भेट होते. आणि मग गौतम बुद्ध विचारतात यशोधरा कुठे आहे.? राजा शुद्धोधन सांगतात ती तिच्या कक्षात आहे.
सिद्धार्थ मला न सांगता गेले माझ्यावर विश्वास ठेवला नाही की मी जाऊ देईल म्हणून हे शल्य ती अजूनही विसरू शकत नव्हती.
तिला वाटे. जर मी महत्त्वाची असेल तर सिद्धार्थ मला भेटायला येतील आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध बनून येतात. दुसरे तिसरे काहीही न बोलता गौतम बुद्ध यशोधरेच्या कक्षाबाहेर “भिक्षाम् देही “चा उच्चार करतात. आणि यशोधरा छोट्याशा राहुल चा हात धरून आणत गौतम बुद्धाच्या हाती देते .भिक्षा म्हणून देते.
जसे तुम्ही घडलात. तसाच तुमचा पुत्रही घडवा. आणि स्वतःच्या मनातील शल्ल्याला(Misery)मोकळे करते.
धन्य ती जीवने. त्याग आणि वैराग्यशील.
ll श्री माऊली चरणी अर्पण ll
अश्विनी गावंडे.
गौतम बुध्दांनी धर्माला वैज्ञानिक केलं, सत्य मार्गाने जगण्याची शिकवण दिली , मानवी जीवन सुखी करण्याची धर्मतत्वे सांगितलीत आणि जे काहीसांगितले ते स्वतः जगून अनुभवातून सांगितले …. “आजच्या मानवाने स्वतःच्या जीवनात अंगीकाराव्यात” अशा गोष्टींचे सुंदर वर्णन सदर लेखात केलेले आहे….
👌
खूप सुंदर माहिती आणि मांडणीही खूप सुंदर 👌👌
खूप छान माहिती मिळाली
मानवी जीवनातील क्लेश कमी करण्यासाठी चार कामे खूपच छान सांगितले आहेत .
✨✨✨
*_दुनिया मे क्रांती🔥 सिर्फ अच्छे विचारो से नही होती,_*
*_वो तो सिर्फ अच्छे विचारो पर अंमल करने से होती है….!!!_*
………. तथागत
सदर लेखात भ. बुध्दांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितला.. खुप छान मांडणी केली.. अजय भाऊ.. धन्यवाद
आत्मज्ञान! अत्त दीप भवः!!
खूप छान माहिती दिली.
एक एक शब्द पुन्हा पुन्हा समजपूर्वक वाचावा…. इतकं सुंदर, अभ्यास पूर्ण लेखन 👌👌👌👌👌👌दृष्ट व्यक्ती भेटल्यास न मैत्री न वैरत्व…… आचारणीय मार्गदर्शन 👏👏👏👏👏👏👏
खूपच सुंदर मांडणी केली मैम
खूप छान अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण लेख
इतका सुंदर आणि महत्त्वपूर्ण लेख लिहिल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. गौतम बुद्ध विषयी सर्वसामान्यांना नेहमीच उत्सुकता वाटत आलेली आहे आणि त्यांचं ज्ञान समजून घेण्याची तळमळ प्रत्येकच माणसांमध्ये आहे त्यांच्याविषयी तू इतक्या सुंदर पद्धतीने माहिती दिल्याबद्दल तुझे धन्यवाद.
ताई आपण विपश्यना केलेली आहे. गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करत आहात.’ अत्ताही अत्तनो नाथो ‘Be a master of your own. क्षण प्रतीक्षण सजग, क्षण प्रतीक्षण तटस्थ हे हया लेखातून तुम्ही खुप छान मांडलेले आहे. हा जन्म म्हणजे दुःखही दुःख हैं! हे बुद्धांचे मत तुम्ही वाचकांपर्यंत व्यवस्थित पोहोचविले आहे… खुप छान लेख….
गौतमबुद्धांच तत्वज्ञान खरचं अगाध आहे.आणि ते आपल्या संस्कृतीचा भाग आहे हे आपलं भाग्य.२८ बुद्धांची एक शिकवण जरी आपण अंगिकारण्याचा प्रयत्न जरी केला तरी मानव जातीचे कल्याण होईल.
अत्त दीप भव:
तथागत गौतम बुध्दां विषयी खुपच सुंदर मार्गदर्शक लेख व सम्यक विचार वाचायला मिळले तुझे अभिनंदन अश्विनी आणि एवढे चांगले विचार तुझ्या लेखातून तू आमच्यासाठी मांडलेस त्यासाठी धन्यवाद🌺
Excellent article 👍👍👍👌👌
आदरणीय अश्विनी ताई,
सप्रेम जय हरि!!!
बुध्द पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आनंदात उत्स्फूर्तपणे बुध्द भक्तांकडून साजरा केला जाणारा आनंदोत्सव.आपण सादरीकरणा साठी निवडलेला विषय म्हणजे आपण त्या विषयाशी समरस होऊन जाता म्हणण्यापेक्षा आपण तो विषय च होऊन जाता, आणि केवळ यामुळेच आपल्या लेखनात विवेचन केलेला प्रत्येक शब्द अनमोल अलंकाराच्या रुपाने आणि प्रत्येक दृष्टांत हृदयात स्थान निर्माण जातो.अजूनपर्यंत भगवान् गौतम बुद्ध विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला साधु असावा ही अज्ञानातून निर्माण झालेली कल्पना मनातून हद्दपार व्हायला मोलाचं मार्गदर्शन होत आहे.विज्ञानातुन अध्यात्माकडे जाण्याचा दिसायला सोपा पण मानवी जीवनाला मार्गदर्शन करणारा फारच प्रभावी सुखकर मार्ग आपल्या शैलीत मांडला आहे.
अंतर्मनातील काजळी धारण केलेली ज्योत प्रज्वलीत करायची असेल तर प्रथम काजळी दूर करण्याची गरज आहे त्यासाठी आपल्या पेक्षा बुध्दीवानांची संगत करण्याची गरज आहे म्हणजे च परमार्थी गुरूचीच नितांत गरज आहे त्यासाठी आपण तशी इच्छा करायला हवी.हे पटवून देण्यासाठी आपण अंत:करणपूर्वक मेहनत घेतली आहे.केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे या संत वचनाप्रमाणे आपण प्रयत्नशिल राहू या.आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि अंत:पूर्वक शुभाशिर्वाद
आपला स्नेहांकित,
कदम काका खालापूर रायगड
!!!!!जय हरि!!!!!
खूप चिंतनीय लेख…
बुद्धाचा जीवनप्रवास ते तत्त्वज्ञान याचा सुंदर धांडोळा…
0uniuf
आपल्या लेखातून गौतम बुद्धाच्या जीवनातील अध्यात्मिक बाबीचा अत्यंत परिपूर्ण आणि मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करावाच मिळाला सोबतच गौतम बुद्ध हे धर्मापुरते मर्यादित नव्हते तर संपूर्ण मानव जातीसाठी त्यांचे विचारधारा महत्त्वाची होती या गोष्टीचा परिचय झाला खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली. ताई आपले अभिनंदन आणि बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा.
आदरणीय अश्विनी ताई ,आज आपण बुद्ध पौर्णिमा पौर्णिमेनिमित्त हा अतिशय सुंदर लेख लिहिला. मला कायमच बुद्धांविषयी आणि बुद्धतत्त्वज्ञानाविषयी क कुतूहल आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीने बौद्ध धर्म का स्वीकारला असेल याचेही कुतूहल मला कायमच राहिले आहे.. वरवरची माहिती मला सुद्धा आहे ,पण आज आपण जे सुंदर असं विवेचन या लेखांमध्ये केलेलं आहे, त्यामुळे मला खऱ्या अर्थाने बुद्ध तत्त्वज्ञान काय आहे हे समजले. आपल्या अभ्यासपूर्ण लेखामुळे अतिशय सुंदर अशी माहिती मिळाली .यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आपली अशीच आध्यात्मिक प्रगती होत राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा..,
सुंदखूपर माहिती आणि मांडणीही खूप सुंदर 👌👌
खूप सुंदर लेख आहे ताई, अभिनंदन
खूप छान ताईजी..👌💐💐, अतिशय सुंदर शब्दात आपण “भगवान गौतम बुद्ध” यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, विध्वान विचार शैली आणि मानव धर्मातील मानवांनी कशा प्रकारे आपल्या स्वतःच्या बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करून कसे वागावे हे शिकविले.
आपण शस्त्राचा वापर न करता शांततेचा, अहिंसेचा वापर करून अष्टांग मार्गाने जगायचे शिकवले…,
याचा सारंच अतिशय सुंदर शब्दात आपण थोडक्यात पटवून दिलात पुनश्च खूप खूप अभिनंदन…🙏🙏🙏💐💐💐
खूप छान लेख लिहिला आहे मॅडम. तथागत भगवान गौतम बुद्ध या लेखांमधून एक दृष्टिकोन देऊन जातात. स्वतः कडे कसे बघावे व आपला inner voice किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते.खूप छान. आपले मनःपूर्वक अभिनंदन मॅडम.
खूप छान माहिती आहे मॅडम
वास्तव मांडणी… या निमित्ताने लोक वाचनाकडे वळतील… जगण्यासाठी विज्ञानवादी विचारच तारक आहे यावर लक्ष केंद्रित करतील…