wondervoices

अल्फा जनरेशन (पार्ट टू)

यामुळे दिसणारे दुसरे लक्षण म्हणजे तात्काळ आनंद देणारी संस्कृती. (Instant gratification culture ) तसं बघायला गेलं तर या काळात जन्मास आलेली पिढी म्हणजे अतिशय श्रीमंत पिढी आहे .तेही त्यासाठीची किंमत न मोजता. सर्व गोष्टी अगदी हात जोडून त्यांच्यासमोर उभ्या आहेत. एवढ्या गोष्टींची उपलब्धता या आधीच्या कोणत्याही पिढीला नव्हती.

त्यांच्या पालकांच्या पिढीचा यासंदर्भात विचार केला तर लक्षात येते ,की त्यांना जर का टीव्ही वरचा एखादा आवडता कार्यक्रम पाहायचा असेल. तर दिवसभर या कार्यक्रमाची वाट पाहावी लागे. तेव्हा संध्याकाळी बघायला मिळे. साधा चित्रहार पाहायचा म्हटला तरी बुधवार ते बुधवार वाट पाहावी लागे. एका चॉकलेटची मागणी असेल तरी संध्याकाळी बाबा येईपर्यंत वाट पाहायला लागायची. पैसे आईकडेच असायचे पण ती द्यायची मात्र बाबा आल्यानंतर. नवीन सायकल पाहिजे म्हटलं तर परीक्षेच्या मार्कांची वाट बघावी लागे. खरं तर त्या त्या वेळेला या सर्व वाट पाहण्याचा खूप राग येई. परंतु आता लक्षात येतेय,त्यामुळेच तर आपल्यामध्ये वाट पाहणे, धीर धरणे, चिकाटी ,मेहनत हे गुण आपल्या पालकांना रुजविता आले.

आता मात्र तात्काळ सर्व गोष्टी उपलब्ध असतात किंवा कार्टून तात्काळ आनंद (instant hit )देण्याचं काम करतात. ज्यायोगे मानवी मेंदूतून डोपामाईन नावाचं तात्काळ समाधान किंवा आनंद देणार एक आनंदी स्त्राव transmitter स्त्रवतो. आणि मग अशा तात्काळ आनंद देणाऱ्या उपक्रमांची यादी मानवी मेंदू तयार करतो आणि मग आयपॅड हातातला सुटत नाही. थकल्या भागल्या नंतर जर हाती एखाद वेळी मोबाईल हाती आला. एक रिल बघितले आनंद मिळाला मग दुसरे मग तिसरे मग चौथे……

एक व्यक्ती आजही अर्ध्या तासाचा एक व्हिडिओ बघण्या पेक्षा एक मिनिटांचे 30 व्हिडिओ बघणे कधीही पसंत करतो.

मात्र आजच्या आपल्या जेन अल्फा कडे आयपॅड सहज अधिकारात आल्याने आनंद पाहिजे तर रिल्स शॉट व्हिडिओ फेसबुक बघा. एकटा वाटतय व्हाट्सअप, टेलिग्राम, स्नॅपचॅट करा. काही खायची इच्छा झाली तर झोमॅटो ,स्विगी ,झेप्टो आहेतच. बोर झाले फिल्म बघायची ॲमेझॉन चे प्राईम टाईम आहे ,नेटफ्लिक्स आहे. ही लिस्ट खूप मोठी आहे.

या तात्काळ समाधान संस्कृती विषयी 1960 मध्ये स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीतील वॉटर मिशन या शास्त्रज्ञांनी एक marshmallow (एक प्रकारचे चॉकलेट)प्रयोग केला. जो आजही marshmallow एक्सपेरिमेंट म्हणून प्रसिद्ध आहे.

यामध्ये त्यांनी चार ते पाच वर्षे वयोगटातील मुलांवर एक संशोधन केले गेले त्यांनी अशा या वयोगटातील शंभर मुलांना एकत्रित करून प्रत्येकाला एक marshmallow खायला दिले आणि त्यांना सांगितले की आम्ही पंधरा मिनिटांमध्ये बाहेर जाऊन येतो तुमच्याकडील marshmallow जर तुम्ही खाल्ले नाही. तसेच ठेवले तर तुम्हाला आणखी एक marshmallow देण्यात येईल आणि खाल्ले तर मात्र दुसरे marshmallowदेण्यात येणार नाही.

म्हणजे मुलांसमोर प्रश्न होता आता एकच चॉकलेट आणि थोडा वेळ थांबलात तर दोन.काही मुलांनी खाल्ले काहींनी तसेच ठेवले त्यानंतर त्याच मुलांवर पुढील 40 वर्ष संशोधन होत राहिले. त्यातून धक्कादायक निष्कर्ष समोर आला. ज्या मुलांनी marshmellow आणखी मिळण्याच्या दृष्टीने उद्देशाने हात लावला नाही .वाट पाहिली. ती मुले त्यांच्या त्यांच्या जीवनात यशस्वी झाली होती त्यांनी जे ठरवलं ते त्यांनी आयुष्यात मिळवलं होतं. त्यांचा आरोग्यही चांगले होते . ही मुले कोणत्याही व्यसनां च्या आहारी ती गेली नव्हती. त्यांच्या आयुष्यात ताण-तणाव नव्हता. त्यांचे सामाजिक संबंधही चांगले होते.ज्यांनी मात्र हे चॉकलेट तात्काळ खालून घेतले होते. त्यांच्या आयुष्यात अजूनही ते संघर्ष रत होते ताण-तणावही खूप होते एकंदर आयुष्य आलबेल नव्हतं.

आजच्या जे न अल्फा मध्ये सुद्धा instant gratification ची संस्कृती रुजत चालली आहे. किंबहुना रुजली आहे.वर नमूद केलेल्या कौशल्यांची त्यांच्या जीवनात कमतरता जाणवते आहे. त्यामुळेच त्यांचे behavioural problem तयार होत आहेत.

कोणतेही मूल जेव्हा मोठे होत असते तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये असलेल्या न्यूरोन्सची जोडणी, ही त्याला कोणते काम करताना किती जास्त आनंद मिळाला यावर होत असते .अर्थात कोणत्या क्रियेतून डोपामाईन हार्मोन रिलीज झाला मेंदूची भाषा अशी असते whatever gets rewarded get repeated.

आता पूर्ण दिवसभर अभ्यास करून किंवा खेळ खळून जेवढा डोपामाईन रिलीज होईल त्यापेक्षा डोपामाईन कार्टून किंवा रील्स बघून रिलीज होत असेल, तर तिथून इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन ची सवय होते. उदाहरणार्थ जंक फूड खाल्ल्यानंतर घरचा वरण भात अळणी च लागेल ना.

जो आनंद इन्स्टंट मिळतो तिकडेच कोणीही वळेल.

त्यामुळे वाट पाहून मिळणारा आनंद आयुष्यातून बाद होतो .म्हणून मुलांमध्ये वाट पाहणं, धैर्यशील असणं, कामात सातत्य राखणं शक्य होत नाही .

वाट पाहून मिळणारा आनंद घेण्याची सवय नसल्याने ADHD syndrome ला लहान मुलं बळी पडतात. Attention deficit hyper activity disorder. अर्थात अवधान अस्थिरता अतिक्रियाशीलता विकृती. यामध्ये मुलांची मुख्यता तीन लक्षणे दिसतात अवधान अस्थिरता ,अतिक्रियाशीलता आणि आवेगशीलता . त्यामुळे मुलांची निकोप वाढ किंवा प्रगती थांबते. छोट्या छोट्या सहज जमणाऱ्या गोष्टीही अति चंचलतेमुळे करू शकत नसल्याने त्यांच्यात आत्मविश्वास येत नाही. मूलभूत गोष्टींचा विकास होण्यास विलंब होतो. भाषा ,गणित इत्यादी सहज शिकू शकत नाही. त्यांच्यामध्ये मग आक्रमकतेच्या माध्यमातून व्यक्त होण्याची पद्धत विकसित होते. यालाच Defense mechanism म्हणू शकतो.

यातून निर्माण होणारी तिसरी मोठी समस्या म्हणजे झोपेची कमतरता (lack of sleep) Mass general Bringhum studies ने केलेल्या संशोधनानुसार हृदयविकाराचा झटका येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे योग्य झोप न होणे . भारतीय संस्कृतीमध्ये आरोग्याचं महत्त्वपूर्ण सूत्र योग्य आहार विहार आणि निद्रा हे सांगितल्या गेलेलं आहे. कारण आपलं प्रत्येकाचं शरीर रात्रीच्या झोपेतच आपली विविध कारणांनी झालेली शरीराची झीज भरून काढत असते. नेमकी झोपच अपूर्ण असेल तर ही झीज भरून तरी कशी निघणार.

या संशोधनात829 बालकाचे झोपेचे रेकॉर्ड नोंदविण्यात आले. त्यातून असे निदर्शनास आले की जी मुलं कित्येक आठवड्यांपर्यंत सात तासापेक्षा कमी झोप घेत होते . त्यांच्या हृदयाच्या आरोग्याची कमालीची घसरण झाली होती .आणि ब्लडप्रेशरही लहान वयात असून सुद्धा खूप जास्त वाढलेले होते. त्यासाठी महत्त्वाचे कारण म्हणजे

body repairing mode मध्ये जातच नाही.

जेव्हा अंधार होतो तेव्हा मानवी मेंदू मेलॅटोनिन नामक स्त्राव तयार करतो. जो स्त्राव झोपेची सायकल आणि वाढीच्या संप्रेरकांचं सिक्रेशन नियंत्रित ठेवतो. परंतु मोबाईल पाहण्याच्या सवयीमुळे आणि त्याच्या प्रकाशाने मेंदूला दिवस असल्याचाच संदेश पोहोचतो. त्यामुळे मेंदू एक तर मेल्या टोनिंन स्त्रावने बंद करतो किंवा कमी तरी. मग बाकी सर्व शरीरिक प्रक्रियांवर त्याचे गंभीर परिणाम होतात. आणि परिणामी उत्तर प्रदेशच्या पाच वर्षाच्या कामिनीसारखे किंवा इजिप्त मधील बारा वर्षाच्या मुलासारख्या आलेल्या हार्ट अटॅक मध्ये परिणती होते.

जेव्हा झोपेची चक्र दूषित होतात तेव्हा ताण निर्माण करणारे कार्टीसोल आणि ॲड्रेनींल सारखे ताण ची संप्रेरके स्त्रवल्या जातात .त्याचे पर्यावरण कशात होईल? हे कोणीही सहज समजू शकते.

यातून निर्माण होणारी चौथी समस्या म्हणजे बालकांच्या समोर लैंगिक ते संबंधीच्या नको त्या गोष्टी येतात. कार्टून मध्ये सुद्धा अशी सूचक भाषा वापरल्या जाते. सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म जसे की instagram, facebook youtube यावर फक्त काही मुलांसाठीचेच कॉन्टेन्ट नसतात. तर जगभरातील लहान मोठ्या व्यक्ती अशा प्लॅटफॉर्म्सचा उपयोग करत असतात. म्हणून स्क्रीनवर काय समोर दिसेल ? याची खात्री नसताना ही मुलं अशा गढूळ वातावरणात मुक्त संचार करीत असतात. अशा व्हिडिओज वेबसाईट ची उत्तम ग्राहक म्हणजे ही मुलेही असतात.

पूर्वीच्या काळी दूषित वातावरणापासून आई-वडील यशस्वीपणे आपल्या मुलांना दूर ठेवत असत .मात्र आजच्या आधुनिक जीवनशैलीत माझं मूल माझ्याच घरातून कोणत्या प्रवाहात वाहत आहे. याचा थांग पत्ता ही लागत नाही. अशा बाबींवर पालकांनी नियंत्रण ठेवण्याची सक्ती आता येऊन ठेपली आहे. पालकांनी सतत मधून मधून अशा गोष्टी तपासत राहणं अत्यंत आवश्यक आहे.

एवढं सगळं वाचल्यानंतर शेवटी प्रश्न उरतो की सर्व काही नकारात्मकच आहे का ?यावर आता काही उपाय नाही का ? तर तसं नाही .समस्या आहे तर समाधान असणारच.

जेन अल्फा पिढीचा जसा आयपॅड किंवा मोबाईल कमकुवत बिंदू(weakness) आहे. तोच त्यांचा सशक्त बिंदूही (strong point)असू शकतो. जे त्यांच्या अधोगतीच कारण आहे. तेच त्यांच्या प्रगतीसाठी ही कारणीभूत ठरू शकते. फक्त त्यांच्यात एकच गोष्ट विकसित करण्याची गरज आहे ती म्हणजे समज.

मी जेव्हा एका ठिकाणी शिबिर घेत होतो .शिबिरामध्ये जवळजवळ 100 ते 150 लोक होते. आणि शिबिरार्थीच्या वयाची रेंज ही वय वर्ष 10 ते 85 पर्यंत होती. तिथे आमच्या प्रबोधकांपैकी एकाने सर्वांना एक प्रश्न विचारला. सीखना और समझना इसमे क्या अंतर है? खूप चर्चा झाली खूप वेगवेगळी उत्तरे समोर येत होती. अशातच एक अकरा वर्षाचा मुलगा उभा राहिला आणि त्यांनी विचारले याचे उत्तर मी देऊ शकतो का? अर्थातच सर्वांनी होकार दिला. त्याने उदाहरणासहित उत्तर दिले की टीव्ही कैसे लगाना है ? सीखना हैl पर टीव्ही पर क्या देखना है? ये समझना हैl

तर या समजेचा विकास होणे /करणे अपेक्षित आहे. वर म्हटल्याप्रमाणे अल्फा जनरेशन ही आतापर्यंतची सर्वात श्रीमंत पिढी आहे. त्यांच्या एका क्लिकवर सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाशी एकरूप झालेली ही पिढी आहे. कारण त्यांचा जन्म तंत्रज्ञानाच्या युगात झालेला आहे. हीच पिढी पुढील काही दिवसात सर्वात शिक्षित पिढी म्हणून नावारूपाला येणार आहे. कारण या पिढीला गती खूप आहे. मात्र तिला दिशा देण्याची गरज आहे.

जे तंत्रज्ञान त्यांच्या विकासात शत्रू म्हणून उभे आहे. त्यालाच मित्र बनवावे लागेल. आयपॅड ही समस्या नाहीच आहे खरंतर. आयपॅड कसा वापरावा याचे समाधान शोधण्याची गरज आहे. त्यांच्या कौशल्य विकसन करण्यासाठी विविध गेम्स आहेत .त्याचा उपयोग करावा लागेल. समाजामध्ये मिसळावे लागेल. मिसळू द्यावे लागेल. पडझड झाली तरी खेळू द्यावे लागेल. त्यांच्या आवडीची एखादी कला ,एखादा खेळ त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागेल .त्यामधून त्यांची चिकित्सक विचारसरणी ,निर्णय क्षमतेचा विकास ,सामाजिक संबंध, सहृदयता , सर्जनशीलता वाढीस लागेल .यातून त्यांचा भावनिक विकास होईल .जो बौद्धिक विकासापेक्षा काकणभर जास्त महत्त्वाचा आहे कारण तो मानवी जीवनाचा पाया आहे. ही भावनिकताच मानवाचं अस्तित्व आहे.

नाहीतर अमेरिकेतल्या सारखं आपल्याही मुलांना डॉक्टर प्रीस्क्रिप्शनमध्ये (priscription)याला मित्र बनवायला लावा. याला दोन तास गार्डनमध्ये फिरायला न्या. निसर्ग न्याहाळू द्या. असे लिहून देतील इथपर्यंतची वाट आपण पाहणार आहोत का?

जाता जाता एवढा लेखन प्रपंच करताना माझ्या असं लक्षात येत गेलं की, जेन अल्फाच्या समस्या त्यांच्या पालकांच्या माध्यमातून त्यांच्यात तर उतरल्या नाहीत ना.

lश्री माऊली चरणी अर्पण l

अश्विनी गावंडे

7 Responses

  1. मुलांच्या विकासात येणाऱ्या अडचणी अगदी वैज्ञानिक स्पष्टीकरण देऊन आपण इतक्या सहजतेने पालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.या अडचणी सोडवण्यासाठी ज्या काही उपाययोजना तुम्ही सांगितल्या त्याचा अवलंब पालकांनी केल्यास अमुलाग्र बदल घडून येईल.निकोप निरोगी सशक्त व अत्यंत हुशार पिढी या समाजाला मिळेल🙏🙏

  2. आपल्या लेखानातून उत्तम लेखिकेचं दर्शन होते मॅडम खूप सुंदर

  3. आदरणीय अश्विनी ताई,
    सप्रेम जय हरि!!!
    अल्फा जनरेशन पार्ट २.
    मनन,चिंतन करण्यासाठी, आजचे पालक आपल्या मुलांबद्दल त्यांच्या वागण्याबद्दल विषेश करून त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं फारच चिंतीत आहेत . आपल्या बालपणात आपल्याला उपभोगायला मिळणा-या गोष्टी सहजच मिळवून द्याव्या यासाठी प्रयत्नशील असतात.आपल्या अपत्याच्या आनंदात स्वतःचा भुतकाळ विसरूनच जातात.परिणामी सोन्याचा चमचा जन्मताच प्राप्त झालेली ही मुलं ख-या आनंदाला मुकली जातात ,थोडा धीर धरून,किंवा कष्टाने मिळवलेली कमाई मनाला किती आनंद देऊ शकतात हे या मुलांच्या खिजगणतीतही नसते.आपण म्हटल्याप्रमाणे प्रत्येक अपायाला उपाय असतोच. यासाठी काही ठराविक वयोगटातील सर्व पाल्य -पालकांच एक चर्चासत्र आयोजित करणं गरजेचं आहे.तरिहि याला पालकवर्गाकडून याला किती प्रतिसाद मिळतो हे महत्त्वाचे आहे.प्रयत्नांती परमेश्वर. आपण आपल्या माध्यमातून हे अविरतपणे चालू ठेवाणे महत्वाचे आहे.आनंदकंद भगवान परमात्मा आपल्या उदात्त ध्येयासाठी उदंड स्फूर्ती देवो हीच प्रार्थना
    स्नेहांकित,
    कदम काका, खालापूर रायगड
    !!!शुभं भवतु!!! जय हरि.

  4. I am grateful to all of you for giving time to read this article and also giving your comments on it.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *