अल्फा जनरेशन
पूर्वीच्या काळी उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे एक पर्वणी असायची. उन्हाळा आला की वातावरणातील आर्द्रता कमी होऊ लागायची. तरीही ओलाव्याची ठिकाण प्रत्येकाच्या जीवनात उपलब्ध होती. जिथे उन्हाळ्याच्या काहीलीत ही कमालीचा थंडावा मिळायचा. जिथे वर्षभराच्या मनातील शीण शांत व्हायचा. कुणासाठी ते आजोळ असायचं, कुणासाठी मामाचं गाव, तर कुणासाठी स्वतःचा खेड . एक ना अनेक.
पण आपण जसे जसे आधुनिक व्हायला लागलो तशी तशी आपली जीवनशैली बदलली, हवामानाही बदललं. पृथ्वीवर” ग्लोबल वॉर्मिंग” सुरू झालं आणि कुटुंबात “फॅमिली वॉर्मिंग” आणि या वॉर्मिंगच्या चक्रात नात्यातल्या आपलेपणाची कधी वाफ झाली कुणालाही कळलं नाही. असो.
आणि आज 21 व्या शतकात तर अशी परिस्थिती निर्माण झाली की मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागतात ,म्हटलं की आई वडिलांचा ताण वाढतो आणि वाटते कशाला हव्यात ह्या सुट्ट्या? या मुलांचा आता काय करायचं ?त्यांना कशात गुंतवायचं? असे यक्ष प्रश्न तयार होतात. परंतु करोना आला,आणि मुलांच्या हाती कधी नव्हे तो मोबाईल देऊन गेला अगदी राजरोसपणे.त्याआधीही मुलांकडे मोबाईल होताच परंतु अधिकारात नव्हता. आता मात्र शिक्षणाच्या कारणामुळे मोबाईल पूर्णतः मुलांच्या अधिकारात आला आणि सर्व कठीण होऊन बसले…..
साधारणता समाजात कुठेही नजर फिरवली तर लक्षात येते ,की आजकालची मुलं काहीशी बोलीनाशी झालीत. त्यांना त्यांच्यासारख्या हाडामासाच्या लोकांशी संवाद साधण्यात जास्त रस नाही. किंवा घरातही बोलायचं म्हटलं तर त्यांचा शब्द न शब्द विकत घ्यावा लागतो. त्यामुळेच सर्वच दृष्टीने आजकालची छोटी मुलं किमान वय वर्ष 15 पर्यंत not easy to handle अशी वाटतात.
सन 2010 ते 2025 या कालावधीत जन्माला येणाऱ्या पिढीला जेन अल्फा पिढी म्हणून संबोधले जाते. परंतु एकूणच अनुभवी आणि खुद्द त्यांच्या पालकांच्या म्हणण्याप्रमाणे ही जेन अल्फा म्हणजे काहीतरी बिनसलेली पिढी आहे.
या पिढीची गुणवैशिष्ट्यच थक्क करणारी आहेत .ही पिढी सर्वात हुशार आहे नाहीही .सर्वात श्रीमंत ही आहे आणि नाही ही .समाजाच्या दृष्टीने. एकाच क्षणी आपल्याला पूर्णतः समजली अशी वाटणारी परंतु न समजलेली .या पिढीचा थांग पत्ता मात्र काही लागत नाही.
या जेन अल्फाची लक्षणं बघून संपूर्ण पाश्चिमात्य जगत युरोप ,अमेरिका ,दक्षिण आफ्रिका त्यांच्या काळजीने त्रस्त आहेत. त्यांनी तर या पिढीतील सर्व लक्षणांना अनुषंगून विविध संशोधन सुरू केली आहेत .तिकडे शोधनिबंध लिहिल्या जात आहेत. उपाययोजनांची चर्चासत्र घडत आहेत. आपल्या भारतातील मुलांमध्येही ही लक्षण दिसतात. मात्र आपण अजूनही आपले पुरते लक्ष तिकडे गेलेले नाही.
या पिढीच्या वागणुकीची लक्षणांचे संशोधन करून त्यांना संशोधनाअंती सापडलेले तथ्य अर्थात या वागणुकी मागे सापडलेला आरोपी म्हणजे मोबाईल किंवा आयपॅड .
मग या आयपॅड ने असं केलेय काय ? याची शहानिशा केल्यास यातील सर्वात पहिले दिसणारे लक्षण म्हणजे “नैराश्य आणि चिंता”( depression and anxiety ) आज काल तर सहा सात वर्षाची मुलं लगेच बोर होतात. निराश आणि चिंताक्रांत दिसतात. त्याचेच पर्यावसान म्हणजे 2024 मध्ये उत्तर प्रदेश मध्ये पाच वर्षाच्या कामीनीला हृदयविकाराचा झटका आपल्यातून घेऊन जातो. किंवा 2020 मधील इजिप्त मधील बारा वर्षाचा मुलगा PUB G खेळताना हार्ट अटॅक ने आपल्यातून निघून जातो. अशा घटना अतिशय हृदय द्रावक आहेत आणि सूचकही.
एवढीच नाही तर या वयोगटातील काही मुले आत्महत्येच्या धमक्या देऊन थांबत नाहीत,तर प्रत्यक्ष आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा करायला लागली आहेत. त्यांना त्यांचे आवडते कार्टून पाहू दिले नाही .एवढं एकही कारण त्यांना कुठलेही टोक गाठण्यासाठी पुरेसे ठरू शकते . मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत तर आदळआपट, आक्रस्ताळेपणा दिसायला लागतो.
दुसरे लक्षण म्हणजे नखरे (tantrums) दाखवणे. मुलांना मनासारखी गोष्ट करू दिली नाही ,तर ते चिडचिड करतात जिद्दी बनतात .आई-वडिलांशी पूर्णपणे व्यावहारिक (dealing) वागतात.
या आधीची जुनी पिढी मुलांना आव्हान द्यायची की ,तू चांगले मार्क्स मिळवले तर आम्ही तुला सायकल देऊ. किंवा इतरही .ही पिढी मात्र प्रत्यक्ष पालकांना आव्हान देते आहे कधी कधी. Ultimtum द्यायला लागली आहेत. तार स्वरात बोलायला लागली आहेत.आदर भावना, कौटुंबिक जबाबदारी किंवा कौटुंबिक भान राहिले नाही की काय असे ही वाटते.
मनासारखं म्हटल्यापेक्षा आयपॅड किंवा मोबाईल नाही दिला तर, रडणं ,भेकणं, राग येणं ,डोकं घेणं ही तर घर घर की कहानी च झालीय.
तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे ही पिढी मुकी झाली आहे. खुळचट ही वाटते .आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावर पाश्चिमात्य देशातील शिक्षकांचं एकमत आहे. युरोपातील शिक्षकांच्या म्हणण्यानुसार पाचवीतली दिव्यांग मुलं ही सातवीतल्या धडधाकट मुलांपेक्षा जास्त अभ्यास करू लागलीत .एवढेच नाही तर सातवीतली मुले चौथीचाच परफॉर्मन्स देत आहे. आपल्याकडेही विभिन्न शैक्षणिक अहवाल हीच बाब ध्वनीत करतात.
खरंतर आपल्याकडेही या सर्व बाबींची सुरुवात झालीच आहे. आपल्या मुलांच्या वागणुकीत फरक पडत चालला आहे. त्यांचे वर्तन विषयक समस्या( behavioural disorder) निर्माण झाल्या आहेत.
परंतु आपल्या समाजात प्रत्यक्ष समस्येला भिडून निराकरण केल्यापेक्षा ती लपविण्याकडे आपला कल जास्त आहे. किंवा अशी समस्याच अस्तित्वात नाही अशी आपण आपली समजावणी करतो आहे का काय ?काही कळत नाही.
पालक आणि शिक्षकांनाच मुलांची हल्ली भीती वाटायला लागली आहे. हल्ली शाळेतील मुलंच शिक्षकांना बेजार करायला लागली आहे त. हे सत्य आहे भारतात सुद्धा.
आपल्याकडच्या शिक्षकांच्या म्हणण्याप्रमाणे मुले अतिशय तापट ,रागीट झाली आहेत. भाषा उशिरा शिकतात आणि बेसिक ग्रामर ची बोंबाबोंब आहे.
विशेष म्हणजे या समस्येवर जे काही जगभरातील निवडक लोक संशोधन करतात आहेत.त्यांचा समान धागा म्हणजे हे आयपॅड ने घडते आहे.
जे संशोधनाअंती मिळालं तो निष्कर्ष जर खरा आहे. तर मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हे आयपॅड किंवा मोबाईल मुलांच्या मेंदूत असे काय बदल घडवतात?, की सर्व गोमटी गोंडस दिसणारी मुलं क्षणार्धात रौद्ररूप धारण करतात .काय घडतं ?या मुलांच्या मेंदूत ही कार्टून्स ,शॉर्ट व्हिडिओ पाहताना.
मेंदूचं अति उत्तेजन (over stimulation of brain):- देशा विदेशातील पालकांनी अतिशय लोकप्रिय कार्टून कोकोमेलन विषयी तक्रार केली होती.की हे कार्टून पाहिल्यामुळे आमच्या मुलांच्या मेंदूच्या विकासाची गती कमी झाली आहे. योग्य त्या वयात अर्थात बोलायला शिकण्याच्या वेळापेक्षा बोलणं शिकण्यासाठी जास्त वेळ घेत आहेत. आपल्याकडेही अशीच तक्रार सिंचान आणि PUB G गेम विषयी झाले होते. सिंचांन मुळे आमच्या मुलांची भाषा बिघडण्याबरोबर त्यांच्या संस्कारावरही दुष्परिणाम व्हायला लागले आहेत. आपल्याकडे ही शक्तिमान पाहून मन सुन्न करणाऱ्या घटना घडल्या आहेत. अशा गोष्टी जेव्हा भयावह उंची गाठतात तेव्हा, अशा प्रकारचे कार्टून्स ,कार्यक्रम, गेम्स बघणं ,खेळणं पालक बंद करतात,तेव्हा मुले घरातील वस्तूंची नासधूस तर करतातच. परंतु स्वतःलाही इजा करून घेण्याचा प्रयत्न करतात .जसं एखादा व्यसनाधीन( Drug addict) व्यक्ती करतो. हीच लक्षणं reels पाहणाऱ्यांमध्ये किंवा शॉट व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्येही आढळून आली आहेत.
आज आपल्या जगातील श्रीमंत ,नव श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय घरातील प्रत्येक सामान्य मूल किमान तीन तास तरी मोबाईल बघण्यात घालवतो आहे.
अशाप्रकारे जास्तीत जास्त वेळ स्क्रीनवर व्यतीत केल्याने काय होते हे बघण्यासाठी ,दहा उंदीरांवर एक प्रयोग करण्यात आला होता. त्यांना रोज सहा तास असे 42 दिवस सतत प्रकाश झोतांचे व आवाजांचे अनुभव देण्यात आले जे की रिल्स पाहिल्यानंतर मानवी मेंदू अनुभवतो. असे 42 दिवस केल्यानंतर हे निष्पन्न निघाले की लाईट्स आणि साऊंड मुळे उंदराच्या मेंदूतील motor cortex, visual cortex ,temporal lobe हे खूप activate होते. परंतु मेंदूतील बाकीचे भाग जसे की preferental cortex ,amiglaida यांची यात काहीच भूमिका नव्हती. मात्र असेही दृष्टीस आले की कालांतराने या न वापरल्या जाणाऱ्या मेंदूच्या भागांचा आकार लहान लहान होत गेला. जे भाग खरंतर मुलांच्या अनुभूती (cognition) स्मृती (memory) चिकित्सक विचार प्रक्रिया (critical thinking )आणि निर्णय क्षमतेशी (decision making) संबंधित आहेत.
ही अशी सगळी परिस्थिती मानवी मेंदूत निर्माण होणे म्हणजे नैराश्य ,चिंता , आक्रस्ताळेपणा, एकाकीपणा या सर्वांना एकत्रितपणे आमंत्रित करणारी. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार स्क्रीनवर दिसणारे भडक रंग, भराभर बदलणारी स्क्रीन आणि गती यामुळे व्यक्तींना त्या गोष्टीचे व्यसन जडते. जी मेंदूच्या काही भागांना खूप उत्तेजित करतात. एकाच ठिकाणी बसून सर्व उत्तेजना अनुभवत असल्याने शारीरिक हालचाल करण्याची काही गरजच वाटत नाही म्हणून अशा गोष्टी पाहण्यावर बंदी आणली तर मुले बेबंद होतात.
यावर उपाय म्हणजे आपली मुलं काय बघतात. यावर पालकांनी लक्ष ठेवावे किंवा जे बघायचं ते जीवनातील तथ्य दाखविण्या सोबतच आनंददायी असावं. ज्याची गती कमी असावी. रंग सहज असावेत . पाहण्यालायक मटेरियल असावं . जे मुलांची वैचारिक पातळी उंचावेल आणि शिकण्याची क्षमता वाढवेल.(क्रमशः)
lश्री माऊली चरणी अर्पण l
अश्विनी गावंडे
Very good awareness
सत्य व सूक्ष्म निरीक्षण करून लिहिले. मुलांसाठी वर्कशॉप घे.
Number one writing….digital in parenting age…its high need of time
Number one writing…. parenting in digital age…it’s high need of time…
आजच्या काळातील अतिशय ज्वलन्त विषय मांडलात Mam 🙏, खरंच हे खूप भयानक सत्य आहे, आणि याला आळा घालण्यासाठी प्रत्येक घरातून कसोशीने प्रयत्न व्हायला हवेत, त्यासाठी मोठ्यांनीच काही नियम पाळायला हवेत, स्वतःवर काही बंधने घालायला हवीत, खरंच Mam हा विषय मांडणे आवश्यकच होते 🙏🙏
मँडम, आपण लिहीलेली अगदी खरी परिस्थिती आहे. आताच्या बालकांपर्यंत (वयोगटानुसार) जीवनविद्या मधील काही जीवनोपयोगी बाबींचे ज्ञान पोहोचवण्याची/ देण्याची खरच गरज वाटते….
आतिशय सुंदर लेख आहे मॅडम
मुलांना या भयावह परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कोणत्या आवश्यक उपाययोजना कराव्यात याबाबत योग्य मार्गदर्शन करणारा पुढील लेख वाचण्यास आम्ही उत्सुक आहोत.🙏🙏
खुप चांगला आणि महत्वाचा विषय अभ्यास पुर्ण मांडला मॅडम.हा लेख गरजू आणि निराश पालकांपर्यंत पोहचला पाहिजे.
अतिशय ज्वलंत विषय जो पालक हाताळायलाच तयार नाहीत पालकांना सगळ समजते पण उमजत नाही अशी परीस्थिती आहेबाहेर देशातील परीस्थीती सारखी आपली परिस्थीती व्हायला वेळ नाही खूपच संवेदनशिल विषय मांडला
Awesome writing tai …….it’s highly need of time…… Nice awareness……….👌
अतिशय ज्वलंत विषय मांडला आहे.सध्या सर्वच वयोगटातील पाल्यांच्या पालकांसमोर हा मोठा गंभीर प्रश्न आहे.
घर घरकी कहाणी…. ज्वलंत विषय
“Such a realistic glimpse, loved it!!
I think conducting a parents’ workshop would be more effective.”
आदरणीय अश्विनी ताई,
सप्रेम जय हरि.!!!
अल्फा जनरेशन, शिर्षक असलेला सादरीकरण करण्यासाठी निवडलेला नविन पण सध्या नितांत गरज असलेला विषय मनाला फारच भावला .विषयाशी समरस होवून विषय सर्वांच्या हृदयापर्यंत भिडविण्याची एक अचाट शक्ति परमेश्वराने तुला बहाल केली आहे.संताना ईहलोकीचा कोणताच अनुभव नसताना दैवी कृपेने समाजातील कोणत्याही समस्यांवर मात करण्यासाठी लागणारी अलौकीक बुद्धीमता लाभली आहे . तसेच तुझ्या बाबतीत घडत आहे.कोणत्याहि विषयावरील तुला आलेल्या प्रतिक्रिया मी आवडीने मनापासून वाचतो,त्यात आनंदाची बाब म्हणजे उच्च शिक्षित, सुसंस्कृत महिला वर्गाचाच सहभाग अधिक असतो हे प्रकर्षाने जाणवते.व आनंदही वाटतो.प्राप्त विषयावर योग्य मार्ग काढण्याची क्षमता फक्त आणि फक्त माता भगिनींनाच उपजतच भगवंताने बहाल केली आहे.हे नमूद करून मी पुरूष वर्गाला झुकते माप देवून पळपुटे साठी मार्ग मोकळा करून देत नाही.तरीहि गरोदरपणात टीव्ही वरील नको ते कार्यक्रम सतत पहाणे.सतत मोबाईलवर चॅटींग करणे,षडरिपूवर नियंत्रण न ठेवणे या सर्व गोष्टींचा परिणाम गर्भावर सतत होत असतो परिणामी प्रतिकुल वर्तनुक नैसर्गिकरीत्या मुलांकडून घडत असतात.आणि हे टाळण्यासाठी माझ्या महिला भगिनींचा फारच महत्त्वाचा रोल आहे.आमच्या हातातून हे निसटले आहे पण भावी पिढी ने यांची नोंद घ्यावी हीच माफक अपेक्षा.तुझ्या समाज प्रबोधनातून हे घडतंच आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद!!!
तुझा स्नेहांकित,
कदम काका, खालापूर रायगड
जय हरि!!!
Excellent writing👍👍
वस्तुस्थिती मांडली आहे आपण ताई, आज घरा घरात ही विदारक आणि भयावह परिस्थिती निर्माण होऊ पाहात आहे,
Khup chan and kharach mahatwacha topic ahe ha. Hatts off to you Tai . Khup chan paddhati ne mandla vishai. 😊
Thank you so much. I am very much grateful to all of you for giving the time to read this article and also giving your comments.